पुरुष असो किंवा स्त्री प्रत्येकालाच असं वाटतं की मी सुंदर दिसावं. प्रत्येकजण तसा टापटीप राहण्याचाही प्रयत्न करतो.
ज्याची त्याची सौंदर्याची व्याख्या वेगळी असते. गोरा रंग, टपोरे डोळे, लांब केस, नितळ त्वचा वगैरे वगैरे…
बऱ्याच जणांना शरीरावर अनावश्यक केस नको असतात.
चेहरा, हात, पाय, काखा अशा ठिकाणी वाढणाऱ्या केसांना अनावश्यक केस म्हणतात.
शास्त्रीय भाषेत त्याला ‘hirsutism’ म्हणतात.
हे केस घालवण्यासाठी ब्लिचिंग, वॅक्सिंग असे पर्याय त्रासदायक वाटतात.
म्हणून आज या लेखात आपण काही घरगुती सोपे उपाय पाहू ज्याने शरीरावरील अनावश्यक केस सहज घालवता येतील.
१. हळद :
हळद, बेसन सम प्रमाणात घेऊन त्यात किंचित तीळ किंवा एरंडेल तेल घालावे. मिश्रण एकजीव करून दाट पेस्ट तयार करावी. अनावश्यक केस असलेल्या भागात लावून ठेवावी. अर्धा तासाने थंड पाण्याने धुवावे.
२. पुदिन्याचा चहा :
एक चमचा पुदिन्याची चहा एक ग्लास पाण्यात घालून व्यवस्थित उकळून घ्यावा. नंतर १० मिनिटे मुरवावा. नंतर गाळून घेऊन प्यावा. दिवसातून असे दोन वेळा करावे. लवकरच अनावश्यक केस कमी होऊ लागतात.
३. कच्ची पपई :
कच्ची पपई मिक्सरमधे पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावी. त्यात अर्धा चमचा हळद घालावी. अनावश्यक केस असलेल्या भागात ही पेस्ट व्यवस्थित लावावी. ५ ते १० मिनीटांनी स्वच्छ पाण्याने धुवावे. आठवड्यातून एकदा असे केल्यास अनावश्यक केस कमी होतात.
४. कांद्याचा रस :
कांदा बारीक वाटून त्याचा रस कढावा. हा रस तुळशीच्या तुळशीच्या पानांच्या रसाबरोबर अनावश्यक केस असलेल्या भागात लावल्यास चांगला उपाय होतो.
५. ओट्सचं पीठ :
दोन पिकलेली केळी कुस्करून त्यात दोन चमचे ओट्सच पीठ घालावं.
ही पेस्ट अनावश्यक केस असलेल्या भागात लावावी. लावताना वर्तुळाकार दिशेनं लावावी आणि १० मिनिटे ठेवावी. नंतर कोमट पाण्याने पेस्ट स्वच्छ धुवून काढावी. आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास चांगला परिणाम दिसतो.
६. साखर आणि मध :
एका वाटीत ४ चमचे साखर आणि २ चमचे मध घेऊन मायक्रोवेव्ह मध्ये साखर वितळेपर्यंत मिश्रण गरम करावे.
नंतर त्यात १ चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावे. हे कोमट मिश्रण वॅक्सिंग पट्टीवर घेऊन अनावश्यक केस असलेल्या भागात लावावे.
एका कापडाने ते त्वचेवर दाबून केसांच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने कापड ओढावे.
नंतर थंड पाण्याने धुऊन त्वचा कोरडी करावी आणि त्यावर एखादे मॉइश्चरायझर लावावे.
७. बेसन पीठ :
१ चमचा बेसन आणि पाव चमचा हळद घेऊन त्यात किंचित दूध किंवा पाणी घालून दाट पेस्ट तयार करावी. अनावश्यक केस असलेल्या भागात ही पेस्ट हळूवारपणे लावावी. पेस्ट त्वचेवर कोरडी होईपर्यंत थांबावे. नंतर केसांच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने स्वच्छ धुवावे.
८. मेथीचे दाणे :
मेथीचे दाणे बारीक दळून पावडर करून घ्यावी. गुलाब पाण्यात ही पावडर घालून दाट पेस्ट तयार करावी. चेहरावर ही पेस्ट लावून थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने धुवावे. दिवसातून दोन वेळा असे केल्यास चेहरा तजेलदार होतो.
९. अंड्याचा पांढरा बलक :
अंड्याचा पांढरा बलक, एक चमचा साखर आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर नीट एकत्र करून घ्यावे. अनावश्यक केस असलेल्या भागात हे मिश्रण लावावे. १५ ते २० मिनीटांनी कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवावे. आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास चांगला परिणाम दिसतो.
लग्नसराईच्या या दिवसांत तुम्हालाही सुंदर दिसायचय ना… मग या सोप्या टीप्स नक्की करुन बघा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.