आपण सगळेच आपल्या भविष्याविषयी चिंतित असतो.
भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसा असावा असे सगळ्यांनाच वाटते.
मात्र त्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक केली पाहिजे ह्याचा आपण विचार करत नाही.
पण आता आपण हा विचार जरूर करू शकतो, कारण आपल्याजवळ आज असणारे पैसे भविष्यात दुप्पट होणाऱ्या आणि किमान रुपये १००० पासून गुंतवणूक शक्य असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल आपण बोलणार आहोत.
पोस्ट ऑफिसने गुंतवणूक दुप्पट करणारी नवीन योजना आणली आहे.
ह्या नवीन योजनेचे नाव किसान विकास पत्र असे आहे.
यामध्ये किमान १००० रुपयांची गुंतवणूक करून आपण सुरुवात करू शकता.
१२४ महिने म्हणजेच १० वर्षे आणि ४ महिने इतक्या कालावधीसाठी हे पैसे गुंतवावे लागतात.
आपण जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना हा आपल्यासाठी एक ऊतम पर्याय आहे.
पोस्ट ऑफिसमधील ह्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपणास आकर्षक व्याजदर तर मिळतोच शिवाय केलेली गुंतवणूक सुरक्षित रहाते.
चला तर मग ह्या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
या योजने अंतर्गत किमान १००० रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, त्यापुढे शंभरच्या पटीत कितीही रक्कम गुंतवली जाऊ शकते.
गुंतवणूक कालावधी पूर्ण झाल्यावर दुप्पट परतावा मिळतो.
ह्या योजनेचे स्वरूप ‘वन टाइम इन्वेस्टमेंट’ म्हणजेच एकदाच केलेली गुंतवणूक असे आहे.
नक्की कशी आहे किसान विकास पत्र योजना
पोस्ट ऑफिसच्या ह्या योजनेचे नाव ‘किसान विकास पत्र’ असे आहे.
या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवणूक करून सुरुवात केली जाऊ शकते.
कमाल गुंतवणुकीची काहीही मर्यादा नाही.
या एका योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपल्या नावाची अनेक खाती उघडू शकतात.
या योजनेचा वार्षिक व्याजदर ६.९% आहे.
या योजनेचा कालावधी १२४ महिने म्हणजेच १० वर्षे आणि ४ महिने इतका आहे.
या कालावधीत आपण गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.
१० वर्षावरील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पालकांच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते.
व्यक्तिगत खात्याव्यतिरिक्त इतर तीन लोकांचे मिळून जॉइंट खातेसुद्धा उघडले जाऊ शकते.
अडीच वर्षाचा लॉक ईन कालावधी
या योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशांसाठी अडीच वर्षे लॉक ईन कालावधी आहे.
म्हणजे आपण गुंतवणूक सुरू केल्यापासून अडीच वर्षापर्यंत यातून पैसे काढू शकत नाही. त्यानंतर गरज पडल्यास आपण ते पैसे काढून घेऊ शकतो.
दूसरा पर्याय म्हणजे ह्या गुंतवणुकीच्या आधारावर कर्जही मिळू शकते.
हे एका गुंतवणूकदाराच्या खात्यातून दुसऱ्या गुंतवणूकदाराच्या खात्यावर तसेच एक पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजरीत्या हस्तांतरित करता येऊ शकतात.
करसंबंधी नियम
या योजनेत कर सवलतीचा फायदा मिळत नाही.
हे सेक्शन ८० सी च्या अंतर्गत समाविष्ट नाही.
मिळणाऱ्या व्याजाच्या कमाईवरही कर आकरला जातो.
या योजनेतून मिळणारा परतावा आपल्या एकूण उत्पन्नात ग्राह्य धरला जातो आणि त्यानुसार कर आकारणी केली जाते.
या योजने अंतर्गत एकूण व्याज उत्पन्नावर टीडीएसच्या स्वरूपात कपात केली जाते.
म्हणजेच टॅक्स कापून घेऊनच उरलेली रक्कम अदा केली जाते.
मॅच्युअर झाल्यावर मात्र टीडीएस कपात होत नाही.
तर हि अशी आहे पोस्टाची किसान विकास योजना.
जी १२४ महिन्यात आपली गुंतवणूक दुप्पट करते.
ह्या योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपले भविष्य सुरक्षित करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.