कच्च्या केळींची भाजी कशी बनते? तिच्यापासुन आपल्याला फायदे कोणकोणते असतात?

आज कच्ची केळी खात असलेल्या व्यक्तींचे प्रमाण खुप कमी झालेले आपणास दिसुन येते. पण खरे सांगावयास गेले तर ह्या कच्च्या केळी खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खुप लाभदायक ठरते.

ज्या पदधतीने आपण पिकलेली केळी खाल्याने आपल्याला जीवनसत्वे प्राप्त होत असतात. एकदम त्याचप्रमाणे कच्ची केळी खाल्ल्याने देखील आपल्या शरीराला अनेक जीवनसत्त्वे मिळत असतात.

फक्त आपल्याला हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ह्या कच्ची केळीचे सेवन आपण त्याच्यापासुन एखादे व्यंजन तयार करून किंवा त्यांना तव्यामध्ये तळुन करू शकतो.

आजच्या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत की कच्च्या केळींची भाजी कशी बनते?आणि ह्याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला कोणकोणते लाभ होत असतात.सोबतच आपण हे देखील सविस्तर समजुन घेऊ की कच्ची केळी आपल्याला निरोगी आणि तंदुरस्त कशी ठेवत असते?

कच्ची केळीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला उर्जा कशी प्राप्त होते?

आपल्याला हे माहीतच असेल की कच्ची केळीमध्ये पिकलेल्या केळीपेक्षा खुपच कमी साखर असते.यामुळे कच्ची केळीचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढुन आपल्याला मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता फार कमी असते.

हिरव्या केळीमध्ये असणारा स्टार्च हा एक स्थित स्टार्च असतो.जो छोटया आतडयांमध्ये पचवला जाईल असा नसतो.पण हे स्टार्च जेव्हा मोठया आतडयांमध्ये प्रवेश करीत असतात.तेव्हा तेथील जंतुसोबत हे किण्वित होतात.ज्याचे परिणाम स्वरूप काही चरबीयुक्त आम्ल असलेल्या लहान साखळीची निर्मिती होत असते.

ज्याला शोषुन घेण्याचे काम आपले शरीर करत असते.आणि ह्याचमुळे आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होते.

कच्च्या केळीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक अशी कोणकोणती पोषक तत्वे असतात?

कच्ची केळीमध्ये खालील पोषक तत्वे असलेली आपणास आढळुन येते.

1) 5 ते 6 ग्रँम कँल्शिअम

2) 1.09 प्रोटीन

3) 90 टक्के कँलरी

4) आयर्नचे प्रमाण 0.29

5) स्टार्च

6) फायबर

7) कार्बोहायड्रेट 21.4

कच्ची केळी खाण्याचे फायदे कोणकोणते असतात?

कच्ची केळी खालल्याने आपल्या शरीराला तसेच आरोग्याला अनेक फायदे होत असतात.आणि ते फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

1)कच्ची केळीमध्ये समाविष्ट असलेले फायबर युक्त पदार्थ आपल्या पचनसंस्थेसाठी खुप फायदेशीर ठरत असतात.

2) कच्ची केळी खाल्याने आपल्याला हदयाशी संबंधित कोणत्याही समस्या उदभवत नसतात.म्हणजेच कच्ची केळीचे सेवन केल्याने आपल्या हदयाचे आरोग्य उत्तम राहते.

3) कच्ची केळीचे सेवन केल्याने अपचन होत नाही.याचसोबत मल विसर्जनाच्या प्रक्रियेत आपल्याला त्रास होत नसतो.

4) कच्ची केळीचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील साखर आणि रक्त हे दोघे नियंत्रणात राहते.ज्यामुळे आपल्याला मधुमेह तसेच रक्तदाबाची समस्या जाणवत नसते.

5) कच्ची केळीचे सेवन केल्याने आपल्या शरीरात अतिरीक्त कोलेस्टेराँल निर्माण होत नाही.ह्यामुळे आपल्याला हदय विकाराचा आजार होत नसतो.

6) कच्ची केळी खाल्याने आपल्या शरीराची चरबी नियंत्रणात राहते.

7) कच्ची केळी खाल्याने आपली किडनी चांगल्या पदधतीने कार्य करत असते.

8) कच्ची केळीमध्ये डायटरी फायबर देखील असतात ज्यामुळे आपल्याला दीर्घकाळ भुक लागत नसते.

कच्च्या केळींची भाजी कशी बनते?

कच्ची केळीचे सेवन करण्यासाठी आपण तिची भाजी देखील बनवू शकतो.

कच्च्या केळींची भाजी बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य :

  • कांदा
  • कच्ची केळी
  • नारळाचा किस
  • जिरा
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • कढी पत्ता
  • राई

कच्च्या केळीची भाजी बनवण्याची कृती :

सगळयात पहिले आपल्याला केळीचे साल काढुन त्यांना कापावे लागते.मग त्या कापलेल्या केळीच्या तुकडयांना गार पाण्यात ठेवावे.

त्यानंतर मग आपण तवा घ्यावा आणि त्यात तेल ओतावे.आणि ते तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे.तेल गरम झाल्यानंतर त्यात राई टाकावी ती व्यवस्थित शिजु द्यावी.मग राई व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आपण लाल मसाला पावडर,कढी पत्ता,कांदा टाकुन व्यवस्थित उलथनीने हलवुन घेऊन भाजुन घ्यावे.

जेव्हा आपल्याला तव्यामधील कांदे लाल जरक झाले असे दिसुन येईल तेव्हा मग त्यात पाण्यात थंड होत ठेवलेली केळी टाकावी.मग तव्यामध्ये केळी ओतल्यावर त्यात चवीपुरता थोडी हळद आणि मीठ टाकावे.आणि उलथनीने परतुन घ्यावे.

मग पाच ते दहा मिनिट तवा झाकुन ठेवावा.जोपर्यत केळीची भाजी चांगली शिजत नाही तोपर्यत.आणि थोडया वेळात भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये थोडाफार नारळाचा किस,जिरा आणि खसखस टाकावे.पुन्हा मग भाजी उलथनीने परतुन घ्यावी.

शेवटी गँसचा वेग थोडा कमी करत भाजी शिजत टाकावी.मग थोडयाच वेळात तुम्हाला केळीची भाजी तयार झालेली दिसुन येईल.यानंतर तुम्ही आरामशीर तिचा आस्वाद घेऊ शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।