थायरॉईडच्या गोळ्या घेताय? ह्या चुका होऊ देऊ नका 

थायरॉईड ही आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे. या ग्रंथी द्वारे शरीरातील अनेक क्रिया योग्य रीतीने पार पाडण्यासाठी हॉ_र्मो_न्स तयार केले जातात. थायरॉईड ग्रंथी फुलपाखराच्या आकाराची असते. ती आपल्या गळ्याजवळ असते. त्यातून थायरोक्सिन आणि थायरोनिन ह्या हॉ_र्मो_न्सची निर्मिती होते. या हॉ_र्मो_न्समुळे आपल्या शरीरातील अनेक क्रिया सुरळीतपणे होण्यास मदत होते.

परंतु जर थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडले तर शरीरात थायरोक्सिन हॉ_र्मो_न्स योग्य प्रमाणात निर्माण होत नाही. अशावेळी त्या व्यक्तीस कृत्रिम थायरोक्सिन हार्मोन तयार करणाऱ्या गोळ्या घेण्याची आवश्यकता निर्माण होते. अशा गोळ्या घेतल्यामुळे शरीरातील थायरोक्सिन हॉ_र्मो_न्सचे प्रमाण संतुलित राहते.

परंतु ह्या गोळ्या योग्य प्रकारे घेणे अतिशय आवश्यक असते. ह्या गोळ्या घेताना कोणतीही चूक होऊ देणे योग्य नाही. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आज आपण याबाबत विस्ताराने जाणून घेऊया.

थायरॉईडच्या गोळ्या घेताना सहसा लोकांकडून खालील चुका होतात.

१. थायरॉईडच्या गोळ्या नियमितपणे न घेणे 

शरीरात थायरॉईड हॉ_र्मो_न्सची योग्य प्रमाणात उत्पत्ती होत नसल्यामुळे अशा गोळ्या घ्याव्या लागतात. अशा वेळी दिलेल्या गोळ्या योग्य मात्रेमध्ये नियमित स्वरूपात या गोळ्या घेणे अतिशय आवश्यक असते. तसेच ह्या गोळ्या दररोज एकाच वेळी घेणे आवश्यक असते. या गोळ्या रिकाम्या पोटी नाश्ता करायच्या अर्धा ते पाऊण तास आधी घेणे आवश्यक असते. दररोज वेगवेगळ्या वेळी गोळ्या घेणे, अधून मधून गोळ्या न घेणे किंवा बराच काळ पर्यंत गोळ्या न घेणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. शरीरातील थायरॉईडची लेवल अतिशय घसरून त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.

२. डॉक्टरांना न विचारता गोळ्यांचे सेवन बंद करून टाकणे 

अनेक वेळा लोक गोळ्या सुरू केल्यावर थोडे बरे वाटू लागले की आपण बरे झालो असे समजुन गोळ्या घेणे बंद करून टाकतात. ही चूक फक्त थायरॉईडच्या गोळ्या घेणारेच नव्हे तर इतरही प्रकारच्या गोळ्या घेणारे लोक सहजपणे करतात.

परंतु डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणत्याही गोळ्या स्वतःहून बंद करणे योग्य नाही. त्यातल्या त्यात थायरॉईडच्या गोळ्या तर हॉ_र्मो_न्सशी संबंधित असल्यामुळे कायमस्वरूपी घ्याव्या लागण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांना न विचारता गोळ्या घेणे बंद केल्यास त्याचे घातक परिणाम शरीरावर होऊ शकतात.

३. थायरॉईडच्या गोळ्यांबरोबर इतरही गोळ्या घेणे 

थायरॉईडची गोळी ही कृत्रिम हॉ_र्मो_न्स शरीरात निर्माण करत असल्यामुळे त्या गोळी बरोबर इतर गोळ्या घेणे योग्य नसते. विटामिनच्या गोळ्या किंवा इतर सप्लीमेंटस् या गोळी बरोबर घेऊ नयेत. दोन्ही प्रकारच्या गोळ्या एकत्र घेतल्या तर शरीराला दोन्ही गोळ्यांचा लाभ मिळत नाही.

आपल्याला जर थायरॉईडच्या गोळी बरोबरच इतरही गोळ्या घेणे आवश्यक असेल तर त्या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अशा गोळ्या थायरॉइडच्या गोळीच्या चार तास आधी किंवा चार तास नंतर घेणे योग्य ठरते. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपयोगी ठरतो.

४. थायरॉईडच्या गोळ्या योग्य पद्धतीने न ठेवणे 

घरातील अस्वच्छ आणि खूप ऊन येणाऱ्या जागेवर थायरॉईडच्या गोळ्या ठेवू नयेत. या गोळ्या स्वच्छ आणि कोरड्या जागेवर तसेच जेथे फार उजेड किंवा ऊन येणार नाही अशा अंधाऱ्या जागी ठेवाव्यात. तसेच त्या ठिकाणाचे तापमान सर्वसामान्य असावे.

अतिथंड किंवा अतिउष्ण तापमानात ह्या गोळ्या ठेवू नयेत. जेथे सूर्याची किरणे थेट पोहोचतात उदाहरणार्थ खिडकी, किंवा जेथील तापमान सतत कमी-जास्त होत असते उदाहरणार्थ कार, अशा ठिकाणी ह्या गोळ्या ठेवू नयेत. तसेच जेथील वातावरण सतत ओलसर असते उदाहरणार्थ बाथरूम तेथे देखील या गोळ्या ठेवू नयेत.

५. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थायरॉईडच्या गोळ्यांची मात्रा किंवा कंपनी बदलून टाकणे 

कृत्रिम हॉर्मोन शरीरात निर्माण करणाऱ्या गोळ्या या योग्य प्रमाणात घेणे अतिशय आवश्यक असते. तसेच ह्या गोळ्या योग्य पद्धतीने तयार केलेल्या आणि विश्वसनीय असण्याची खूप आवश्यकता असते. तसेच सर्व प्रकारच्या गोळ्या हॉर्मोन्स तयार करत असल्या तरीही तज्ञ डॉक्टरांच्या मते प्रत्येक पेशंटला सगळ्या प्रकारच्या गोळ्या लागू होतीलच असे नाही.

त्यामुळे अशा गोळ्या घेताना त्या योग्य प्रमाणात म्हणजेच डॉक्‍टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घेतल्या जात आहेत याची कटाक्षाने काळजी घ्यावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्यांची कंपनी अथवा ब्रॅंड बदलू नये. लवकर बरे होऊ असे समजून जास्त गोळ्या घेणे किंवा कंटाळा करून कमी गोळ्या घेणे हे दोन्ही शरीरासाठी सारख्याच प्रकारे हानिकारक असते.

आपल्या डॉक्‍टरांनी सांगितलेल्या प्रमाणात नियमितपणे गोळ्या घेणे हेच बरे होण्यासाठी आवश्यक असते. जास्त प्रमाणात थायरॉईडच्या गोळ्या घेतल्यास थकवा, हाडे कमकुवत होणे, झोप न येणे, तणाव आणि हृदयावर ताण येणे असे दुष्परिणाम दिसून येतात.

६. थायरॉईडच्या गोळ्या रिकाम्या पोटी न घेता नाश्ता किंवा जेवणाबरोबर घेणे 

कोणत्याही कंपनीच्या गोळ्या असोत परंतु कृत्रिम हॉ_र्मो_न्स निर्माण करणाऱ्या थायरॉईडच्या गोळ्या ह्या रिकाम्या पोटी घेणे आवश्यक असते. रिकाम्या पोटी हा गोळ्या घेऊन त्यानंतर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास काहीही न खाणे योग्य आहे. जर गोळी घेऊन लगेच काही खाल्ले अथवा जेवण झाल्यानंतर या गोळ्या घेतल्या तर त्या गोळ्या योग्य प्रमाणात शरीरामध्ये शोषल्या जात नाहीत. त्यामुळे गोळ्यांचा उपयोग तर होत नाहीच परंतु दुष्परिणाम मात्र होऊ शकतात.

त्यामुळे सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच त्यानंतर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास थांबून मगच पाणी आणि चहा-कॉफी याचे सेवन करावे असे सांगितले जाते. ह्या गोष्टीचे काटेकोर पालन होणे अतिशय आवश्यक आहे.

७. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डायेटरी सप्लीमेंटस् घेणे 

थायरॉईडच्या गोळ्या घेत असताना त्याबरोबर इतर कोणतेही डायेटरी सप्लीमेंटस् घेतले तर थायरॉईडच्या गोळ्या शरीरात योग्य प्रकारे शोषल्या जात नाहीत. जास्त प्रमाणात आयोडीन असणाऱ्या सप्लीमेंट्स च्या बाबतीत हा धोका दिसून येतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सप्लीमेंटस् घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यांनी सांगितल्यानुसार थायरॉईडच्या गोळ्या तसेच इतर सप्लीमेंटस् घ्यावेत.

तर या आहेत अशा काही कॉमन चुका ज्या थायरॉईडच्या गोळ्या घेत असताना जाणते अजाणतेपणी पेशंट कडून केल्या जातात. जर तुम्ही थायरॉईडच्या गोळ्या घेत असाल तर अशा चुका होणे कटाक्षाने टाळा.

गोळ्या घेण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला संपूर्णपणे माना. तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळीपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता आली तर ह्या भारतात भराभर वाढणाऱ्या आजारावर आपण नियंत्रण आणू शकतो..

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।