मस्त गुलाबी थंडी पडल्यावर धुक्यानं वेढून गेलेल्या वातावरणात आलं घातलेला चहा हे तर स्वर्गसुखच, नाही का?
तर हा आल्याचा चहा फक्त मनालाच सुखावणारा नाही बरं का, तर आपल्या आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी आहे.
थंडी सुरू झाली की आई-आजी पटकन आल्याचा गरमागरम चहा प्रत्येक घरी करतातच.
कारण त्यांना माहिती असतं, घशातील संसर्ग सर्दी-खोकला यापासून आल्यामुळं आपलं संरक्षण होतं.
बॅक्टेरियाशी लढणारं हे आलं म्हणजेच अद्रक थंडीच्या दिवसांमध्ये वरदानच आहे.
अगदी थोड्याच सामग्रीत परफेक्ट चविचा आल्याचा चहा घरी तयार होऊ शकतो.
सगळ्यांना आवडणारा हा अद्रकवाला चहा करण्यासाठी दूध, पाणी, चहा पावडर, साखर आणि थोडं आलं एवढंच साहित्य हवं.
चहाचे खरे शौकीन असाल तर आल्याच्या चहाची ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा.
साहित्य
1) 1/2 कप पाणी
2) 1/2 कप दूध
3) 1 इंच आलं
4) 2 टिस्पून साखर
5) 2 टीस्पून चहा पावडर
प्रत्येकाची चहा करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
एक घोट घेतल्यानंतर आsssहाss म्हणावसं वाटणारा चहा तयार करण्यासाठी मात्र ही कृती ट्राय करा.
Step 1
एका चहाच्या पॅनमध्ये पाणी घेऊन ते गरम होऊ द्या. पाणी गरम झाल्यानंतर त्यात किसलेलं आलं आणि चहा पावडर घालून हे मिश्रण उकळू द्या.
Step 2
उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये दूध मिक्स करा. साखर घालून पुन्हा एकदा एक उकळी येऊ दया.
Step 3
आपल्या आवडत्या मग मधे हा आल्याचा चहा गाळून घ्या आणि या गरमागरम चहाचा आस्वाद घ्या.
तर मित्रांनो या थंडीच्या सीझनमध्ये हा आल्याचा चहा तुम्ही नक्की करून बघा!
जाणून घ्या लवंगांचा चहा कसा करायचा? काय आहेत त्याचे औषधी गुणधर्म?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.