अनेक लोकांना १० ते ५ नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा असते.
करोनामुळे तर नोकरीच्या बंधनात न अडकता आपला व्यवसाय करण्याचे महत्व सर्वांना कळलेच आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची माहिती देणार आहोत जो कमी भांडवल घालून सुरु करता येऊ शकतो आणि भरपूर नफा मिळवून देऊ शकतो.
ह्या व्यवसायातून तुम्ही दररोज ४००० रुपये म्हणजेच महिना १ लाख रुपयांपेक्षा जास्त कमवू शकता. हा व्यवसाय आहे केळ्याचे वेफर्स बनवण्याचा.
सध्या आपला सगळ्यांचाच कल हा मुलांना ‘हेल्थी फूड’ देण्याकडे असतो. पण कुठलेतरी स्नॅक्स पाहिजेच, हा जो मुलांचा हट्ट असतो तो आपण सगळेच ‘स्नॅक्स’ आणि त्यातल्या त्यात हेल्थी म्हणून, केळ्यांचे वेफर्स देऊन पुरवणे यालाच पसंती देतो.
आणि म्हणूनच केळ्यांच्या वेफर्सला शहरात मागणी वाढत चालली आहे.
केळ्याचे वेफर्स अतिशय चवदार आणि पौष्टिक असतात. तसेच हे वेफर्स लोक उपासाला देखील खातात त्यामुळे केळ्याच्या वेफर्सना बाजारात मोठी मागणी आहे.
तसेच निरनिराळे बटाट्याचे वेफर्स बनवणाऱ्या कंपन्या केळ्याचे वेफर्स बनवण्याच्या क्षेत्रात नाहीत त्यामुळे देखील ह्या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे.
चला तर मग हा व्यवसाय कसा करता येईल हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया
केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- कच्ची केळी
- खाद्य तेल
- मीठ
- इतर फ्लेवर्ससाठी तिखट, मिरपूड इत्यादि मसाले.
घरी केळ्याचे वेफर्स मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी काही मशीन्सची गरज आहे. ती मशीन्स खालीलप्रमाणे –
- केळी धुण्यासाठी टॅंक
- केळी सोलण्याचे मशीन
- केळ्याचे काप करणारे मशीन
- केळ्याचे काप तळले जाणारे मशीन
- मीठ, मसाले घालून चिप्स घोळवणारे मशीन
- वेफर्स पॅकेटमध्ये भरुन पॅकेत सील करणारे मशीन
ही मशीन्स कुठून खरेदी करता येतील
केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी लागणारी सर्व मशीनरी तुम्ही इंडियामार्ट.कॉम किंवा अलिबाबा.कॉम सारख्या वेबसाइटवरुन खरेदी करू शकता. याशिवाय तुमच्या स्थानिक बाजारपेठेत सुद्धा या मशीनच्या उपलब्धतेबद्दल माहिती तुम्ही घेऊ शकता. ह्यासाठी साधारण २८००० ते ५०००० रुपये खर्च येऊ शकतो.
तसेच केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी सुमारे ४००० ते ५००० स्क्वेर फुट जागेची आवश्यकता आहे.
हा व्यवसाय उत्तम नफा मिळवून देऊ शकतो. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया.
समजा आपण ५० कि. केळ्याचे वेफर्स करायचे ठरवले तर येणारा खर्च पाहूया.
५० कि. वेफर्स करण्यासाठी साधारण १२० कि. कच्ची केळी लागतात. त्यासाठी सुमारे १००० रु. खर्च येईल.
तसेच १२ ते १५ लि. खाद्य तेल लागेल. ते 100 रु. प्रति लिटर प्रमाणे १५०० रुपयांचे होईल.
केळी तळायचे मशीन दर तासाला १० ते ११ लिटर डिझेल वापरते. त्याचे ९०० रुपये होतील.
मीठ, मसाले वगैरे साठी १५० रु लागतील.
ह्याचा अर्थ ३२०० रुपयात ५० कि. वेफर्स तयार होतील.
पॅकिंग वगैरेची कॉस्ट धरून १ किलोचा खर्च सुमारे ७० रु. प्रति किलो असा येईल.
हे वेफर्स दुकानात ९० ते १०० रु किलोने सहज विकले जाऊ शकतात.
जर दर किलोमागे १० रु नफा धरला तरी दिवसाचे ४००० रुपये सहज कमावता येतात. आणि अशा पद्धतीने महिन्यातील २५ दिवस काम केले तरी सहजपणे लाखभर रुपये कमावले जाऊ शकतात.
मशीनच्या सहाय्याने दररोज ५० कि. वेफर्स बनवणे सहज शक्य आहे. तसेच महिना 25 दिवस काम करणे देखील सोपे आहे.
तर असा आहे हा केळ्याचे वेफर्स बनवण्याचा किफायतशीर व्यवसाय. हा व्यवसाय सुरु करा आणि स्वतःच स्वतःचे बॉस व्हा.
केळीची शेती असणाऱ्यांना हा जोडधंदा मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देईल
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.