बँक ऑफ बडोदा देतेय स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या ह्या लेखात 

अतिशय स्वस्तात घर, दुकान किंवा जमीन खरेदी करण्याची मोठी संधी बँक ऑफ बडोदा घेऊन आली आहे. जर तुम्ही घर, दुकान किंवा जमीन घेण्याच्या विचारात असाल तर तुमचे हे स्वप्न स्वस्त किमतीत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बँक ऑफ बडोदा तर्फे ही संधी मिळणार आहे 8 सप्टेंबरला.

8 सप्टेंबर 2021 ला बँक ऑफ बडोदा एक मोठा ‘मेगा ई ऑक्शन’ म्हणजेच ऑनलाइन पद्धतीचा लिलाव आयोजित करत आहे.

ह्या ऑनलाइन लिलावात रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल आणि शेतकी अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. तुम्हाला ज्या प्रकारची प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असेल त्या प्रॉपर्टीवर तुम्ही लिलावात बोली लावू शकता.

देशातील महत्वाची सरकारी बँक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने ट्विट करून ह्या लिलावाची माहिती दिली आहे. बँकेने असे म्हटले आहे की ह्या लिलावात सहभागी होऊन तुम्ही तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करू शकता.

अधिक माहिती मिळवण्यासाठी बँकेने https://bit.ly/3y6R68U ह्या साईटला भेट देण्यास सांगितले आहे.

ह्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ह्या लिलावाची अधिक माहिती मिळवू शकता.

तर मित्रांनो, 8 सप्टेंबरला होणाऱ्या ह्या लिलावात मोठ्या संख्येने भाग घ्या आणि आपले घराचे किंवा व्यवसायाचे स्वप्न कमी किमतीत पूर्ण करा.

पंजाब नॅशनल बँकेकडून इ-ऑक्शन मध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी

वेळोवेळी अशी महत्त्वाची माहिती, विनामूल्य मिळवण्यासाठी मनाचेTalks वाचा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment