या दिवाळीत विसरा वजन आणि शुगरची चिंता,
फॉलो करा या छोट्या टीप्स.
दसरा झाला की दिवाळीचे वेध लागतात.
दिवाळीच्या तयारीत घर सजवणं, भेटवस्तुंची देवघेव याबरोबरच महत्वाचे असतात ते खास दिवाळीसाठी असणारे गोड पदार्थ.
पण मित्रांनो हीच ती वेळ जेंव्हा आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.
घरामध्ये इतके खमंग, टेस्टी पदार्थ तयार होत असतात की जीभेवर ताबा ठेवणं जरा जडच जातं.
आणि मग वजन आणि शुगर उसळ्या मारायला लागतात.
दिवाळीच्या वातावरणात फराळाचा आस्वाद न घेता वजनकाटा आणि शुगर लेवलवर नजर ठेवून उदास बसणं हा तर अन्याय आहे की मित्रांनो नाही?
पण, आता चिंता सोडा. या छोट्या टीप्स फॉलो करा, दिवाळीच्या पदार्थांचा आस्वाद घ्या.
स्वतःचं आरोग्य जपा आणि शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये ठेवा.
1) दुपारचं जेवण चुकवू नका.
मधुमेही व्यक्तींनी त्याचबरोबर, आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या व्यक्तींनी, वजन नियंत्रणात ठेवण्याविषयी आग्रही असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायचं आहे की दुपारचं जेवण अजिबात चुकवायचं नाही.
कार्बोहायड्रेटस् असणारे पदार्थ दिवसभरात थोड्या थोड्या प्रमाणात शरीरात जातील असं पदार्थांचं विभाजन ही तुम्ही करायला हवं.
कार्बोहायड्रेटस आणि अतिशय गोड पदार्थ यांचं एकत्र सेवन करू नका.
2) पोषक घटकांचं विभाजन
दिवाळीच्या दिवसात फक्त कर्बोदकचं नाही तर इतर सर्व पोषक घटक देखील आपल्या दिवसभराच्या जेवणात विभागून घ्या.
ज्यामुळे ते योग्य पध्दतीने शरीरात शोषले जातील आणि शरीराच्या विविध कार्यांसाठी वापरले जातील.
3) साजूक तुपातल्या मिठाईंचा आग्रह धरा.
तुपातली मी मिठाई म्हणजे वजन आणखी वाढणार अशी आपल्याला भीती असते.
पण घरगुती दर्जेदार तुपात केलेल्या मिठाईंमुळे
तुमच्या आरोग्याला फायदा होतो.
बाजारातली मिठाई बहुतेक हायड्रोजनेटेड तेलाने बनलेल्या असतात.
ज्यामुळे वजन आणि Bad Cholesterol वाढू शकतं.
त्यामुळे तूप वापरून तुम्ही तुमची मिठाई घरीच तयार करू शकता, किंवा आपल्या ओळखीच्या विश्वासार्ह व्यक्तीकडून तयार करवून घेऊ शकता.
रव्याचे, बेसनाचे लाडू, करंज्या, शंकरपाळ्या हे पदार्थ जर साजूक तूप वापरून तयार केले तर आरोग्यासाठी उत्तम ठरतील.
4) फळांचा आहारात आवर्जून समावेश करा.
मित्रांनो दिवाळीच्या दिवसात आवर्जून फळं खा.
5) व्यायामाला विसरू नका.
उत्साही, उत्सवी वातावरणात रोजचा व्यायाम करायला वेळ राखून ठेवा.
व्यायाम केल्यानं तुम्हाला जास्तीच्या कॅलरीज बर्न करायला मदत मिळेल आणि उत्सवाच्या वातावरणात दिवसभर उत्साही रहायला मदत होईल.
व्यसनांपासून दूर राहणं हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांसाठी नेहमीच एक उत्तम पर्याय आहे.
6) खाण्यावर नियंत्रण
या उत्सवाच्या वातावरणात एकमेकांच्या घरी भेट देतो, गेट टू गेदरची तर रेलचेल असते.
अशावेळी चॉकलेटसारखे पदार्थ समोर आले तर मन नाराज होतं.
म्हणूनच अति प्रमाणात चॉकलेट्स खाणं किंवा अजिबात चॉकलेट न खाणं यातला सुवर्णमध्य साधता आला तर लक्षात घ्या या दिवाळीत तुम्ही आरोग्याची उत्तम काळजी घेत आहात.
7) फ्रेश ज्युसचा पर्याय निवडा.
दिवाळीच्या वातावरणात सेलिब्रेशनचा मूड असतो.
अशावेळी सोडायुक्त कोल्ड्रिंक्स तयार आणणं आपल्याला सोपं वाटतं.
पण यात आरोग्याची हानी आहे हे लक्षात घ्या आणि ताज्या फळांचाच रस निवडा.
रोस्टेड ड्रायफ्रुट ऐवजी फ्राईड ड्रायफ्रुटचा पर्याय वापरा.
तुमची ही दिवाळी आरोग्यदायी करण्यासाठी, दिवाळी उत्सवानंतर वाढणारं वजन आणि शुगरची चिंता मिटवण्यासाठी या साध्या सोप्या गोष्टी नक्की ट्राय करा.
….आणि ही दिवाळी उत्साहाने साजरी करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.