आयुष्यभर संपत्तीसाठी आणि मालमत्ता मिळवण्यासाठी वणवण केली जाते.
स्वतः कमावण्याबरोबरच आपल्या पूर्वजांच्या संपत्तीत ही त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला वाटा मिळावा असं प्रत्येकाला वाटतं.
मालमत्तेच्या बाबतीत पहायला गेलं तर कौटुंबिक भांडणांना अंतच नाही.
तुम्हांला माहीत आहे का? भारतात कोर्टात जितक्या केसेस पेंडिंग आहे त्यातल्या बऱ्याच केसेस या मालमत्तेच्या वाटणी संबंधी आहेत.
भारतीय कायद्यात “वारस” या संकल्पनेला मान्यता आहे.
वारस म्हणजे अशी व्यक्ती जिचा तिच्या पूर्वजांच्या संपत्तीमध्ये वाटा असतो.
हिंदू कायदा हा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मामध्ये जन्मलेल्या व्यक्तींसाठी लागू होतो.
त्याचबरोबर यापैकी कोणताही धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीलाही हा कायदा लागू होतो.
लग्नानंतर एखाद्या व्यक्तीने या चार पैकी एखादा धर्म स्वीकारला असेल तर त्या व्यक्तीसाठीही हा हिंदु वारस कायदा लागू होतो.
हिंदू वारसाहक्क नुसार मृत व्यक्तीच्या संपत्तीचे 16 वारसदार असतात.
हे 16 वारसदार कोण कोणते हे जाणून घेऊया….
ज्याच्या नावावर स्थावर मालमत्ता, संपत्ती आहे अशी व्यक्ती मृत पावली आणि तिच्या नावावर असणारी संपत्ती जर वडीलोपार्जित असेल म्हणजे मृत व्यक्तीला वारसाहक्काने मिळालेली असेल तर अशा संपत्तीच्या वारसाची नोंद ही हिंदू वारसा कायदा 1956 नुसार होते.
या वडिलोपार्जित संपत्तीचं मृत्युपत्र करता येत नाही.
मात्र मृत व्यक्तीने संपत्ती स्थावर मालमत्ता स्वतः मेहनत करून मिळवलेली असेल तर आणि मृत्यूपूर्वी त्या व्यक्तींनं मृत्यूपत्र करून ठेवलं असेल तर त्या मृत्यूपत्रानुसार जी व्यक्ती पात्र आहे त्या व्यक्तीला संपत्ती मिळते.
मात्र मृत व्यक्तीचं मृत्यूपत्रच नसेल तर वारस हा हिंदू वारसा कायदा 1956 नुसार ठरवला जातो.
मित्रांनो एक खूप महत्त्वाची गोष्ट या अनुषंगाने सांगावीशी वाटते की प्रत्येकानं आपलं मृत्युपत्र तयार करणं हे पुढची भांडण टाळण्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं.
हिंदू वारसा कायदा 1956 च्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सर्वात प्रथम वर्ग-1 च्या सोळा वारसदारांना प्राधान्य दिलं जातं
आजच्या लेखात आपण माहिती वाचतो आहे ती एखाद्या पुरुषाच्या मृत्युनंतर ठरवल्या जाणाऱ्या वारसांविषयीची आहे
एखाद्या महिलेच्या संपत्तीचे वारसदार हा एक स्वतंत्र विषय आहे.
हिंदू वारसा कायदा 1956 कलम 8 नुसार वर्ग एक चे वारसदार
1) मुलगा
2) मुलगी
3) विधवा (मृत व्यक्तीची पत्नी) (एकापेक्षा जास्त असतील तर सर्वांना एकत्रित वाटा)
4) आई
5) पूर्व मृत मुलाचा मुलगा (नातू) म्हणजे निधन झालेल्या (हयात नसलेल्या) मुलाचा मुलगा (नातू)
6) पूर्व मृत मुलाची मुलगी (नात)
7) पूर्व मृत मुलाची विधवा (सून)
8) पूर्व मृत मुलीचा मुलगा. (नातू)
9) पूर्व मृत मुलीची मुलगी (नात)
10) पूर्व मृत मुलाच्या पूर्व मृत मुलाचा मुलगा (पणतू)
11) पूर्व मृत मुलाच्या पूर्व मृत मुलाची मुलगी (पणती)
12) पूर्व मृत मुलाच्या पूर्व मृत मुलाची विधवा (नातसून)
13) पूर्व मृत मुलीच्या पूर्व मृत मुलीचा मुलगा (पणतू)
14) पूर्व मृत मुलीच्या पूर्व मृत मुलीची मुलगी ( पणती)
15) पूर्व मृत मुलाच्या पुर्व मृत मुलीची मुलगी (पणती)
16) पूर्व मृत मुलाच्या पुर्व मृत मुलीचा मुलगा (पणतू)
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
नमस्कार,
माझं नाव राहुल चंद्रकांत बेलेकर
नाशिक
माझ्या वडिलांचा मृत्यु दिड वर्ष पूर्वी झाला.त्यांनी घर माझ्या बहिणीचा नावावर केलं आहे,आम्ही एकूण 3 भाऊ बहीण
मला मोठा भाऊ आहे, बहिण सर्वात मोठी
तीचं लग्न झालं आहे,आम्हा तिघांच लग्न झालं आहे ,आता या परिस्तिती मध्ये बहीण मला हक्क द्यायला नाही म्हणत आहे, मी गेली 13 वर्ष वेगळा राहतोय,तिला बोलो मला वरती रूम बांधून दे तर ती नाही बोलत आहे शिव्या देत आहे अश्या परिस्थिती मध्ये मी काय करावं?
तुमच्या विशिष्ट परिस्थिती बद्दल तुम्ही कायदेशीर मार्गदर्शन घ्या.
नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.
मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom
मनाचेTalks फेसबुक पेज:
https://www.facebook.com/ManacheTalks/
मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:
https://www.facebook.com/ManacheTalksHindi/
सर माझ्या आजोबांनी त्यांना मिळालेली वडिलोपार्जित जमीन ही माझ्या मोठ्या भावाच्या नावे करून दिली आहे. वडील जिवंत आहेत परंतु त्यांना नोकरी (मैल कुल्ल्या)असल्यामुळे पेन्शन साठी अडचण येऊ नये म्हणून त्यांनी ही ती जमीन मोठ्या मुलाच्या नावे होऊ दिली आहे.त्यावेळेस आम्ही लहान होतो.परंतु आजरोजी मोठा भाऊ आम्हाला त्या जमिनीत वाटणी देत नाही.त्यासाठी आम्हाला काय करता येईल?