जगभरात सगळीकडे करोनाचा उद्रेक झाल्यापासून हातांची स्वच्छता हा अगदी कळीचा मुद्दा बनला आहे. साबण आणि पाणी वापरुन वारंवार हात धुणे हे खरे तर अगदी योग्य आहे.
परंतु नेहेमीच असे करणे आपल्याला शक्य होत नाही. बाहेर असताना हात स्वच्छ करण्याची वेळ आली तर हँड सॅनीटायझर वापरणे अगदी आवश्यक होऊन बसते.
त्यामुळे आता घराबाहेर पडताना मास्क बरोबरच हँड सॅनीटायझरची बाटली देखील घेऊन निघणे आवश्यक झाले आहे. परंतु अशा वेळी आपण वापरतो ते हँड सॅनीटायझर योग्य आहे ना अशी शंका आपल्या मनात येऊ शकते. कितीही खात्रीच्या ठिकाणाहून घेतले असेल तरीही हँड सॅनीटायझरच्या शुद्धतेची शंका येऊ शकते.
आज आपण ह्याच शंकांचे घरच्या घरी निरसन कसे करता येईल ते पाहणार आहोत.
सर्वात आधी आपण हे पाहूया की कोणते हँड सॅनीटायझर वापरणे योग्य आहे?
सध्याच्या काळात कोविडपासून सुरक्षित राहण्यासाठी ज्या हँड सॅनीटायझरमध्ये कमीत कमी ६०% अल्कोहोल असेल असेच हँड सॅनीटायझर वापरणे सुरक्षित आहे.
परंतु सध्या हँड सॅनीटायझरना असणारी वाढती मागणी लक्षात घेता भेसळयुक्त अथवा वाईट प्रतीची हँड सॅनीटायझर बनवून बाजारात विकणे अगदी कॉमन झाले आहे. अशा वेळी आपण वापरत असलेल्या हँड सॅनीटायझरची शुद्धता तपासून पाहणे अनिवार्य बनते.
कारण चुकीच्या हँड सॅनीटायझरच्या वापरामुळे कोविडचा धोका तर आहेच पण त्याशिवायहाताच्या त्वचेला रॅश येणे असे काही दुष्परिणाम देखील दिसून येतात.
खालील ३ पद्धती वापरुन घरच्या घरी आपण आपल्या हँड सॅनीटायझरची शुद्धता तपासून पाहू शकतो. औषधशास्त्रातील तज्ञ असणाऱ्या डॉ. नेहा अरोरा खालील ३ पद्धती प्रमाणित केल्या आहेत.
१. टिशू पेपर टेस्ट
ही घरच्या घरी करता येण्यासारखी अगदी सोपी टेस्ट आहे.
• एक टिशू पेपर घ्या.
• त्यावर पेनने एक गोल काढा.
• त्या गोलाच्या मध्ये तुमच्याजवळील हँड सॅनीटायझरचे काही थेंब घाला.
• जर हँड सॅनीटायझरमुळे पेनाची शाई फिस्कटून विरळ झाली तर ते हँड सॅनीटायझर भेसळयुक्त आहे असे ओळखावे.
• जर काढलेल्या गोलाची पेनची शाई तशीच राहून कागद चटकन वाळला तर मात्र ते हँड सॅनीटायझर अगदी शुद्ध असून वापरण्यास योग्य आहे असे समजावे.
२. हेअर ड्रायर टेस्ट
ही देखील अगदी सोपी टेस्ट आहे. ही टेस्ट करण्यासाठी हेअर ड्रायर आणि एक बाऊल लागेल.
• एक बाऊल घेऊन त्यात काही थेंब हँड सॅनीटायझर टाका.
• त्यावर लगेच हेअर ड्रायर फिरवून ते वाळवण्याचा प्रयत्न करा.
• ५ सेकंदात लगेच जर हँड सॅनीटायझर वाळले तर ते हँड सॅनीटायझर अगदी शुद्ध असून वापरण्यास योग्य आहे असे समजावे.
• जर हँड सॅनीटायझर वाळलेच नाही किंवा उशिराने वाळला तर ते भेसळयुक्त आहे असे समजावे आणि ते वापरू नये.
३. पीठ वापरुन करायची टेस्ट
ही टेस्ट करणे गृहीणींसाठी अगदी सोपे आहे.
• थोडी कणिक अथवा कोणतेही पीठ एका बाऊलमध्ये घ्या.
• हँड सॅनीटायझर वापरुन ते पीठ मळण्याचा प्रयत्न करा.
• जर पीठ मळले गेले तर ते हँड सॅनीटायझर भेसळयुक्त( पाणी मिसळलेले) आहे असे ओळखावे.
• जर पीठ तसेच राहिले तर ते हँड सॅनीटायझर शुद्ध असून वापरण्यास योग्य आहे असे समजावे.
तर ह्या आहेत ३ सोप्या ट्रिक्स ज्या वापरुन आपण घरच्या घरी आपले हँड सॅनीटायझर शुद्ध आहे ना हे तपासून पाहू शकतो.
ह्या ट्रिक्स नक्की वापरुन पहा आणि तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंट करून कळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.