बीटाच्या रसामुळे खरंच किडनी स्टोन होऊ शकतो? सत्य काय आहे जाणून घ्या, आणि बीटाचा रस कोणत्या पद्धतीने घ्यायचा हे ही जाणून घ्या
तसं पाहायला गेलं तर बीट खाण्याचे बरेच फायदे आहेत.
मात्र बीट अधिक प्रमाणात खाल्ला तर मात्र शरीराला अपाय होऊ शकतो.
आणि खूप प्रमाणात बीट खाल्लं तर त्याचा किडनी वरती परिणाम होतो.
बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. बीट ज्यूस आणि पावडर या दोन्ही स्वरूपामध्ये वापरला जातो.
मात्र बीट कोणत्याही प्रकारात अधिक प्रमाणात घेतला तर मात्र किडनीवरती त्याचा थेट परिणाम होतो.
बीटा मध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे किडनी स्टोन निर्माण होऊ शकतो.
चला तर मग बीटा मुळे काय काय नुकसान होऊ शकतं याविषयी आज जाणून घेऊया.
बीटामुळं आपल्या किडनीचं नेमकं काय नुकसान होतं?
किडनी आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे.
कंप्यूटर मधली सर्वात महत्त्वाची फाईल जशी असते, तशी किडनी आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
शरीरातील टाकाऊ पदार्थांना बाहेर टाकण्याचं अतिशय महत्त्वाचं काम किडनी द्वारे केलं जातं
याशिवाय किडनी मधून शरीरातलं रक्त, पाणी, मीठ आणि खनिज यांचं संतुलन राखलं जातं
बीटा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिलेट मिळतं.
हे ऑक्सिलेट आपल्या शरीरात अधिक प्रमाणात गेलं तर शरीरात असणाऱ्या कॅल्शियम बरोबर मिसळतं.
मग यांना किडनी बाहेर फेकणं अवघड होऊन बसतं. मग त्याचे स्टोन तयार होतात.
तुम्हाला जर आधीपासूनच किडनीची समस्या असेल तर बीट अजिबात न खाणं उत्तम.
किंवा फार तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच खाल्लं तर हरकत नाही.
बीटा मध्ये पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस हेही सापडतात ज्यांच्यामुळे किडनी वर अधिक ताण येऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीला खूप थकवा, एकाग्रतेमध्ये अडचण आणि लघवी मधून रक्त पडत असेल तर ही सारी लक्षणे किडनी खराब होण्याची आहेत.
1) बीटमुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते
बीट खाल्ल्यावर खाणा-या व्यक्तीची ब्लड शुगर लेवल वाढू शकते.
बीटामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. ग्लायसेमिक इंडेक्स तुम्हाला एखादया पदार्थामध्ये साखरेची मात्रा किती आहे हे सांगतो.
त्यामुळे मधुमेही रोग्यांनी किंवा डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी बीट खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
2) स्कीन रॅशेस
नॉनव्हेज खाणा-या लोकांना स्कीन रॅशेस येतात हे तुम्हांला माहिती असेल पण बीटमुळे सुद्धा स्कीनला ॲलर्जी होते.
या ॲलर्जीमुळे रॅशेस, पित्त, खाज, थंडी वाजणे आणि ताप अशा समस्या निर्माण होतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे बीटामुळं व्होकल कॉर्ड्स आकुंचित होतात. ज्यामुळं बोलण्यात अडचणी येऊ शकतात. अशावेळी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3) लो ब्लड प्रेशर
बीटात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस असतं
ज्यांना हाय ब्लड प्रेशर असतं त्या व्यक्ती बीट खाऊ शकतात.
मात्र ज्यांचं ब्लड प्रेशर लो होतं त्यांचं ब्लड प्रेशर बीटामुळे आणखी खालावतं ज्यामुळं जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
अशा गंभीर धोक्यापासून वाचण्यासाठी लो ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तिंनी बीट खाऊ नये.
4) प्रेग्नंट महिला
बीटात बीटाईन असते जे गर्भावस्थेत फार मोठं नुकसान करतं. बीटामधलं नायट्रेटचं जास्त प्रमाण गर्भवतीसाठी धोकादायक ठरतं.
नायट्रेटमधली विषतत्वं गर्भासाठी धोकादायक ठरतात.
म्हणूनच गर्भवती महिलांनी बीट खाऊ नये.
बीट खाताना कशा प्रकारे खावा?
1) बीटाचा रस – बीट वेगवेगळ्या स्वरुपात तुम्ही घेऊ शकता. हवं असेल तर ज्युस करून प्या. या ज्युसची लज्जत वाढविण्यासाठी त्यात आलं, गाजर, कोथिंबीर, आवळा किंवा लिंबू मिक्स करा.
2) बीटाचा हलवा – गाजर आणि दुधी हलवा तुम्ही केला असेल. पण शक्य असेल तर बीटाचा हलवा करून पहा.
बीट किसून घेऊन, कढईत थोडं तूप चालून परतून घ्या आता थोडं दूध घालून शिजवून घ्या.
त्यानंतर त्यात साखर घाला, नीट शिजवून घ्या. वरून ड्रायफ्रुट घाला. गरमागरम बीट हलवा सगळ्यांना खाऊ घाला.
3) सलाड – बीट वेगवेगळ्या आकारात कच्चं कापून घेऊन सलाड म्हणून तुमच्या जेवणात वापरू शकता
4) बीटाची कोशिंबीर – काहीजण कच्च्या बीटाची कोशिंबीर करतात तर काहीजण बीट उकडून त्याची कोशिंबीर करतात.
उकडलेला किंवा कच्चा बीट किसून घ्या. त्यात दही, कोथिंबीर, मिर्ची किंवा तळलेली भरलेली मिर्ची आणि डाळींबाचे दाणे ही घालू शकता.
सगळे पदार्थ मिक्स करा आणि पौष्टिक कोशिंबीर एंजॉय करा.
रक्तवाढीसाठी “अरे! बीटाचा रस पी रोज” असं सांगणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा आणि आपण कुठे आहोत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या आरोग्याला लाभदायक ठरेल अशाच पद्धतीने बीटाचा स्वाद घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.