आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का?

आपले लहान मूल कधी चालेल ह्यासाठी उत्सुक आहात का? जाणून घ्या ह्या ६ स्टेप्स ज्यामुळे मुले लवकर चालू लागतील.

त्याचबरोबर मुले चालायला लागली की आणखी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.

घरात लहान बाळ आले की घरातल्या सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. लहानग्याच्या बाललीलांमध्ये सगळे अगदी रमून जातात. नव्या आई बाबांपासून ते आजी आजोबा, दादा/ताई, इतर नातेवाईक सगळे बाळाच्या हलचालींमध्ये रमून जातात. सगळं घरंच त्या छोट्या गाठोड्याभोवती फिरायला लागतं.

अशात बाळ एकेक प्रगती करू लागते, पालथं पडणे, पुढे सरकणे, रांगणे असे एकेक टप्पे पार करत बाळ धरून उभे राहू लागते. मग मात्र सगळ्यांना बाळानी टाकलेली पहिली पाऊले पाहण्याची घाई होते. नव्या आईबाबांना तर बाळ कधी एकदा चालू लागेल असं होऊन जाते.

चालायला सुरुवात करणे हा बाळांच्या वाढीतला एक मोठा टप्पा आहे. सगळी मुले आपापल्या गतीनुसार वाढत असतात. काही लवकर चालतात तर काही उशिरा.

परंतु हे मात्र नक्कीच खरे आहे की पालकांनी थोडे प्रयत्न केले, नीट काळजी घेतली तर मूल लवकर चालायला शिकते. आज आपण अशाच काही स्टेप्स जाणून घेणार आहोत ज्यांचा वापर पालकांनी केला तर त्यांचे बाळ नक्कीच लवकर चालू लागेल.

१. लवकर सुरुवात करा 

जरी सगळी बाळे आपापल्या गतीने वाढत असली तरी ज्या बाळांना त्यांचे आई बाबा लवकर पावले टाकायला शिकवतात ती बाळे लवकर चालतात. ह्यासाठी बाळ ७ महिन्यांचे झाले की त्याला उभे करायला सुरुवात करा. हात धरून लहान लहान पावले टाकायला शिकवा. त्यामुळे हळूहळू बाळाच्या पायांचे स्नायू मजबूत होऊ लागतील आणि ते लवकर स्वतंत्रपणे पावले टाकायला शिकेल.

२. घरी असताना बाळाला बूट घालू नका 

बरेचदा फारशी खराब आहे किंवा गार आहे ह्या कारणांमुळे बाळाला घरात सुद्धा बूट, मोजे घालून ठेवले जातात. परंतु बालरोगतज्ज्ञ असे सांगतात की जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ घरात बाळाला बेअरफुट म्हणजेच बूट किंवा मोजे न घालता ठेवावे. त्यामुळे बाळाला फरशीचा, तिच्या घट्टपणाचा अंदाज येऊन पावले टाकणे सोपे जाते. तसेच चालताना कशी पावले टाकायची त्याचे पोश्चर तयार होते. त्यामुळे बाळ स्थिर उभे राहू शकते व हळूहळू पावले टाकून चालण्यास सुरुवात करते. फरशीचा स्पर्श झाला नाही तर बाळाला पावले टाकण्याचा आत्मविश्वास वाटत नाही.

३. बाळाच्या समोर एखादी रंगीत वस्तू किंवा खेळणे ठेवा 

बाळापासून थोड्या अंतरावर बाळाचे आवडते खेळणे किंवा एखादी रंगीत, वाजणारी वस्तू ठेवली की बाळ तिकडे आकर्षित होते. हळूहळू त्या दिशेने पावले टाकण्याचा प्रयत्न करू लागते. असाच परिणाम छान गाणे किंवा म्युझिकचा सुद्धा होतो, त्या तालावर बाळ पावले टाकण्याचा प्रयत्न करते. ह्यामुळे बाळाच्या मोटर स्किल्स डेव्हलप होण्यासाठी मदत होते. आणि बाळ लवकर चालू लागते.

४. तुम्ही स्वतः बाळाला चालून दाखवा 

लहान बाळे निरीक्षणातून बऱ्याच गोष्टी शिकत असतात. बाळांचा मेंदू अगदी लहान वयापासून विकसित होत असतो. आपल्या नकळत लहान बाळे आपले अनुकरण करत असतात. बाळ उभे राहू लागले की तुम्ही स्वतः हळूहळू पावले टाकून कसे चालायचे ते बाळाला दाखवा. बसले असताना कसे उभे राहायचे आणि कसे पाऊल पुढे टाकायचे ते करून दाखवा. असे उदाहरण समोर पाहून मूल शिकू लागते आणि लवकर चालू लागते.

५. बाळांना मोकळं सोडा 

घरात सगळ्यांचंच बाळ लाडकं असल्यामुळे बाळाला सगळे सतत कडेवर घेतात. परंतु बाळाच्या चांगल्या वाढीसाठी बाळाला सारखे कडेवर घेणे योग्य नाही, बाळाला खाली ठेवले पाहिजे, स्वतंत्र खेळू दिले पाहिजे त्यामुळे बाळ स्वतः हालचाल करू लागेल. त्यातूनच पुढे स्टेप बाय स्टेप बाळ चालायला शिकेल. म्हणून बाळाला सतत कडेवर न घेता मोकळं सोडून स्वतंत्रपणे हालचाली करण्यासाठी उद्युक्त करा.

६. बाळाच्या पायांना चांगली मालिश करा 

दमदार पावले टाकत चालायचे तर बाळाचे पाय सशक्त आणि मजबूत व्हायला हवेत. त्यासाठी बाळाच्या पायांना चांगल्या तेलाने नीट मालिश करा. अगदी लहानपणापासून बाळाच्या पायांच्या हळुवारपणे वरखाली अशा हालचाली करून बाळाच्या पायांचा व्यायाम करा. त्यामुळे बाळाचे पाय सशक्त होऊन ते लवकर चालू लागेल.

ह्या आहेत अशा काही स्टेप्स ज्या नव्या आई बाबांनी घेतल्या तर त्यांचे बाळ नक्कीच लवकर चालायला शिकेल. परंतु बाळाला काही त्रास होऊ नये, बाळाचे काही कायमस्वरूपी नुकसान होऊ नये म्हणून काही काळजी घेणे देखील अतिशय आवश्यक आहे.

ती कोणती ते आपण आता पाहूया 

१. बाळ लवकर चालण्यासाठी वर सांगितलेले प्रयत्न करण्याआधी आपले बाळ चालण्यासाठी पूर्णपणे तयार आहे ना ह्याची खात्री करून घ्या. सर्व बाळे आपापल्या गतीने वाढत असतात. सगळीच बाळे आज ना उद्या चालणार असतात, परंतु बाळ पुरेसे सशक्त असेल तेव्हाच असे प्रयत्न करा. बाळ अशक्त असेल ते सशक्त होण्यासाठी आधी प्रयत्न करा. लहान बाळांच्या वॉकरचा वापर जास्त प्रमाणात करू नका.

तसेच बाळ जिथे चालण्याचा प्रयत्न करते ती जागा काळजीपूर्वक स्वच्छ आणि निर्धोक ठेवा. बाळाला लागेल, जखम होईल अशा वस्तू तेथून कटाक्षाने उचलून ठेवा. बाळाची खोली बाळाच्या वावरासाठी संपुर्णपणे सुरक्षित आहे ह्याची खात्री करून घ्या.

२. आपले बाळ लवकर चाललेच पाहिजे असा अट्टहास करून बाळाच्या मागे घाई करू नका. चालण्याचा प्रयत्न करताना बाळ दमणे सहाजिक आहे, त्याला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे.

त्यामुळे सतत प्रयत्न न करता मध्ये मध्ये बाळाला ब्रेक द्या, त्याला त्याच्या गतीने प्रयत्न करून चालू द्या.

एक लक्षात घ्या की आपले मूल चालणारच आहे, आपण फक्त त्याला हलकेच आपलं बोट द्यायचं आहे, ज्यामुळे सुरक्षित वाटून ते लवकर चालू लागेल. आपण त्याच्या चालण्याच्या प्रयत्नांना थोडासा हातभार लावायचा पण तोही अगदी काळजीपूर्वक आणि कसलाही अट्टहास न करता, मग पहा तुमचे लहानगे मूल कसे दुडूदूडू पावले टाकत चालू लागेल. पळू लागेल.

तर मित्र मैत्रिणींनो, लेखात दिलेल्या माहितीचा उपयोग करून आपल्या बाळाच्या प्रगतीचा आनंद घ्या. जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।