आपल्याकडे उपास असला की सहसा नेहेमीच्या मीठा ऐवजी सैंधव मीठ वापरले जाते. त्यालाच काळे मीठ किंवा रॉक सॉल्ट असे म्हटले जाते. सध्या हे सैंधव हिमालयन पिंक सॉल्ट ह्या नावाने देखील मिळते.
उपासाच्या खाण्याबरोबरच रोजच्या आहारात देखील जर आपण सैंधव वापरले तर त्याचे बरेच फायदे होतात.
दररोजच्या स्वयंपाकात सैंधव वापरण्याचे फायदे
१. सैंधव हाडांच्या मजबुतीसाठी गुणकारी आहे.
२. स्नायूंमध्ये येणारी ताठरता किंवा लचक नियमित सैंधव वापरण्याने कमी होते.
३. सैंधव नियमितपणे वापरल्यामुळे निद्रानाश कमी होतो. शांत झोप लागण्यास मदत होते.
४. सायनसमुळे होणाऱ्या वेदना सैंधव कमी करते.
५. नियमित स्वरूपात सैंधव खाण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते.
६. सैंधवामुळे पचनशक्ती सुधारते. पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठ कमी होते.
७. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी सैंधव खाणे उपयुक्त आहे. आहारात सैंधव असले की योग्य प्रमाणात तहान लागून शरीरातील पाण्याचा समतोल राखला जातो.
८. आहारात नियमित सैंधव असले की पित्ताशयातील खडे तसेच मुतखडे होण्यापासून अटकाव होतो. मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्याचे काम सैंधव करते.
९. थोडेसे सैंधव ग्लासभर पाण्यात मिसळून सकाळी ते पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाब असला की नेहेमीचे मीठ खाण्यास मनाई असते किंवा कमी खावे असे सांगितले जाते. तेव्हा डॉक्टर सैंधव खाण्याची शिफारस करतात.
१०. सैंधव वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सैंधव खाण्यामुळे शरीरात पाचक रसाची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे अन्नाचे पचन लवकर होते तसेच शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे वजन घटवण्यास उपयोग होतो.
तर हे आहेत सैंधव खाण्याचे फायदे. आता फक्त उपासालाच नव्हे तर दररोज स्वयंपाकात सैंधव वापरा आणि ह्या फायद्यांचा लाभ करून घ्या.
परंतु सैंधव खरेदी करताना खात्रीशीर ठिकाणाहून किंवा चांगल्या कंपनीचेच घ्या, कारण नाहीतर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.
अशा मीठात रंग मिसळलेला असतो जो मीठ पाण्यात घातले असता वर तरंगतो.
अशा फसवणुकीपासून सावध रहा. आरोग्यदायी आणि शुद्ध सैंधव नियमित वापरा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
How much qautity should be take in a day of rock salt