जाणून घ्या आपल्या लहान मुलांना क्रिएटिव बनवण्यासाठी काय करावे ?

निरनिराळे चित्रकार, फिल्म मेकर्स, म्युझिक डायरेक्टर्स, लेखक, कवी, अभिनेते आपापल्या क्षेत्रात खूप गाजतात. वेगळे काम करणारे, क्रिएटिव म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळते.

क्रिएटिव्ह लोकांच्या सवयी सांगणाऱ्या मागील एका लेखात क्रिएटिव्ह लोक यशस्वी का होतात याची काही करणे सांगितली होती. जिज्ञासूंना वाचण्यासाठी त्या लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे.

आपल्या मुलांनी देखील असे काही तरी करून दाखवावे असे आपल्याला वाटते. परंतु त्या सर्व प्रसिद्ध लोकांना जन्मतःच ते टॅलेंट मिळाले आहे अशा समजुतीने आपण गप्प बसतो.

क्रिएटिव असण्यामागे स्वभावाचा भाग आहे हे जरी खरे असले तरी लहानपणापासून मुलांना नेमक्या पद्धतीने वाढवले तर ती नक्कीच क्रिएटिव्ह बनू शकतात हे देखील सत्य आहे.

वर उल्लेख केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांच्या क्रिएटिव्हिटी मागे त्यांच्या पालकांचा देखील मोठा हात निश्चितपणे आहे. आपणही आपले मूल क्रिएटिव्ह व्हावे यासाठी प्रयत्न करु शकतो. कसे ते पाहूया.

लहान मुल हे एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. त्याला आपण देऊ तसा आकार ते धारण करते. आपण प्रयत्नपूर्वक मुलांमध्ये जगाकडे पाहण्याची निराळी दृष्टी आणू शकतो. मात्र त्यासाठी मुलांना वेळ देणे आवश्यक आहे. खालील प्रकारे आपण आपल्या मुलांबरोबर क्वालिटी टाइम घालवू शकतो. त्यामुळे मुले क्रिएटिव बनण्यास जास्त मदत होते.

१. गिफ्ट तयार करा

मुलांच्या मित्र-मैत्रिणींच्या किंवा भावंडांच्या वाढदिवसांना देण्यासाठी दुकानातून तयार गिफ्ट आणण्यापेक्षा मुलांना स्वतः गिफ्ट तयार करण्यासाठी उद्युक्त करा. त्यासाठी आवश्यक साहित्य मुलांना आणून द्या तसेच गिफ्ट तयार करण्यासाठी त्यांना मदत करा. अशी गिफ्ट बनवताना मुलांची कल्पनाशक्ती वापरली जाऊन नवनवीन विचारांना त्यांच्या डोक्यात चालना मिळते. निरनिराळे रंग, रंगीत कागद असे साहित्य वापरल्यामुळे मुलांचा मेंदू जास्त चांगल्या प्रकारे कार्यरत होतो. तसेच असे काम करताना त्यांना उत्साह वाटतो.

२. हस्तकलेचे नमुने तयार करा

बाजारात निरनिराळे हस्तकलेचे, आर्ट अँड क्राफ्टचे किटस् मिळतात. अशी किटस् वापरून मुले हस्तकलेचे निरनिराळे नमुने तयार करू शकतात. असे नमुने तयार करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. तसेच त्यासाठी त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत करा. तुम्हीदेखील थोडावेळ त्यांच्याबरोबर बसून असे नमुने तयार करण्यातला आनंद घ्या. पालकही आपल्यासोबत आहेत या भावनेमुळे मुलांचा उत्साह द्विगुणित होतो. असे नमुने तयार करण्यामुळे मुलांच्या बोटातील शक्ती वाढून फाइन मोटर स्किल्स डेव्हलप होण्यास मदत होते.

३. मनोरे रचण्याचे खेळ खेळा

वेगवेगळे ब्लॉक्स वापरून निरनिराळ्या आकृती आणि मनोरे तयार करण्याचे खेळ मुलांना अवश्य खेळू द्या. असे खेळ तुम्ही देखील मुलांबरोबर बसून खेळा. असे ब्लॉक्स वापरून विमान, गाडी, हेलिकॉप्टर, वेगवेगळी घरे जर मुलांनी तयार केली तर त्यांच्यातील कल्पनाशक्तीला खूप वाव मिळतो. मुलांची क्रिएटिव्हिटी वाढते.

४. स्वयंपाकात मुलांची मदत घ्या

अगदी लहानपणापासून मुलांना स्वयंपाक घरात लुडबुड करायला आवडते. असे करणार्‍या मुलांना अजिबात न रागवता त्यांना सुरक्षित ठेवून त्यांची मदत अवश्य घ्या. त्यांना छोटी छोटी कामे करायला आवर्जून सांगा. तसेच एखादा साधा पदार्थ त्यांना करू द्या. असे काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक अवश्य करा.

५. संगीत किंवा एखादी कला शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या

अभ्यास एके अभ्यास न करता मुलांना एखादी कला किंवा संगीत शिकण्यासाठी अवश्य प्रोत्साहन द्या. जितके जास्त विविध कलागुण मुले आत्मसात करतील तितके त्यांचे व्यक्तिमत्व उमदे आणि प्रभावी बनेल. लहान असताना अनेक गोष्टी एकाच वेळी शिकण्याची मुलांची कपॅसिटी असते त्याचा पुरेपूर वापर करून घेणे पालकांच्या दृष्टीने आवश्यक आहे.

६. मुलांबरोबर नवनवीन ठिकाणांना भेटी द्या

मुलांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या किंवा राजकीय महत्त्व असणाऱ्या ठिकाणांना भेटी द्या. त्यातून मुलांना निरनिराळ्या ठिकाणांची माहिती तर होतेच परंतु त्याशिवाय तेथे घडून गेलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावताना त्यांच्या विचारांना चालना मिळते. यातूनच बहुविध व्यक्तिमत्त्वाची माणसे घडतात.

७. मुलांना वाचनाची आवड लावा

अगदी लहानपणापासूनच मुलांना पुस्तके हाताळू द्या. त्यांच्या वयाला साजेशी पुस्तके त्यांना वेळोवेळी आणून द्या. अशी पुस्तके वाचल्यामुळे मुलांच्या विचारांना चालना मिळते. तसेच निरनिराळ्या विषयांची त्यांना माहिती होते. त्यातूनच स्वत: नवीन पद्धतीने विचार करण्याची सवय लागल्यामुळे मुले क्रिएटिव बनतात. तसेच वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलण्यासाठी देखील मुलांना उद्युक्त करा. त्यामुळे मुलांना पुस्तक किती समजले हे तर तुम्हाला कळेलच शिवाय आपल्या जवळ असलेली माहिती इतरांना कशी सांगायची याची मुलांना सवय होईल.

८. टेक्नॉलॉजीचा वापर करा

हल्लीचे युग हे टेक्नॉलॉजीचे युग आहे. लहान वयातच ऑनलाईन शाळा असल्यामुळे वेगवेगळी गॅजेट्स वापरणे मुलांसाठी आवश्यक बनले आहे. ह्या युगात आपले मूल मागे पडू नये म्हणून मुलांच्या वयाला साजेशा टेक्नॉलॉजीचा वापर अवश्य करा. त्यांना वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हाताळू द्या. परंतु हे सर्व तुमच्या देखरेखीखाली होत आहे ह्याची खबरदारी बाळगा.

९. स्पेस म्हणजेच अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी मुलांना उद्युक्त करा

निरभ्र आकाशाचे, त्यात दिसणार्‍या तारे तारकांचे निरीक्षण करण्यासाठी मुलांना अवश्य घेऊन जा. सायंटिफिक दुर्बिणीतून ग्रहतारे कसे दिसतात हे मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे अवकाशा बद्दल मुलांच्या मनात कुतूहल निर्माण होऊन ते त्याबद्दल अधिक वाचन करू लागतील. यातूनच मुलांची क्रिएटिव्हिटी वाढून पुढे स्पेस सायंटिस्ट होण्याकडे त्यांचा कल होऊ शकतो.

१०. सिनेमा, नाटक पहा

मुलांना त्यांच्या वयाला साजेसे सिनेमे किंवा नाटके पाहण्यासाठी अवश्य प्रोत्साहन द्या. तुम्ही देखील मुलांबरोबर बसून असे सिनेमे किंवा नाटके पाहू शकता. त्यामुळे मुलांचे मनोरंजन तर होईलच पण त्याबरोबरच त्यांना नवीन विषयांची माहिती मिळेल. सिनेमे आणि नाटके कशी बनवली जातात याबद्दल मुलांच्या मनात कुतूहल जागृत होईल. मात्र असे करताना पालकांनी मुलांच्या बरोबर असणे अतिशय आवश्यक आहे कारण आजच्या इंटरनेटच्या युगात मुलांसमोर सर्व माहितीचा मोठा खजिना सतत खुला आहे. आपली मुले काही चुकीचे पहात नाहीत ना ह्यावर आपले लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे.

११. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात वाढू द्या

मुलांना घरांच्या किंवा शाळेच्या चार भिंतीत कोंडून ठेवता इतर वेळी निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जा. बदलणारे ऋतू, त्यानुसार निसर्गात होणारा बदल या गोष्टींची मुलांना माहिती द्या. असे केल्यामुळे मुलांना आपोआपच निसर्गाची, पर्यावरणाची माहिती मिळेल आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी मुले उद्युक्त होतील.

तर या आहेत अशा काही गोष्टी ज्या आपण मुलांच्या बरोबरीने केल्या तर आपली मुले इतरांपेक्षा वेगळी, जास्त संवेदनशील आणि क्रिएटिव्ह बनू शकतात. चला तर मग आज पासून आपण ही आपल्या मुलांना असे घडवण्यासाठी प्रयत्न करूया. त्यांना क्रिएटिव्ह बनण्यासाठी प्रोत्साहन देऊया.

क्रिएटिव्ह लोकांच्या अशा ८ सवयी ज्या त्यांना इतरांपासून वेगळे बनवतात

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय