ॐ हा काही निव्वळ उच्चार नव्हे तो एक परिपूर्ण ध्वनी आहे. जीवसृष्टी निर्माण झाल्यावर आलेला पहिला ध्वनी म्हणजे ओंकार असे मानले जाते.
हिंदू धर्मशास्त्रात ओंकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. हिंदू धर्मातील कोणतेही वेद, ऋचा किंवा मंत्र ओंकाराशिवाय पूर्ण होत नाहीत.
हिंदू धर्मात ओंकार हा एक संस्कार मानला जातो.
मात्र ओंकाराच्या उच्चारांचे केवळ एवढेच महत्व आहे असे नाही. तर त्याचे आरोग्यविषयक महत्व देखील तितकेच आहे.
ओंकाराच्या नियमित उच्चाराने शारीरिक दृष्ट्या अनेक फायदे होतात.
ते फायदे कोणते ते आपण आज जाणून घेणार आहोत.
ओंकाराच्या उच्चारांमुळे शरीरात कंपने निर्माण होतात. त्या कंपनांचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होऊन विविध आजरांवर उपयोग होतो.
१. थायरॉईड
ओंकाराचा नियमित उच्चार केल्याने गळ्यात कंपने निर्माण होतात. त्यामुळे थायरॉईड ग्रंथी कार्यरत होऊन त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. थायरॉईड हॉर्मोन्सचे संतुलन टिकून राहण्यास मदत होते.
२. अस्वस्थ वाटणे
तुम्हाला वारंवार अस्वस्थ वाटत असेल, anxiety अटॅक येत असतील तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. त्यामुळे अस्वस्थता कमी होते आणि स्थिर वाटू लागते.
३. तणाव/ स्ट्रेस
ओंकाराच्या नियमित उच्चारामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे स्ट्रेसचे प्रमाण कमी होऊन ताजेतवाने वाटते.
४. रक्तप्रवाह
ओंकाराच्या नियमित उच्चारामुळे हृदयाचे आरोग्य सांभाळले जाते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहून सर्व अवयवांपर्यन्त रक्तपुरवठा होण्यास मदत होते.
५. पचनशक्ती
ओंकाराच्या नियमित उच्चारामुळे पचनशक्ती वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ओंकाराचा नियमित उच्चार वजन आटोक्यात आणण्यास देखील उपयोगी आहे.
६. स्फूर्ति व चैतन्य
ओंकाराच्या नियमित उच्चारामुळे शरीरात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. शरीराला स्फूर्ति मिळते. काम करण्यासाठी नवा उत्साह मिळतो.
७. थकवा दूर करणे
दररोजच्या धावपळीने येणारा थकवा ओंकाराच्या नियमित उच्चाराने नक्कीच कमी होतो. सकाळी उठल्यावर केवळ १० मिनिटे जरी ओंकार म्हटला तरी आपोआप शारीरिक शक्ती वाढते आणि थकवा येण्याचे प्रमाण कमी होते.
८. झोप न येणे
रात्री झोपण्यापूर्वी ओंकाराचा नियमित उच्चार केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होते. झोप न लागणे, अस्वस्थ झोप लागणे, भीतीदायक स्वप्ने पडणे ह्या सर्वांवर ओंकाराचे उच्चारण फायदेशीर आहे.
९. फुफ्फुसे
ओंकाराच्या नियमीत उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. फुफ्फुसे प्रसरण पावतात व जास्त क्षमतेने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतात.
१०. पाठीचा कणा
ओंकारामुळे निर्माण होणारी कंपने पाठीच्या कण्याला बळकट बनवतात. त्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये गॅप निर्माण होणे, त्यामुळे पाठ, कंबर किंवा हात, पाय दुखणे ह्या समस्या कमी होण्यास मदत होते.
तर मित्रांनो, हे आहेत ओंकाराच्या नियमित उच्चाराने होणारे फायदे.
सकाळी उठून किंवा दिवसातल्या आपल्याला सोयीच्या असणाऱ्या कुठल्याही वेळी केवळ १० मिनिटे ओंकार म्हटला तर त्याने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो.
ह्या इतक्या साध्या उपायाने आपण हे फायदे मिळवू शकतो. ह्याचा जरूर लाभ घ्या आणि आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.