कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याआधी त्या मालमत्तेचे रेकॉर्ड तपासून पाहणे अतिशय आवश्यक असते. कारण रिअल इस्टेट मधील व्यवहारांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकच प्रॉपर्टी अनेक लोकांना विकणे, प्रॉपर्टी वरील मालकी हक्क क्लियर नसणे, एकाच प्रॉपर्टीवर अनेक जणांची मालकी असून त्यावरून वाद-विवाद असणे अशा प्रकारच्या समस्या प्रॉपर्टीच्या बाबतीत असू शकतात. त्यामुळे कोणतीही नवीन अथवा रिसेलची प्रॉपर्टी खरेदी करताना प्रोपर्टी रेकॉर्ड तपासून पाहणे फार आवश्यक असते.
आता डिजिटायझेशनच्या जमान्यात असे रेकॉर्ड घरच्या घरी ऑनलाइन एका क्लिक वर तपासता येणे शक्य झाले आहे. आज आपण असे रेकॉर्ड कसे तपासता येतील ते पाहणार आहोत…
भारतातील विविध राज्यातील प्रॉपर्टी रेकॉर्ड चेक करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा जवळ जवळ सर्वच राज्यातील जमिनींचे आणि मालमत्तेचे रेकॉर्ड सरकारद्वारे मेंटेन केले गेले आहेत. सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून असे रेकॉर्ड तपासता येतात.
आपण महाराष्ट्राचे उदाहरण पाहूया. महाराष्ट्रातील जमिनींचे आणि मालमत्तांचे रेकॉर्ड चेक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या यासंबंधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम…
१. mahabhulekh.maharashtra.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. तेथे असलेल्या मेनूमधून तुम्हाला ज्या मालमत्तेचे रेकॉर्ड चेक करायचे आहे ती मालमत्ता असलेला जिल्हा निवडा. त्यानंतर येणाऱ्या ड्रॉप-डाऊन मेनू मधून तालुका आणि गावाची निवड करा.
३. आता पुढे येणाऱ्या रकान्यामध्ये सर्वे नंबर घालून तुम्ही सदर मालमत्तेचा सातबाराचा उतारा तपासून पाहू शकता. मालमत्ता धारकाचे नाव घालून देखील सातबाराचा उतारा शोधता येतो.
४. कॉम्प्युटर स्क्रीन वर तुमच्यासमोर अधिकृत सातबारा उतारा दिसू लागेल.
५. माहितीसाठी सदर उताऱ्याची प्रिंटाऊट तुम्ही घेऊ शकता. परंतु ती प्रिंट आउट ऑफिशियल सातबारा म्हणून वापरता येणार नाही.
अशाप्रकारे महाराष्ट्रातील जमिनीचे रेकॉर्ड तपासून पाहणे शक्य आहे.
त्याच प्रकारे बांधलेली मालमत्ता म्हणजेच फ्लॅट अथवा बंगला याचे रेकॉर्ड देखील तपासणे शक्य आहे. त्यासाठी
१. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत प्रोपर्टी रेकॉर्ड वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा
२. तेथे तुमच्या नावाचे रजिस्ट्रेशन करून वेबसाईटला लॉग इन करा.
३. प्रॉपर्टी डिटेल्स शोधण्यासाठी प्रॉपर्टी असणाऱ्या जिल्हा आणि गावाची नोंद करा.
४. त्यानंतर प्रोपर्टी नंबर भरुन त्यापुढे SurveyNo./CTSNo./MilkatNo./GatNo./PlotNo. ही माहिती भरा.
५. त्यानंतर सर्चचे बटन दाबल्यावर कॉम्प्युटर स्क्रीनवर प्रॉपर्टीचे सर्व डिटेल्स दिसू लागतील.
६. या डिटेल्सची माहिती म्हणून प्रिंट आउट घेणे शक्य आहे. परंतु ते अधिकृत डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरले जात नाही, केवळ माहितीसाठी त्याचा उपयोग होतो.
तर अशाप्रकारे सहजपणे अगदी एका क्लिक वर आपण कोणत्याही जमीन अथवा बांधलेल्या मालमत्तेची रेकॉर्ड चेक करू शकतो.
तर मित्र-मैत्रिणींनो कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तिचे रेकॉर्ड अशा पद्धतीने चेक करायला विसरु नका. तसेच या बाबतीत आपल्या नातेवाईक व मित्रमंडळींना देखील सावध करा. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.