“देवाची करणी आणि नारळात पाणी“ असे म्हटले जाणाऱ्या नारळाच्या पाण्याचे महत्व आपण सगळे जाणतोच. आज आपण नारळाच्या पाण्याचे पौष्टिक मूल्य, ते पाणी पिण्याचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे हे सगळे जाणून घेणार आहोत.
सर्वांच्या आवडीचे शहाळे आणि या शहाळ्यात असणारे पाणी म्हणजेच नारळपाणी. नारळपाणी हे अतिशय थंडावा देणारे, चवीला मधुर परंतु किंचित तुरट असणारे आणि अनेक वैद्यकीय गुणधर्म असणारे असे असते.
नारळाचे पाणी अत्यंत कमी कॅलरीज असल्यामुळे वजनवाढीबाबत दक्ष असणाऱ्या लोकांसाठी वरदान आहे.
तसेच नारळाच्या पाण्यात फॅटसचे प्रमाण अगदी कमी असते त्यामुळे त्यापासून कोलेस्ट्रॉल वाढण्याचा देखील काहीच धोका नसतो.
चार केळ्यांमध्ये जितके पोटॅशियम असते त्याहीपेक्षा जास्त पोटॅशियम एका शहाळ्याच्या पाण्यात असते. नारळाचे पाणी हे सुपर हायड्रेटिंग म्हणून ओळखले जाते कारण ते प्यायल्यामुळे शरीराची पाण्याची कमतरता भरून निघते.
नारळाचे दूध किंवा नारळाच्या तेलात असणाऱ्या जास्त फॅटस् सारखे फॅटस् नारळ पाण्यात नसतात. त्याउलट नारळ पाण्यात असे कार्बोहायड्रेट्स असतात जे सहजपणे पचवले जाऊ शकतात.
ॲथलिट किंवा स्पोर्ट पर्सन साठी नारळ पाणी हे एक अतिशय गुणकारी पेय आहे. कारण तयार मिळणाऱ्या स्पोर्ट्स ड्रींक्सपेक्षा कितीतरी कमी कॅलरीज, कमी सोडियम आणि जास्त प्रमाणात पोटॅशियम नारळ पाण्यामध्ये असते.
त्याच प्रमाणे इतर कोणत्याही पेयापेक्षा नारळ पाण्यामध्ये असणारे साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. आणि साखरेचे प्रमाण कमी असूनही नारळ पाण्याची चव अतिशय मधुर असते.
बरेचसे ॲथलिटस्, स्पोर्ट पर्सन आणि त्यांचे ट्रेनर इतर कोणत्याही स्फूर्तीदायक पेयापेक्षा नारळ पाणी पिण्याला जास्त पसंती देतात.
नारळपाणी नियमित पिण्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जाण्यासाठी मदत होते. शरीरातील टॉक्सीन्सचे प्रमाण कमी होते.
याचाच अर्थ नारळाचे पाणी आरोग्यासाठी, ताजेतवाने राहण्यासाठी आणि शरीराच्या पोषणाच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. भारतामध्ये तर नारळ आणि शहाळी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मग आपण ह्या कल्पवृक्ष असणाऱ्या नारळाचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायलाच हवा.
तर मग मित्रांनो आपणही संकल्प करूया, इतर कोणतीही कार्बोनेटेड पेये पिण्यापेक्षा आरोग्यदायी असणारे नारळाचे पाणी आपण नियमित पिऊया. परदेशी कंपन्यांचे उत्पादन असणारी आरोग्याच्या दृष्टीने घातक असणारी पेये पिण्यापेक्षा नारळाचे पाणी पिणे जास्त चांगले आहे.
आपल्या स्वदेशी पेयाची महती सांगणारी, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नारळाच्या पाण्याच्या गुणधर्मांचा त्यांना लाभ होण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.