नैसर्गिक गुलाबी ओठ चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढवतातच पण आत्मविश्वास वाढवायला ही मदत करतात.
ओठ जर काळे पडले, तर चेहऱ्याची आकर्षकता कमी होते.
ओठ काळे होण्याची बरीच कारणं आहेत.
त्यातली काही कारणं नैसर्गिक आहेत तर काही आपल्या चुका असतात.
बाहेरच्या वातावरणात केस आणि चेहरा यांची आपण काळजी घेतो पण ओठांकडे दुर्लक्ष करतो.
क्वॉलिटी नसणारी लिपस्टिक सतत वापरणं, प्रदूषण,अतिप्रमाणात चहा, कॉफी किंवा सिगारेट ओढणं या आपल्या चुकांमुळे ओठ काळवंडतात.
काळपट ओठांना पुन्हा गुलाबी रंग येण्यासाठी काही सोपे उपाय आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
1) लिंबू
ओठांचा काळपटपणा घालवण्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या लिंबाचा आपण करू शकतो.
- १) अर्धा लिंबू
- २) चिमूटभर साखर
अर्ध्या लिंबांचा रस काढून तो आधी ओठांना लावायचा. त्यानंतर साखर बोटांवर घेऊन ती सावकाश ओठांवर रगडायची.
या उपायाने ओठावरची डेड स्कीन निघून हळूहळू ओठ गुलाबी दिसायला लागतील.
ओठांचा काळपटपणा किती गडद आहे त्यानुसार या उपायाचे चांगले परिणाम दिसतील.
नियमित काही आठवडे हा उपाय करून तुम्ही ओठांचा नैसर्गिक रंग पुन्हा मिळवू शकता.
2) गुलाब जल
गुलाबी रंग ओठांना हवा असेल, गुलाब पाण्याचा आपण वापर करू शकतो.
यासाठी साहित्य.
- १) एक चमचा गुलाबपाणी
- २) एक छोटा चमचा मध
हे दोन्ही पदार्थ एकत्र करुन ओठांवर लावायचे. बोटांनी अगदी सावकाश काही मिनिटं ओठ रगडायचे.
कोमट पाण्याने धुवून टाकायचे.
या उपायाचा परिणाम लवकर मिळण्यासाठी दिवसातून तीन वेळा हा उपाय करावा.
3) लाल रंगांच्या फळांचा रस.
डाळींबाचे लाल चुटुक दाणे ओठांना नैसर्गिक गुलाबी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
एक चमचा डाळिंबाच्या दाण्याचा रस घेऊन त्यात एक चमचा बीटचा रस, आणि चांगल्या रसरशीत लाल गाजरांचा रस मिसळायचा.
एकत्र केलेल्या या फळांचा रस ओठांवर लावून बोटांनी हलकेच रगडायचा.
नंतर हा रस ओठांवर सुकु द्यायचा. वाळल्यानंतर हलक्या हाताने काढून टाकायचा.
ओठांचा काळेपण दूर करायला डाळींबाच्या दाण्यांचा रस आणि दूध एकत्र करून आपण वापरु शकतो.
4) बदाम तेल.
निर्जीव, सुरकुतलेल्या ओठांना बदामाचं तेल नवसंजीवनी देऊ शकते.
रात्री झोपताना बदामाचं तेल ओठांवर लावून ठेवायचं.
बदामाच्या तेलात लिंबाचा रस मिसळला तर आणखी एक उत्तम घरगूती उपाय मिळून जातो.
कोणत्याही कारणानं ओठ काळे पडले तर अजिबात घाबरून जाऊ नका.
या छोट्या छोट्या घरगुती उपायांनी आपण ओठांचा काळेपणा दूर करू शकतो.थ
जाणून घ्या घरच्या घरी नैसर्गिक लीप बाम तयार करण्याची कृती
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.