पाणी की हर बूंद मे जीवन की कहानी है!
पाण्याशी जिवंत संवाद आणि आकर्षणाचा सिद्धांत
आपल्या रोजच्या जगण्यामध्ये पाण्याला किती महत्व आहे? सकाळी उठल्यावर पहिली कृती आपण काय करतो. जोपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर पाण्याचे फटकारे मारत नाही तोपर्यंत आपला दिवस सूरूच होत नाही. पाण्याचे तुषार, पाण्याच्या थेंबांचा स्पर्श माणसामध्ये चैतन्य निर्माण करतो.
म्हणून तर एखाद्या दिवशी आपण स्वच्छ आंघोळ केली नाही त्या दिवशी आपल्याला फ्रेश वाटत नाही. आपल्या शरीरामध्ये ऐंशी टक्के पाणीच भरलेले असते. पाणी आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भुमिका बजावते. पाण्याचा आणि आपला किती अतूट संबंध आहे?
आपण पाण्याने चेहरा धूतो. पाण्याने आंघोळ करतो. पाणी पितो. पाण्यानेच हातपात धूतो. स्वयंपाकालाही पाणी लागते. आपण जे अन्न, धान्य, फळे, भाज्या खातो त्या सुद्धा पाण्यापासूनच बनलेल्या असतात. ज्या प्रकारे पाणी आपल्या शरीरावर प्रभाव टाकते त्याच प्रकारे पाणी आपल्या मनाला नियंत्रित करते.
पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पाण्याशिवाय माणसाचे आस्तित्व टिकूच शकत नाही. म्हणून तर त्याला जीवन असे नाव दिले गेले आहे.
आपल्या हूशार पुर्वजांनी पाण्याचे अनेक गुणधर्म शोधून काढले होते. म्हणून आजही कुठलीही पुजा असो, सर्वात आधी पाण्याने भरलेला कलश मांडला जातो. एखादा संकल्प सोडताना, गायत्री मंत्र म्हणताना किंवा संध्या करताना पाणी पिऊन आचमन करावे लागते.
तुम्ही टी.व्ही. मालिकांमध्ये पाहिले असेल की पुर्वीच्या काळचे साधू, ऋषी, मुनि किंवा महात्मे त्यांच्याजवळ एक कमंडलू बाळगत असत आणि एखाद्याला शाप किंवा वरदान द्यायचे असेल तेव्हा हातात पाणी घेऊन त्याला अभिमंत्रित करत असत. ते पाणी समोरच्या व्यक्तीवर शिंपडले की त्यांचे विचार प्रत्यक्षात येत असे.
आतिशयोक्तीचा भाग सोडला तरी पाण्यामध्ये कसलीतरी गुढ शक्ती आहे याचे संकेत, याचे दाखले आपल्याला जागोजागी मिळतात.
तीर्थक्षेंत्रावर जाऊन आंघोळ करणे, अशुभ शक्तींच्या संपर्कात आल्यावर आंघोळ करुन शुद्ध होणे, तोपर्यंत कुठेही स्पर्श न करणे या गोष्टी अशाच रुळल्या नाहीत. पाण्यामध्ये सकारात्मकता किंवा नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती आहे. निश्चितपणे आहे.
वरवर हा अंधश्रद्धेचा भाग वाटत असला तरी जपानी वैज्ञानिक मासारु इमोटो यांनी १९९९ मध्ये ‘वॉटर फ्रॉम मॅसेजेस’ नावाचा शोधप्रबंध प्रकाशित केला. या प्रयोगामध्ये पाण्याच्या थेंबावर प्रेम, क्रोध इत्यादी वेगवेगळ्या भावनांचे प्रक्षेपण केले गेले.
मायक्रोस्कोपखाली त्यांचे रेणू तपासले असता त्यांची संरचना बदलल्याचे नोंदवण्यात आले. या प्रयोगानंतर सर्व जगामध्ये एक खळबळ उडाली.
मासारु इमोटो यांचे २००४ मध्ये आलेले ‘द हिडन मॅसेजेस ऑफ वॉटर’ या नावाचे पुस्तक बेस्ट सेलर ठरले. लेखकाचा यांचा दावा आहे की पाण्याला स्मरणशक्ती असते. सकारात्मक शब्दांना आणि सकारात्मक उर्जेला पाणी तात्काळ प्रतिसाद देते.
पाणी आपल्या भावनांना नक्कीच प्रतिसाद देते. कारण शुद्ध पाण्याला स्वतःचा असा रंग नसतो. पाण्याला गंध नसतो. पाण्याला चव नसते.
“पानी रे पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिला दो लगे उस जैसा!” पाण्याच्या याच अनोख्या गुणधर्माचा वापर करुन त्याला आपल्या इच्छापुर्तीचे साधन म्हणून वापरले जाऊ शकते.
आजच्या लेखात मी तुम्हाला पाण्याशी संवाद करुन आपल्या मनोकामना पुर्ण करण्याच्या काही साध्या सोप्या युक्त्या शिकवणार आहे. हे सगळे प्रयोग मी स्वतःवर केलेले आहेत. पुर्ण विश्वास ठेऊन अंतःकरणपुर्वक आपण जेव्हा अशा क्रिया करतो तेव्हा
त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात हे मी कित्येकदा अनुभवले आहेत.
पाण्याशी बोला. पाण्याशी संवाद साधा.
या ब्रम्हांडाने पुर्ण कराव्यात अशा तीन इच्छा निश्चित करा. उदा. तुम्हाला तुमचा ड्रीमजॉब हवा आहे. तुम्हाला एक कोटी रुपये हवे आहेत आणि तुमच्या स्वप्नातले घर तुम्हाला मिळावे अशी तुमची तिसरी तीव्र इच्छा आहे. आता एक काचेचा ग्लास घ्या. त्या ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरा.
काही सेकंद त्या पाण्याकडे शांतपणे पहा. त्या पाण्यामध्ये एक ईशतत्व आहे. त्याच्याशी संवाद साधा. मनातल्या मनात अफर्मेशन म्हणा की मला माझा ड्रिमजॉब मिळत आहे. मला एक कोटी रुपये दिले जात आहेत. माझे स्वप्नातले घर मला माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहे. ह्या माझ्या सर्व इच्छा पुर्ण होत आहेत. तुमच्या इच्छा पुर्ण होत असल्याचे चित्र, त्यांचे प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये उमटू द्या.
तुमची स्वप्ने पुर्ण होत असल्याबद्द्ल आणि जीवनात मिळालेल्या वरदानांबद्द्ल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा आणि ते पाणी पिऊन टाका.
तुम्ही ही क्रिया मनापासून आणि अंतःकरणपुर्वक केली तर आता ते पाणी साधे पाणी राहणार नाही. आता ते असे अभिमंत्रित जल आहे ज्यावर तुम्ही तुमच्या भावनांचे प्रक्षेपण केलेले आहे. त्या पाण्याच्या थेंबानी तुमच्या इच्छा ग्रहण केल्या आहेत. सकारात्मक उर्जा आणि विचार प्रक्षेपित केलेले पाणी जेव्हा आपल्या शरीरात संचार करते साहजिकच आपल्या अंतर्मनाची उर्जा शेकडो
पटींनी वाढते.
पाण्याच्या स्मरणशक्तीमूळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपली स्वप्ने, आपल्या इच्छा आपोआपच आपल्या अंतर्मनात घोळायला लागतात. एखादी गोष्ट खोल अंतर्मनात रुजली की ती प्रत्यक्षात अवतरणे याचेच नाव आकर्षणाचा सिद्धांत आहे.
प्रत्येक दिवशी आपण कमीत कमी पाच ते सहा वेळा पाणी पितो. पण अनेकदा पाण्याची बॉटल हातात घेऊन आपण आपल्या आयुष्यात असलेल्या तक्रारीचे पाढे वाचतो. नकळत पाण्यामध्ये नकारात्मक भावनांचे संचयन होते. हे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुह्राड मारण्यासारखे आहे.
म्हणून आपल्या घरातील मोठी माणसे जेवताना नकारात्मक चर्चा करु दयायचे नाहीत. शांत मनाने जेवण करणे. आनंदी भावनेने पाणी पिणे या साध्या गोष्टींना आपल्या संस्क़ृतीत प्रचंड महत्व दिले होते.
आजकाल मात्र जेवताना, पाणी पिताना टी. व्ही.वरची नको ती नकारात्मक दृश्ये बघतली जातात. यापुढे जेव्हा केव्हा तुम्ही पाणी पिण्यासाठी ग्लास हातामध्ये घ्याल, तेव्हा तुम्हाला काही क्षणांसाठी तरी सजग व्हायचे आहे. पाण्याशी सकारात्मक संवाद साधून आपल्याला हवे आहे ते आपल्याकडे आकर्षित करुन घ्यायचे आहे. आजवर हजारो लाखो लोकांनी हे तंत्र वापरले आहे आणि ही टेक्निक शंभर टक्के काम करते असे सांगून ठेवले आहे.
आपण जेव्हा मनःशक्तीशी संबंधित एखादे तंत्र वापरतो आणि आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत त्यामूळे आपण निराश होतो. अशा वेळी उदास न होता छोट्या छोट्या ध्येयांनी सुरुवात करावी. ज्याप्रमाणे तुम्हाला एखादी हाफ मॅरेथॉन स्पर्धा धावायची असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी अखंड साडेबावीस किलोमीटर अंतर धावू शकणार नाही.
पहिल्या आठवड्यात दोन किलोमीटर, त्यापुढच्या आठवड्यात तीन किलोमीटर असे अंतर वाढवत वाढवत नेल्यास रोज न थकता सराव करत राहील्यास मॅरेथॉनच्या दिवशी तुम्ही अथकपणे साडेबावीस किलोमीटरचे अंतर सहज पार करु शकाल.
आकर्षणाचा सिद्धांत, वॉटर टेक्निक आणि व्हिज्वलायजेशन या प्रत्येक तंत्रासाठी ही गोष्ट लागू पडते. सुरुवात छोट्या गोष्टींना आकर्षित करण्यापासून करा.
उदा. पुढील चोवीस तासात मला एक चांगली बातमी मिळणार आहे. मला ब्रम्हांडाकडून एक हजार रुपये दिले जात आहेत. अशा
पद्धतीचे अफर्मेशन्स व्यक्त करा. आपली इच्छा पुर्ण होत आहे, यावर शंभर टक्के विश्वास ठेवा. तुमचा ज्या देवावर विश्वास आहे, त्यांना मनोभावे प्रार्थना करु शकता. तुमचा अतुट विश्वास हीच तुमची शिदोरी आहे. शंकाग्रस्त मन माणसाच्या प्रगतीमध्ये अडथळा बनून उभे राहते.
स्वतःवर आणि देवावर असलेला विश्वास माणसाच्या मनात चैतन्य आणि उत्साह निर्माण करतो. व्हिज्वलायजेशनच्या शक्तीवर तुमचा विश्वास दृढ व्हावा यासाठी एक प्रयोग सांगतो.
डोळे बंद करुन एक पिवळाधम्मक टपोरा लिंबू डोळ्यांसमोर आणा. कल्पना करा की तुमच्या घरातल्या चाकू घेऊन तुम्ही त्याचे चार तुकडे केलेत. त्यातील एक तुकडा तुमच्या तोंडापाशी आणा आणि कल्पनेतच तो लिंबू पिळून त्याचा रस चाखा. जिभेवर पडलेल्या त्या आंबट आंबट रसाची कल्पना करा. त्या आंबट चवीने सर्व अंगाला आलेल्या झिणझिण्यांचा अनुभव घ्या.
प्रत्यक्षात लिंबू आणि चाकू नसताना केवळ लिंबाचा रस पिल्याची मनापासून कल्पना केल्याने जर तुमच्या जीभेला पाणी सुटले असेल तर तुमच्या स्वप्नांची कल्पना केल्याने तुमचे शरीर आणि तुमचे मन त्या स्वप्नांना प्रतिसाद देणार नाही असे कसे होईल?
चिंच म्हण्टले की चिंचेची चव आठवते. चविष्ट पाणीपुरीची आठवण काढली की तोंडाला पाणी सुटते. रसगुल्ला हातात नसतानाही ती चव आठवून जिभेला गुदगुल्या होतात. हे एक प्रकारचे व्हिज्वलायजेशनच आहे. पाणी हातामध्ये घेऊन अशाच ताकतीचे व्हिज्वलायजेशन केल्यास येत्या पंचावन्न दिवसात तुम्हाला प्रभावी परिणाम दिसू लागतील.
पहले विश्वास करे, फिर इस्तेमाल करे.
आभार आणि शुभेच्छा!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Awesome 👍
Thank you
खूपच महत्वाची आणि उपयुक्त माहिती…
धन्यवाद!
Thank you….