सध्या सगळ्यांनाच भरपूर पैसे कमवण्याची इच्छा असते परंतु त्यासाठी नक्की काय प्रयत्न करावेत हे मात्र समजत नाही.
यश मिळावे असे सगळ्यांनाच वाटत असते पण त्यासाठीचा मार्ग सापडत नसतो.
तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल किंवा व्यवसाय सुरु केला असेल आणि तो यशस्वीरित्या चालावा ह्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे.
अतिशय नावाजलेले बिजनेसमन आणि टाटा सन्सचे चेअरमन श्री. रतन टाटा ह्यांनी ह्या ६ टिप्स खास नव्याने उद्योगधंदा सुरु करणाऱ्यांसाठी दिल्या आहेत.
रतन टाटा स्वतः एक प्रथितयश उद्योगपती आहेत. त्यांनी त्यांचा उत्तम बिझनेस सेन्स वापरून टाटा ग्रुप ऑफ कंपनीज भरभराटीला आणली आहे.
एवढेच नव्हे तर अनेक नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नवनव्या स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात.
त्यांनी गुंतवणूक केलेल्या बहुतेक सर्व कंपन्या नावारुपाला आल्या आहेत.
अशा नव्या उद्योजकांना यशस्वी होण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर करून श्री. रतन टाटा ह्यांनी काही कानमंत्र दिले आहेत.
१. व्यवसायात नावीन्यपूर्ण कल्पना आणा
श्री. रतन टाटा सांगतात की असेच नवे व्यवसाय यशस्वी होतात जे काहीतरी नावीन्यपूर्ण कल्पना लढवून सुरु केलेले असतात. तुमचा व्यवसाय स्वतंत्र आणि वेगळा, जरा हटके असा असला पाहिजे तरच तो उत्तम चालतो आणि भरपूर नफा कमवू शकतो. नवीन आयडिया आणि नव्या प्रयोगांना टाटा जास्त प्राधान्य देतात.
२. सचोटीने व्यवहार करा
टाटा ग्रुप त्यांच्या सचोटी आणि सामाजिक बांधीलकीकरता संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. रतन टाटा नव्या उद्योजकांना देखील सचोटीने व्यवसाय करण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की व्यवसाय सुरु करून रातोरात फरार होणारे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांना खात्री वाटेल असेच व्यावसायिक यशस्वी होऊ शकतात.
३. प्रमोटर्सचा अप्रोच पॉजिटिव हवा
कुठल्याही स्टार्ट अपमध्ये स्टार्ट अप सुरु करणारे प्रमोटर्स कसे आहेत ह्यावर देखील त्या स्टार्ट अपचे यश अवलंबून असते. नवीन आयडिया घेऊन येणारे उद्योजक असले की गुंतवणूकदार देखील सहज मिळतात. त्यामुळे नव्या उद्योजकांचा हुरूप वाढतो. त्यामुळे स्टार्ट अपसाठी फंडींग करताना मी प्रमोटरचा अप्रोच पॉजिटिव आहे ना हे नक्की बघतो असे श्री. टाटा सांगतात.
४. मोठे निर्णय घ्यायला कचरू नका
कोणताही स्टार्ट अप सुरु करताना आणि तो वाढवताना अडचणी येतातच. परंतु अडचणींना घाबरून बिझनेस वाढवण्याचे निर्णय घेणे लांबणीवर टाकू नका. योग्य वेळेची वाट बघता बघता निर्णय घेण्यास उशीर होऊ शकतो असे टाटा सांगतात.
५. काम करण्याला प्राधान्य द्या
रतन टाटा असे सांगतात की अनेक उद्योजक जरा यशस्वी झाले की लगेच त्यांचे कामावरून लक्ष विचलित होते. परंतु असे होऊ देऊ नका. संपूर्ण फोकस कामावर ठेवून अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा.
६. इतरांचा आदर करा
रतन टाटा स्वतः किती साधे आणि नम्र स्वभावाचे आहेत हे आपण सर्व जाणतोच. टाटा हाच सल्ला इतरांनाही देतात. ते सांगतात की आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांना आदराने वागवा. त्यांचा योग्य तो सन्मान करा. त्यामुळे तुमच्या बिझनेससाठी विश्वासू स्टाफ तयार होईल.
तर हे आहेत ६ कानमंत्र जे नव्या उद्योजकांना यशस्वी होण्यासाठी रतन टाटा ह्यांनी दिले आहेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.