स्त्री बीज वाढीसाठी आहार कसा असावा

वंशसातत्य ही मनुष्याची आदिम प्रेरणा आहे. आपल्याला आपलं स्वतःचं मूल असावं असं जवळजवळ प्रत्येक स्त्री पुरुषांना वाटते.

मूल जन्माला घालण्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश असतो.

ज्याप्रमाणे उत्तम संतती होण्यासाठी पुरुष बीज उत्तम हवे तसेच स्त्री बीज देखील उत्तम हवे.

तरच निरोगी आणि सशक्त संतती जन्माला येऊ शकेल.

आज आपण स्त्री बीजाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात समजून घ्या स्त्री बीज वाढीसाठी आहार कसा असावा

आधी अशी मान्यता होती की मुलगी जन्माला आली की तेव्हाच तिच्या शरीरात स्त्रीबीजे तयार झालेली असतात. जेव्हा ती वयात येते तेव्हा ती बीजे पक्व होऊन दर महिन्याला एक अशा पद्धतीने अंडाशयातून (ओवरीमधून) बाहेर पडतात आणि त्यादरम्यान बीजाचा पुरुषबीजाशी संयोग झाला की गर्भधारणा होते.

परंतु नवीन संशोधनानुसार असे आढळून आले आहे की स्त्रीच्या शरीरात नंतरही स्त्रीबीज उत्पन्न होऊ शकते.

परंतु जसजसे स्त्रीचे वय वाढते तसतशी त्या बीजाची क्वालिटी/ प्रत कमी होत जाते.

हल्ली शिक्षण, नोकरी ह्यामुळे मुलींचे लग्नाचे वय वाढत चालले आहे.

त्यामुळे सहाजिकच गर्भधारणा होण्याचे वय देखील वाढत चालले आहे.

अशा वेळी सशक्त आणि निरोगी संतती होण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही त्यांचे आरोग्य उत्तम राहील आणि त्यांची जननक्षमता उत्तम राहील ह्याची काळजी घेतली पाहिजे.

स्त्रीबीज चांगल्या प्रतीचे होण्यासाठी आहारात काही विशिष्ठ पदार्थांचा समावेश केल्यास बराच फायदा होताना दिसून येतो.

त्या पदार्थांबद्दल आज आपण अधिक जाणून घेऊया.

१. अवोकॅडो

अवोकॅडो एक प्रकारचे सुपर फूड आहे. ह्यामध्ये फॅट कंटेंट मोठ्या प्रमाणात असते. फॅट काही नेहेमीच हानिकारक असते असे नाही. काही फॅट शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. अवोकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटस् भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे स्त्रीबीज अधिक सशक्त आणि निरोगी बनते. तसेच अवोकॅडोच्या नियमित सेवनाने स्त्रीची जननक्षमता वाढते. अवोकॅडो सॅलड, सँडविच मध्ये घालून खाल्ले जाऊ शकते.

२. डाळी आणि कडधान्ये 

स्त्रीच्या शरीरात आयर्न आणि प्रोटीनची कमतरता असेल तर ओव्हल्यूशन (स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडणे) होण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणा होणे अवघड होते. अशा वेळी डाळी आणि शेंगा असणाऱ्या भाज्या जसे की मटार तसेच कडधान्य ह्यांच्या नियमित सेवनाने शरीराला आयर्न, प्रोटीन, विटामीन, मिनरल ह्यांचा उत्तम पुरवठा होऊन जननक्षमता वाढताना दिसून येते. दररोजच्या जेवणात डाळींचा आणि उसळीचा समावेश जरूर करावा. त्यामुळे स्त्रीबीज निरोगी आणि सशक्त बनते.

३. सुका मेवा 

सर्व प्रकारचा सुका मेवा अतिशय पौष्टिक असून त्यात प्रोटीन, विटामीन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतात. खजूर, अंजीर आणि बेदाणे ह्यांच्या दररोजच्या आहारात जरूर समावेश करावा. त्यामुळे स्त्रीबीजाची क्वालिटी सुधारते तसेच स्त्रीची प्रजननक्षमता वाढते. सकाळी नाश्ता करताना किंवा दिवसभरातील कोणत्याही एका भुकेला मूठभर सुकामेवा खाणे फार उपयुक्त आहे.

४. तीळ 

पांढरे आणि काळे अशा दोन्ही प्रकारच्या तिळामध्ये झिंक भरपूर प्रमाणात असते. झिंकमुळे स्त्रीबीज सशक्त बनवणाऱ्या हॉर्मोन्समध्ये वाढ होते. तीळ चटणी करून, लाडू करून किंवा पराठे, पुरी हयात घालून खाल्ले जाऊ शकतात. ह्याचा निरोगी आणि सशक्त बीजासाठी खूप उपयोग होतो.

५. बेरी 

स्ट्रॉबेरी, बलूबेरी, रास्पबेरी अशी बेरी वर्गातील फळे स्त्रीबीजाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ही फळे नुसती किंवा स्मुदी बनवून खाल्ली जाऊ शकतात किंवा त्यांचे फ्रूट सॅलड करून देखील खाल्ले जाऊ शकते. आठवड्यातून कमीत कमी ३ वेळा बेरी वर्गातील फळे अवश्य खावीत.

६. हिरव्या पालेभाज्या 

हिरव्या पालेभाज्यांमध्ये फॉलिक अॅसिड, आयर्न, कॅल्शियम आणि विटामीन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ह्या भाज्यांच्या नियमित सेवनामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. दररोजच्या जेवणात हिरव्या पालेभाजीचा समावेश अवश्य करावा. भाजी करून किंवा स्मुदी करून ह्याचा वापर केला जाऊ शकतो.

७. आले 

आले देखील एक गुणकारी सुपर फूड आहे. आल्याच्या नियमित सेवनामुळे अनियमित पाळी येणे किंवा अतिरिक्त रक्तस्त्राव ह्या आजारांबाबत फायदा होतो. आल्याच्या नियमित सेवनाचा सोपा उपाय म्हणजे आले घातलेला चहा घेणे, तसेच आले किसून त्यात मीठ किंवा मध घालून देखील ते खाता येते. अनेक भाज्या देखील आले घालून करता येतात.

८. दालचीनी 

दालचीनी हा मसाल्याचा पदार्थ देखील अतिशय गुणकारी आहे. अंडाशय म्हणजेच ओव्हरीजच्या आरोग्याच्या दृष्टीने दालचीनीचे नियमित सेवन अतिशय फायदेशीर आहे. पीसीओडी सारख्या समस्येवर देखील दालचीनी गुणकारी आहे. दालचीनी पावडर चहात मिसळून घेता येते. किंवा मध मिसळून चाटणाप्रमाणे खाता येते. अनेक भाज्यांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी दालचीनी पावडर घातली जाते.

९. जास्त स्निग्धांश असणारे दूध 

सतत लो फॅट दूध आणि इतर पदार्थ सेवन केल्यामुळे वंध्यत्वाचा धोका वाढतो. फूल क्रीम दूध दररोज प्यायल्यामुळे स्त्रीबीज आणि ओव्हरीजचे आरोग्य सुधारते.

१०. भरपूर फायबर असणारे पदार्थ 

भरपूर प्रमाणात फायबर असणारे धान्य, कडधान्य, फळे, भाज्या ह्यांचे सेवन अवश्य करावे. त्यामुळे अतिरिक्त टोक्सीन्स शरीराबाहेर टाकले जातात तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे स्त्रीबीजाचे उत्पादन वाढून जास्त चांगल्या क्वालिटीची स्त्रीबीजे तयार होतात. तसेच स्त्रीची प्रजननक्षमता वाढते.

तर हे आहेत असे १० पदार्थ ज्यांच्या नियमित सेवनामुळे स्त्रीबीज सशक्त होईल. गर्भधारणा होण्याची शक्यता वाढेल आणि निरोगी संतती मिळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

मैत्रिणींनो, ह्याचा जरूर लाभ घ्या आणि ही माहिती जास्तीतजास्त शेअर करा आणि इतरानाही त्याचा लाभ मिळवून द्या.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।