हिवाळा आला की बाजार हिरव्यागार मटारने सजतो.
मटार ब-याच जणांना खूप आवडतो.
मसाले भातात, पुलाव, भाजीमध्ये, पोह्यांवर, उपीटात , पावभाजी मध्ये ताज्या ताज्या मटारचा वापर करण्यासाठी गृहिणी आणि खवय्ये उत्सुक असतात.
या हिरव्यागार मटारमुळे पदार्थ चविष्ट होतो यात शंकाच नाही.
मात्र कुठलीही गोष्ट अति प्रमाणात वाईटच ठरते त्याप्रमाणं मटार सुद्धा जास्त खाल्ला तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
कित्येक लोक मटार खाण्यासाठी हिवाळ्याची वाट बघत असतात.
हिवाळा आला रे आला आणि बाजारात मटारची आवक सुरु झाली की किलोंच्या हिशोबात त्याची खरेदी होते.
काही उत्साही मेंबर तर हा मटार सोलून फ्रिजर मध्ये व्यवस्थित साठवून ठेवण्याचाही प्रयत्न करतात.
पण खरंच तसं करण्यापूर्वी मटर अति प्रमाणात खाल्ल्यामुळे काय नुकसान होतं ते नक्की जाणून घ्या.
मटार जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे होणारं नुकसान.
1) व्हिटॅमिन के चं प्रमाण वाढतं.
तसं पाहायला गेलं तर शरीरांमध्ये व्हिटॅमिनचे फायदे भरपूर असतात. मात्र त्यांचाही अतिरेक वाईटच ना?
मटार मध्ये व्हिटॅमिन-के असतं ज्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशींना वाढण्यापासून रोखलं जातं.
मात्र त्याच बरोबर हे व्हिटॅमिन-के रक्त पातळ करतं आणि प्लेटलेट्स काउंट ही कमी करतं.
त्यामुळे होतं काय की जखमा भरायला वेळ लागतो.
2) संधिवाताचा त्रास होऊ शकतो
हिरव्या मटार मध्ये प्रोटीन अमिनो ऍसिड आणि फायबर असतं.
यामध्ये विटामिन-डी सुद्धा आहे जे हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचं असतं.
मात्र जास्त प्रमाणामध्ये मटार खाल्ल्यामुळे कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं आणि यूरिक ऍसिडचे प्रमाणही वाढायला मदत होते.
आणि मग त्यामुळेच संधिवाताचा त्रासही वाढतो.
3) शरीरातील पोषक घटकांना अडथळा
हिरव्या वाटाण्यातील फायटिक ऍसिड आणि लेक्टिन, पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा निर्माण करतात.
त्यांच्यामुळे पचनाचा त्रासही उद्भवतो. त्यामुळे होतं काय की शरीरात जे काही पोषक घटक असतात, त्यांची कमतरता निर्माण होते.
मित्रांनो मटारच्या अतिसेवनामुळं तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
4) वजन वाढतं.
हिरवा वाटाणा जर फार प्रमाणात तुम्ही खाल्लात तर तुमचं वजन प्रमाणाबाहेर वाढू शकतं.
खरंतर मटर मध्ये प्रोटिन्स असतात मात्र अतिप्रमाणात मटार खाल्ले तर तुम्ही वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकणार नाही.
5) अति प्रमाणात सेवनाने पोटात सूज येते
अभ्यासांती असं लक्षात आलं आहे की, मटारचं जास्त सेवन केल्यानं पोटात सूज येते.
हा हिरवा वाटाणा अतिसेवनाने पोटात वायू म्हणजे गॅसेस निर्माण करतो. त्यामुळे अन्न पचायला ही त्रास होतो.
तर हे पाच गंभीर परिणाम लक्षात घेऊनच हिवाळ्यात मटार किंवा हिरवा वाटाणा किती प्रमाणात खायचा हे तुम्हीच ठरवायचं आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.