ट्रेनच्या टॉयलेटच्या दरवाज्याच्या मागे एक नंबर लिहिलेला होता. त्या नंबरवर मी कॉल केला.
“तुम्ही अंजली बोलता आहात का?”
तिकडून रागातच आवाज आला, “हो, कुठून घेतला माझा नंबर! घरात कोणी आई-बहीण नाही का तुला, दिसला नंबर आणि केला कॉल!!”
“हे बघा चिडू नका. ट्रेनच्या टॉयलेट मध्ये कोणीतरी तुमचा नंबर तुमच्या नावसहीत लिहिलेला आहे. कदाचित तुमचा एखादा पक्का दुष्मन किंवा कधिकाळचा चांगला वाटलेला मित्र अशातलं कोणीतरी लिहिला असेल, हा तुमचा नंबर या अशा सार्वजनिक ठिकाणी.”
“हेच तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला. जमलं तर हा नंबर बदलून टाका. पण तरीही या नंबरवर शक्यतो पुन्हा कॉल येणार नाही. कारण मी हा नंबर इथून पुसतो आहे. काळजी घ्या, ठेवतो…”
आणि मी मोबाईल बंद करून. तो नंबर पुसू लागलो.
अंजलीचा चिडलेला आवाजच सांगत होता, की अशा सार्वजनिक ठिकाणी कोणीतरी नंबर लिहिल्यामुळे अश्लील आणि घसणेरड्या बोलण्याने ती किती त्रासलेली होती.
तेव्हापासून सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले नंबर पुसणे, ही मी नेहमीच माझी प्रयोरिटी ठेवली.
तुम्ही सुद्धा सार्वजनिक ठिकाणी असे नाव-नंबर लिहिलेले दिसले तर ते पुसून त्या अनोळखी व्यक्तीला मदत नक्कीच करू शकता.
#मनाचेTalks मधील चांगले विचार, चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी असे तुम्हाला वाटत असेल, तर यावर जास्तीत जास्त कमेंट्स, शेअर्स, लाईक्स करा… कारण फेसबुकचा अल्गोरिदम असा आहे की, ज्यावर जास्तीत जास्त कमेंट्स, लाईक्स, शेअर्स होतात तो कँटेंट पुढे आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जातो.
आता फेसबुकवर फेरफटका मारताना नेहमी तुम्ही एक गोष्ट नोट करत असाल की, बहुधा अशाच पोस्ट किंवा लेख तुम्हाला दिसतात की ज्यावर पोट भरून शिव्या घातलेल्या असतात….
पण मित्रांनो, त्या तुमच्या आमच्यासाठी जरी शिव्या असल्या तरी, फेसबुकच्या अल्गोरिदमसाठी ते कमेंट्स असतात. त्यामुळे पुढे ते लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात.
तर सांगायचा मुद्दा हा की, चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणि इतरही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर त्यावर कमेंट्स, लाईक्स आणि शेअर करून सपोर्ट करणं तुमचं काम!!
नाहीतर शेवटी निरर्थक कॉन्टेन्टनेच सोशल मीडिया भरून जाईल…
कमेंट्स मध्ये तुमचे विचार लेखापेक्षा वेगळे असतील, किंवा लेख तुम्हाला आवडला असेल/नसेल तर तेही तुम्ही लिहू शकता, किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
मनाचेTalks चे लेख व्हाट्स ऍप आणि टेलिग्राम वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप आणि टेलिग्रामची लिंक कमेंट मध्ये बघा. त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.