अंतर्मुख होऊन आयुष्याचा विचार करायला लावणारे १५ प्रश्न

एक क्षणभर असा विचार करा की पुढच्या क्षणाला तुम्ही ह्या जगात नसाल.

एखादा अपघात होऊन किंवा अचानक काहीतरी गंभीर आजार होऊन तुम्ही तत्क्षणी मरणार आहात. काय, एकदम धक्का बसला ना..

सगळं आयुष्य सरर्कन डोळ्यापुढून गेले असेल, प्रिय व्यक्तींचे चेहरे डोळ्यासमोर आले असतील.

कितीतरी करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आठवल्या असतील.

असो, घाबरू नका, आपण फक्त विचार करत होतो.

प्रत्यक्षात असं घडलं नाहीये, तुम्ही अगदी ठणठणीत आहात. परंतु आता असा विचार करा की हे आपल्याला मिळालेले आयुष्य आपण अगदी गृहीत धरून वागतो का?

आपल्याला कधी काही होणार नाही अशा भ्रमात राहतो का? असे न राहता आयुष्याचा नीट विचार केला, ते भरभरून जगायचे ठरवले तर काय हरकत आहे.

आज आपण स्वतःलाच ह्या बाबतीत काही प्रश्न विचारणार आहोत. असे प्रश्न जे आपल्याला अंतर्मुख करून आयुष्याचा विचार करायला भाग पाडतील.

१. मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जगत आहे का?

बरेचदा आपल्या असे लक्षात येते की आपण आपल्या सगळ्या कृती यांत्रिकपणे करत असतो, म्हणजे कृती एक सुरू असते आणि डोक्यात विचार दुसरेच असतात.

किंवा काहीच विचार नसतात. दात घासणे किंवा आंघोळ करणे अशा कृती यांत्रिकपणे केल्या तर ठीक आहे परंतु ऑफिसला जातानाच्या प्रवासात यांत्रिकपणे गाडी चालवणे योग्य नाही. वाटेत दिसू शकणाऱ्या कितीतरी महत्वाच्या गोष्टी, आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसणारच नाहीत.

म्हणजेच तुमच्या आयुष्यातले हे क्षण तुम्ही गमावून बसाल. म्हणून आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगायला शिका.

२. माझ्या प्रिय व्यक्तींना मी आवश्यक तितका वेळ देत आहे का?

सध्याच्या अति व्यस्त आयुष्यात हा प्रश्न म्हणजे अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. माझ्या आयुष्यातील ज्या प्रिय, महत्वाच्या व्यक्ति आहेत त्यांना मी पुरेसा वेळ देतो/देते का?

हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचरला पाहिजे. आईवडील नोकरीवर आणि मुले पाळणाघरात, किंवा तरुण नोकरीवर आणि वृद्ध आईवडील घरात एकटे पडलेले असे चित्र अगदी सहज दिसते.

पण वेळेचे योग्य नियोजन करून ह्यावर मात करणे सहज शक्य आहे.

३. मी प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करतो / करते का?

आपल्या बाबतीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा तर आपण आनंदाने स्वीकार करतोच.

परंतु आपल्या बाबतीत घडणाऱ्या काही कटू गोष्टी सुद्धा आयुष्याचा एक भाग म्हणून आपण स्वीकारतो का? जे घडत आहे ते चांगले नाही परंतु हयातून उदया काही चांगले घडू शकेल असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवतो का?

म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर समजा की तुमचा मोठा ऍक्सीडेन्ट झाला तर दुःख होणे साहजिक आहे, परंतु आपला जीव तर वाचला हा सकारात्मक विचार ही केला पाहिजे. म्हणजे आयुष्याचे महत्व आपल्या लक्षात येईल.

४. मी सगळ्यांशी आदराने आणि दयाळूपणाने वागतो/वागते का?

हा एक प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे असा प्रश्न आहे पण जो सहसा टाळला जातो.

आपण सहजपणे कोणाची चेष्टा करतो, ट्राफिक मध्ये कोणी आडवे आले तर अपशब्द बोलतो किंवा हॉटेलमध्ये वेटर, स्टोअर मध्ये कॅशियर यांना धन्यवाद न देताच बाहेर पडतो.

त्याचं आपल्याला विशेष काही वाटत देखील नाही. परंतु त्या त्या व्यक्तींच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर आपल्याला आपली चूक कळेल. आपण समोरच्या व्यक्तीशी आदराने वागत नाही हे कळेल.

५. माझ्या शब्दांनी मी कोणाला दुखवत तर नाही ना?

आपल्या वागण्या बोलण्यातून आपण समोरच्या व्यक्तीला दुखावत तर नाही ना ह्याचे भान प्रत्येकाने बाळगले पाहिजे. हाताखालच्या लोकांशी किंवा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांशी आपण अगदी सहजपणे मोठ्या आवाजात किंवा ओरडून बोलतो, अपशब्द वापरतो.

त्यामुळे समोरची व्यक्ति दुखावली जाऊ शकते. म्हणून बोलताना किंवा काहीही कृती करताना ह्या गोष्टीचे भान ठेवलेच पाहिजे.

६. मी काही चुकीचे/वेड्यासारखे वागतो/वागते का?

अनेकदा आपण परिस्थितीनुसार योग्य ते न वागता काहीतरी वेड्यासारखं, बेजबाबदार पणे वागतो. त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. हा देखील स्वतःला विचारण्याचा महत्वाचा प्रश्न आहे.

७. मी फार उधळपट्टी करत आहे का?

आजचा जमाना हा यूज अँड थ्रो चा जमाना झाला आहे. सहजपणे वस्तु आणल्या आणि टाकून दिल्या जातात. परंतु त्यामुळे पैशाचा तर अपव्यय होतोच पण पर्यावरणाची देखील हानी होते. म्हणून आपल्या गरजा जाणीवपूर्वक कमी करून, तसेच आणलेल्या वस्तु बिघडल्यास दुरुस्त करून वापरुन आपण उधळपट्टी करणे थांबवू शकतो.

८. मी सतत फार घाई करतो / करते का?

जरी आजचे जीवन हे गतिमान झाले असले तरी प्रत्येक गोष्ट मिळवण्याची घाई करणे योग्य नाही. तर ती गोष्ट, ते यश मिळवण्यासाठीचा जो प्रवास आहे त्याचा आनंद घेणे देखील महत्वाचे असते.

९. मी कोणत्याही परिस्थितीत स्वतःशी प्रामाणिक असतो / असते का?

आपण स्वतःला हे जरूर विचारले पाहिजे की कामाच्या ठिकाणी असो अथवा घरी, कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेताना मी तो प्रामाणिक पणे घेत आहे ना.

त्यात गुंतलेल्या व्यक्ति किंवा इतर गोष्टींमुळे माझ्या निर्णयावर परिणाम तर होत नाही ना.

१०. मी काही गोष्टी किंवा व्यक्तींना गृहीत धरतो / धरते का?

अनेकदा आपण आपल्याही नकळत आपल्या जवळच्या व्यक्तींना गृहीत धरत असतो.

त्यांनी हे आपल्याला सांगेपर्यंत आपल्याला ते जाणवतही नाही इतके सहजपणे आपण तसे वागतो. ह्यावर जरूर विचार केला पाहिजे.

११. माझी जवळची नाती सांभाळण्यासाठी मी पुरेसे प्रयत्न करत आहे का?

अनेक वेळा आपण आपल्या जवळच्या नात्यातील लोकांना पुरेसा वेळ देत नाही, त्यांच्या लहान मोठ्या गरजा विचारात घेऊन त्याप्रमाणे वागत नाही.

तसेच नाते टिकवण्यासाठी म्हणून आपल्याकडून काहीही प्रयत्न करत नाही.

१२. एखादी गोष्ट मला जमणार नाही ही मी सहजपणे स्वीकारतो / स्वीकारते का?

अनेकदा आपण हट्टाला पेटून आपल्या अखत्यारीत नसलेली गोष्टही करायचा अतोनात प्रयत्न करतो. एखादे काम जमत नाही ह्याने आपला अहंकार दुखावतो.

पण बरेचदा आपल्याला एखादे काम जमत नाही हे मोकळेपणाने स्वीकारणे चांगले असते. त्यामुळे कोणताही कमीपणा येत नाही, उलट आपण छान आनंदी राहू शकतो.

१३. मी स्वतःची काळजी घेत आहे का?

हा आपण स्वतःला विचारण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आपण स्वतः आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून काय प्रयत्न करतो? आपले शरीर, आपले मन निरोगी रहावे म्हणून आपण काय करतो ह्याचा सर्वांनी जरूर विचार केला पाहिजे.

१४. मी माझे ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे का?

अनेकदा असे होते की आपण काहीतरी ध्येय स्वतःसाठी ठरवून घेतो परंतु ते गाठण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही.

आणि मग यश मिळाले नाही की नशिबाला दोष देत राहतो. पण आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत ना हे सर्वांनी स्वतःला विचारणे आवश्यक आहे.

१५. मला लोकानी कसे लक्षात ठेवावे असे मला वाटते?

केव्हातरी आपण ह्या जगात नसू हे तर शाश्वत सत्य आहे. अशा वेळी लोकांनी आपल्याला कसे लक्षात ठेवावे असे आपल्याला वाटते.

एक चांगली, दयाळू, कामसू व्यक्ति अशी आपली प्रतिमा असावी असे वाटणे सहाजिक आहे. आणि त्यासाठी आतापासून प्रयत्न करणे ही आवश्यक आहे.

तर हे आहेत आपल्याला अंतर्मुख करून आयुष्याचा नव्याने विचार करायला लावणारे प्रश्न. ह्या प्रश्नांची खरी उत्तरे स्वतःच्या मनाला द्या आणि नव्याने भरभरून आयुष्य जगा.

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अंतर्मुख होऊन आयुष्याचा विचार करायला लावणारे १५ प्रश्न”

  1. स्वतःचे आत्मचिंतन करण्यासाठी आणि या पुढील जीवन प्रवास सुखकारक , आनंदी बनवण्यासाठी खुप उपयोगी आणि अतिशय महत्वाची प्रश्नपत्रिका या लेखाच्या माध्यमातून मनाचे talks टीम नी दिलेली आहे त्याबद्दल मनाचे talks टीमचे मनापासून आभार, धन्यवाद आणि या अनोख्या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।