सध्या भारतात सगळीकडे डिजिटल पेमेंट करणे वाढले आहे. बँक ट्रान्सफर किंवा वेगवेगळी पेमेंट ऍप्स वापरुन पेमेंट करणे ही अगदी कॉमन गोष्ट झाली आहे. प्रत्यक्ष पैसे देऊन व्यवहार अगदी कमी प्रमाणात होतात.
परंतु त्यामुळेच भारतात सध्या ऑनलाइन आणि बँकिंग फ्रॉड होण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे.
खोटे फोन करून ओटीपी विचारून पैसे ट्रान्सफर करून घेणे, चुकीचे लोगो स्कॅन करायला लावून अकाऊंट मधील पैसे काढून घेणे, एटीएम कार्डची पिन वापरुन अकाऊंट मधील पैसे काढून घेणे अशा प्रकारचे निरनिराळे फ्रॉड सध्या होताना दिसत आहेत.
आपल्यापैकी बरेच लोक ह्या पद्धतीच्या फ्रॉडचे शिकार होतात. परंतु असे झाले तर गेलेले पैसे लवकरात लवकर मिळवण्यासाठी काय करावे, हे माहीत नसल्यामुळे ते योग्य ऍक्शन शकत नाहीत आणि मग पैश्यांचे नुकसान सोसावे लागते.
परंतु काळजी करू नका. जरी तुम्ही बँकिंग फ्रॉडचे शिकार झाले असाल तरी तुमचे गेलेले संपूर्ण पैसे परत मिळवू शकाल.
त्यासाठी काय करायला हवे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१. ताबडतोब ऍक्शन घ्या
बरेचदा बँक खात्यात फ्रॉड झालेली व्यक्ति भांबावून जाते. नक्की काय करावे हे समजत नसल्यामुळे त्यांच्याकडून काहीच हालचाल केली जात नाही आणि मग उशीर झाल्यामुळे पैसे परत मिळवणे आणि अपराध्याला पकडून देणे हे दोन्ही अवघड होऊन बसते.
खरे तर रिझर्व बँकेने सांगितल्याप्रमाणे जर एखादी व्यक्ति अशा प्रकारच्या डिजिटल फ्रॉडची शिकार झाली असेल तर त्या घटनेबाबत त्या व्यक्तीची जबाबदारी शून्य असून त्यांना त्यांचे पैसे परत मिळालेच पाहिजेत.
परंतु त्यासाठी फ्रॉड झाल्यावर ताबडतोब त्या व्यक्तीने आपल्या बँकेला कळवले पाहिजे.
२. तीन दिवसांच्या आत तक्रार नोंदवा
जर तुमच्या बँक खात्यातून सायबर क्राइम म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने केलेल्या गुन्ह्यातून पैसे काढले गेले असतील तर ३ दिवसांच्या आत तुमच्या बँकेला ह्याबद्दल कळवा.
तसेच सायबर क्राइम खात्यात किंवा लोकल पोलिस स्टेशनमध्ये देखील ह्याबद्दलची तक्रार ३ दिवसांच्या आत दाखल करा.
त्यासाठी तुम्ही https://www.cybercrime.gov.in/ ह्या वेबसाइटवर तक्रार नोंदवू शकता. ३ दिवसांच्या आत तक्रार नोंदवल्यामुळे सायबर क्राइम खात्याला तसेच तुमच्या बँकेला फ्रॉड व्यवहाराचा तसेच ते करणाऱ्या गुन्हेगाराचा माग काढणे सोपे जाईल.
३. पैसे रिफंड होऊन मिळतील
जर तुम्ही तुमच्या बाबतीत झालेल्या सायबर, डिजिटल फ्रॉडची तक्रार वेळेत दाखल केलीत तर तक्रार दाखल केल्यानंतर १० दिवसाच्या आत तुमचे पैसे रिफंड होऊ शकतात.
तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान सोसावे लागणार नाही. त्यामुळे फ्रॉड झाला तर मुळीच गप्प बसू नका. आपल्या बँकेत लेखी स्वरूपात तक्रार दाखल करा आणि आपले पैसे परत मिळवा.
४. चौकशीसाठी हेल्पलाइन
ऑनलाइन फायनॅनशियल फ्रॉड मुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी सरकारने नुकतीच एक हेल्पलाइन सेवा सुरु केली आहे. १५५२६० ह्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता.
तसेच तक्रार दाखल केल्यावर त्यासंबंधी चौकशी सुद्धा करू शकता. सध्या ही सेवा छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ह्या ७ राज्यांमध्ये उपलब्ध आहे.
परंतु लवकरच ही सेवा भारतातील इतर सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात देखील उपलब्ध होणार आहे.
तर मित्र मैत्रिणीनो, आपण नेहेमीच अशा ऑनलाइन घडणाऱ्या फ्रॉडबद्दल ऐकतो. आपल्यापैकी काहीजण त्याचे शिकारही होतात. पण अशा वेळी गप्प बसू नका.
लेखात सांगितल्याप्रमाणे तक्रार दाखल करा आणि आपले पैसे परत मिळवा.
ही माहिती आपल्या आप्त, मित्रमंडळी पर्यंत जरूर पोचवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.