रोजच्या आयुष्यात कत्येक चढ उतार येत असतात. सध्या आपण कोविड काळातून जातो आहोत. ही परिस्थिती आपण हाताळतो आहोत त्याला आता तब्बल वर्ष उलटून गेलं.
या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रत्येकाने स्वतः मध्ये खंबीर होणं, हाच एक मार्ग आहे, त्याचसाठी आज हे प्रेरणादायी सुविचार खास तुमच्या साठी…
दिवसातून किमान एकदा तरी स्वतःशी बोला,
तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमावून बसला!!
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही!
जे प्रामाणिक आणि ध्येयाने प्रेरित असतात,
ते अपयशाला काय जगाला हादरवण्याची ताकत ठेवतात.
आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे,
हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल, त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो!
ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान,
आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
आयुष्य कठीण आहे पण अशक्य नाही. हराल जिंकाल ती तर नंतरची गोष्ट आहे पण आयुष्याचा खेळ खेळणे महत्त्वाचे आहे.