आपल्या शरीरावर कोठेही एखादी गाठ आढळून आली तर सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया असते ती म्हणजे भीतीची.
कारण कुठलीही गाठ म्हणजे कॅन्सर हे समीकरण आपल्या डोक्यात फिट बसले आहे.
परंतु हे खरे नाही, आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात.
त्यामुळे आपल्या त्वचेवर कुठेही एखादी गाठ दिसली तर घाबरून न जाता ती गाठ नक्की कसली आहे त्याची तपासणी करावी.
आज आपण अशाच एका तुलनेने निरुपद्रवी गाठीबाबत अधिक जाणून घेणार आहोत.
तर आपल्या शरीरावर दिसून येणारी अशी गाठ म्हणजे चरबीची गाठ (लायपोमा).
ही गाठ चरबीपासून बनलेली असते. त्वचेच्या आतल्या भागात आणि मसल लेयर च्या वर असणाऱ्या मधल्या भागात चरबी एकत्र साठून ही गाठ बनते.
ही गाठ सहसा निरुपद्रवी असते.
तिचा शरीराला कोणताही त्रास होत नाही. अशा स्वरूपाच्या गाठीचे कॅन्सर च्या गाठीत रूपांतर होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे.
चरबीची गाठ १ ते ३ सेमी ची असू शकते.
सहसा ह्या गाठी हात, पाय, पाठ, पोट, मान अशा ठिकाणी शरीराच्या वरच्या भागात आढळतात, पण काही वेळा ह्या गाठी पोटात वगैरे देखील तयार होऊ शकतात.
४० वर्ष वयानंतरच्या प्रौढांमध्ये अशा गाठी होण्याचे प्रमाण जास्त आढळून येते.
लहान मुलांना ह्या आजाराची लागण होणे अगदी दुर्मिळ आहे.
ह्या गाठींना स्पर्श केला असता गुदगुली केल्यासारखे वाटते आणि बोटाने ह्या गाठी दाबल्या जाऊन पुन्हा वर येतात.
तसेच त्वचेच्या आत ह्या गाठी आतल्या आत हलू शकतात.
चरबीच्या गाठी ह्या चरबीचे टिशू, ट्यूमर किंवा सेल्स ह्यांची वाढ झाल्यामुळे तयार होतात.
चरबीच्या गाठी का तयार होतात?
१. लायपोमा म्हणजेच चरबीच्या गाठी तयार होण्याचे निश्चित कारण अजूनही माहीत नाही.
परंतु बरेचदा अशा गाठी होणे हे आनुवंशिक असते.
त्याला लायपोमेटॉसिस असे म्हणतात. एखाद्या कुटुंबातील काही व्यक्तींना हा आजार असू शकतो.
२. अशा गाठी होण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे स्थूलता.
वजन जर प्रमाणाबाहेर वाढलेले असेल तर शरीरातील अतिरिक्त चरबी एकत्र येऊन हळूहळू त्याच्या गाठी तयार होतात.
आणि मग त्या अशा शरीरावर दिसु लागतात.
३. ह्याशिवाय अशा गाठी तयार होण्याचे आणखी एक कारण म्हणजे फास्ट फूड चे अतिरिक्त सेवन.
जे लोक वारंवार फास्ट फूड खातात, शिळे अन्न खातात, तेलकट, मसालेदार अन्न खातात त्यांच्यात ह्या गाठी तयार होण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असते.
चरबीच्या गाठींवरचे उपाय
ह्या गाठी पूर्णपणे कधीही जात नाहीत. परंतु ह्यांचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
त्यासाठी आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे
१. वारंवार कोमट पाणी पिणे .
२. पचनास हलके असणारे भोजन घेणे.
३. फास्ट फूड आणि पचनास जड असणारे भोजन न घेणे.
४. चरबीच्या गाठीवर लिंबाचा रस किंवा ऍपल सायडर वीनेगर लावण्याचा उपयोग होतो.
तसेच हळदीचा लेप लावण्याचा देखील उपयोग होतो.
५. आहारात लसूण अवश्य घ्यावा.
६. चहा कॉफी चे सेवन प्रमाणात करावे.
७. पंचकर्म करून घेणे.
८. गाठीवर तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने औषधी लेप लावणे.
९. काही वेळा चीर देऊन गाठीतील अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते.
परंतु हे तज्ञ डॉक्टरां च्या सल्ल्याने व त्यांच्या
देखरेखीखाली होणे आवश्यक आहे.
१०. होमिओपॅथी मध्ये देखील ह्यावर उपाय सांगितले आहेत.
त्यासाठी होमिओ पॅथी च्या तज्ञांच्या सल्ल्याने औषध घेणे आवश्यक आहे.
११. लायपोसक्शन करून अथवा शस्त्रक्रिया करून ह्या गाठी पूर्णपणे काढून टाकणे शक्य आहे.
काय खबरदारी घ्यावी
१. दुर्लक्ष करू नका
शरीरावर चरबीच्या गाठी जरी आल्या तरी त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांची तज्ञ वैद्य अथवा डॉक्टरां कडून तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण क्वचित का होईना ती गाठ गंभीर स्वरूपाची असू शकते. त्यामुळे शंकानिरसन जरूर करून घ्यावे.
२. गाठ शेकू नका
बरेचदा लोकांचा असा समज असतो की चरबीची गाठ गरम पाण्याच्या पिशवीने अथवा गरम कपड्याने शेकली तर ती कमी होईल.
परंतु असे होत नाही. त्यामुळे अशा गाठी शेकू नका.
शेकण्यामुळे उलट काही दुष्परिणाम होऊ शकतात.
३. नसांवर गाठी झाल्या तर
जर चरबीच्या गाठी नसांवर तयार झाल्या तर नसा दाबल्या जाऊन त्यात खूप जास्त वेदना होतात.
अशा वेळी स्कॅन करून गाठीचे नक्की कारण शोधावे लागते.
तसेच शस्त्रक्रिया करून ती गाठ काढून टाकण्याची गरज पडू शकते.
तसेच अशा गाठीची बायोपसी करून घेणे आवश्यक ठरते.
तर ही आहे लायपोमा म्हणजेच चरबीच्या गाठी बद्दलची माहिती आणि त्यावरचे घरगुती उपाय.
शरीरावर कोणतीही गाठ आलेली दिसली तर दुर्लक्ष करू नका तसेच घाबरून ही जाऊ नका.
त्या गाठीची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
आणि ती निरुपद्रवी अशी चरबीची गाठ आहे हे त्यांनी कन्फर्म केले की वर दिलेले उपाय करून त्यांचे प्रमाण कमी करा.
स्वस्थ रहा. आनंदी रहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mala hi gathanche praman khup ahe
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom
मला पण पोटावर बेंबी जवळ गाठ आली आहे त्या वर उपाय सांगा