सध्या करोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये मंदी आली आहे. परंतु ह्या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या बाबतीत मात्र एक चांगली गोष्ट घडली आहे ती म्हणजे रियल इस्टेटच्या क्षेत्रात मात्र तेजी आहे.घर खरेदी करू पाहणाऱ्यांची मात्र हि चांगली वेळ आहे.
गृहकर्जाचे व्याजदर सध्या सर्वात कमी आहेत. तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये स्टॅम्प ड्यूटी कमी केली आहे.
त्यामुळे घर खरेदी करणे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात आले आहे असे वाटते.
शिवाय सध्या वर्क फ्रॉम होम करणारे पालक आणि घरूनच शाळा, कॉलेज अटेंड करणारी मुले ह्यामुळे घराची निकड वाढली आहे.
तसेच ज्यांच्याकडे आधीच घरे आहेत त्यांना मोठ्या घरांची आवश्यकता भासू लागली आहे.
अनेक बिल्डरांनी आपापले प्रोजेक्ट पूर्ण करून रेडी टु मुव इन (लगेच रहायला जाता येईल अशी) घरे तयार केल्यामुळे ग्राहकांमध्ये देखील घर खरेदीबाबत उत्साह निर्माण झालेला दिसुन येत आहे.
परंतु घर घेत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या कोणत्या ते आपण जाणून घेऊया.
बहुतेक वेळा घर घेताना गृहकर्ज घेण्याची निकड भासते.
परंतु हे गृहकर्ज घेताना खालील ६ गोष्टींचा आपण जरूर विचार केला पाहिजे.
ह्या ६ गोष्टींमुळे आपल्याला हे कळेल की आपण घरच्या किमतीच्या किती प्रमाणात गृह कर्ज घेऊ शकतो आणि त्या घराचा एक ऍसेट म्हणून आपल्याला किती फायदा होऊ शकतो.
१. लोन टु वॅल्यू रेशो
एखाद्या प्रॉपर्टीवर बँकेतून किती लोन मिळू शकते ह्यासाठी बँकेचे काही नियम आहेत. त्यातील हा महत्वाचा नियम आहे लोन टु वॅल्यू रेशो. म्हणजेच प्रॉपर्टीच्या किमतीच्या किती प्रमाणात लोन द्यायचे हे बँक ठरवते.
जर घराची किंमत ३० लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याच्या ९०% इतके लोन मिळू शकते. जर घराची किंमत ३० ते ७५ लाख रुपये असेल तर त्याच्या ८०% इतके लोन मिळू शकते आणि जर घराची किंमत ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याच्या ७५% इतके लोन बँकेकडून मिळू शकते.
२. डेट टु इन्कम रेशो
हा रेशो एखादी व्यक्ती भरत असलेल्या सर्व ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिलांवर अवलंबून असतो. त्या व्यक्तीचे इन्कम आणि त्याला भरावे लागणारे ईएमआय आणि बिले ह्यांचे गुणोत्तर काढून ती व्यक्ती किती लोन घेऊन त्याची परतफेड करू शकते हे ठरवले जाते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे इन्कम महिना १ लाख रुपये असेल आणि त्या व्यक्तीचे ईएमआय आणि बिले मिळून रु. २५०००/- खर्च होत असतील तर डेट टु इन्कम रेशो २५% इतका आहे हे कळते.
३. संपूर्ण परिवाराची एकूण संपत्ति
बँक लोन देताना एखादी व्यक्ती ते लोन नीट फेडू शकेल ह्या बेसिसवर लोन देते. असे लोन देताना बँक अवेदकाच्या परिवाराच्या संपूर्ण संपत्तीचा देखील विचार करते. जर नोकरी किंवा व्यवसाय असेल तर संपूर्ण परिवाराचे इन्कम, आधीपासून असलेल्या स्थावर मालमत्ता ह्या सगळ्याचा विचार करून बँक लोनची रक्कम ठरवते. जितकी जास्त संपत्ति परिवाराकडे असेल तितकी जास्त लोन अमाऊंट मिळण्याची शक्यता वाढते.
४. भाड्यातून मिळणारे इन्कम
जर तुम्ही नवीन घर घेताना ते गुंतवणूक म्हणून घेणार असाल तर मिळू शकणाऱ्या भाड्याची रक्कम आणि भराव्या लागणाऱ्या ईएमआयची रक्कम ह्यांची तुलना करणे अतिशय आवश्यक आहे. प्रॉपर्टीच्या किमतीच्या तुलनेत त्या प्रॉपर्टीतुन वर्षाला मिळणारे भाडे किती आहे ह्यावर किती लोनची जोखीम घ्यायची हे ठरवता येते.
५. कॅपिटलायझेशन रेट
एखाद्या प्रॉपर्टीचा कॅपिटलायझेशन रेट म्हणजे त्या प्रॉपर्टीतुन होऊ शकणाऱ्या इन्कमचा रेट. तो काढताना एखाद्या प्रॉपर्टीवर संपूर्ण वर्षभर होऊ शकणारा खर्च जसे की मेंटेनन्स, प्रॉपर्टी टॅक्स इत्यादी त्या प्रॉपर्टीच्या मिळू शकणाऱ्या भाड्याच्या रकमेतून वजा करून काढता येतो. प्रॉपर्टीच्या किमतीच्या तुलनेत हा खर्च किती आहे ह्यावरुन ती प्रॉपर्टी फायदेशीर आहे किंवा कसे हे ठरवता येते.
६. ग्रॉस नेट इन्कम मल्टीप्लायर
एखाद्याने बँकेकडे लोनची मागणी केली की बँक त्या व्यक्तीने सादर केलेल्या त्याच्या संपूर्ण उत्पन्नाचा विचार करून जास्तीत जास्त किती रकमेचे लोन त्या व्यक्तीला देता येईल हे ठरवते.
तर हे आहेत ६ महत्वाचे मुद्दे ज्यांच्या आधारे आपल्याला गृहकर्ज मिळू शकते. नवीन घर घेताना ह्या ६ मुद्दयांचा विचार जरूर करा आणि घराचा फायदेशीर सौदा करा.
गृहकर्ज फेडले नाही तर, काय आणि कशी कारवाई होते? पूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गृह कर्जाचा तणाव हलका करण्यासाठी त्याच तोडीची गुंतवणूक कशी करावी ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पंजाब नॅशनल बँकेकडून इ-ऑक्शन मध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी पूर्ण माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.