Tagged: Housing and Property
अतिशय स्वस्तात घर, दुकान किंवा जमीन खरेदी करण्याची मोठी संधी बँक ऑफ बडोदा घेऊन आली आहे. जर तुम्ही घर, दुकान किंवा जमीन घेण्याच्या विचारात असाल तर तुमचे हे स्वप्न स्वस्त किमतीत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण...
आपले स्वतःचे घर असावे हे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते. नोकरी मिळाली की प्रत्येकजण घर घेण्याचे स्वप्न पाहू लागतो. परंतु भारतात, महानगरात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. अगदी लहानसे घर घ्यायचे म्हटले तरी मध्यमवर्गीय लोकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. अशा वेळी मदतीला येते ते विविध बँका देत असलेले गृहकर्ज.
होम लोनचं आणि दर महिन्याला येणाऱ्या इ. एम. आय. चं टेन्शन बाजूला ठेऊन, आपल्या स्वमालकीच्या घरातच राहून, कर्जाच्या रकमेचं मुद्दल आणि व्याज आर्थिक नियोजनातून कसं उभं करता येईल याचं निन्जा टेक्निक वाचा या लेखात. दर महिन्याला येणाऱ्या EMI च नियोजन कसं करावं? | गृह कर्जाचा तणाव हलका करण्यासाठी त्याच तोडीची गुंतवणूक
10 वर्षांसाठी गृहकर्ज घेतल्यास त्याबद्दल ग्राहकास अर्धा टक्क्याने व्याज देणाऱ्या बँकेची बातमी वाचली. अशा प्रकारे कर्ज देणारी आणि त्याबद्दल कर्जदारास व्याज देणारी ही जगातील एकमेव बँक आहे. ज्यसके बँक (Jyske bank) या डेन्मार्क मधील तिसऱ्या सर्वात मोठया बँकेने आपल्या कर्जदारांना -0.5% वार्षिक व्याजदराने 10 वर्ष मुदतीचे तारणसह गृहकर्ज देऊ केले आहे. ऋण व्याजदराने कर्ज याचा अर्थ असा होतो की असे कर्ज घेणाऱ्यास कर्जापोटी बँकेस मुद्दलापेक्षा कमी रकमेचा भरणा करावा लागेल.
तारण कर्ज हे सुरक्षित कर्ज असून ते बँक, बिगर बँकिंग संस्था, सहकारी संस्था, सावकार यांच्याकडून व्यक्ती अथवा संस्था यांना देण्यात येते. सहसा हे कर्ज जमीन, घर खरेदी करण्यासाठी कमी पडणाऱ्या पैशांची पूर्तता करण्यासाठी घेतले जाते. कर्ज घेणाऱ्याची मालमत्ता गहाण ठेवलेली असल्याने ते सुरक्षित असते.
मुंबई ग्राहक पंचायत एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.
गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिसते आणि वाटते तितकी कठीण नाही. बऱ्याचदा इतरांच्या वाईट अनुभवांवरून , किंवा ऐकीव माहितीवरून सरसकट निष्कर्ष काढले जातात आणि गैरसमज पसरतात.
घर खरेदी करणे हे जितके भावनिक आहे आहे तितकेच आर्थिक व्यवहार करणाऱ्या घरातल्या कर्त्या व्यक्तीसाठी खूप आव्हानात्मक आणि किचकट काम आहे. मागील भागात आपण गृहखरेदीच्या बाबतीत सामान्यतः लोकांमध्ये असणारे १५ गैरसमज पहिले. या भागात आपण त्यापुढील मुद्दे पाहू.
तुम्ही माहितीच्या युगात राहत आहात. त्यामुळे एखाद्या कर्जासंबंधित, विशेषतः गृहकर्जा संबंधी माहिती मिळवणं फार काही कठीण नाही. पण योग्य माहिती मिळवणं हे अजूनही एक आव्हान आहे. ह्या गैरसमजुतींच्या मागे अनेक कारणंं आहेत.
हा चक्रव्युह भेदण्यासाठी, चांगला उपाय म्हणजे ‘Low Cost Housing’. एक चुकीचा समज असा आहे कीे ‘लो कॉस्ट हाऊझिंग’ हा कंसेप्ट फक्त गरीबांसाठी असतो. ‘वायफळ खर्च करणं म्हणजे श्रींमत असणं’ असाच काहीसा हा तर्क आहे. याउलट श्रीमंत लोकच अधिक चोखंदळ असतात आणि ते आपल्या संपत्तीचा योग्य विनीयोग करतात.