अक्रोड म्हणजे ड्रायफ्रुटचा राजा!
अक्रोड बुद्धीसाठी पोषक आहेच, मात्र शरीराच्या पोषणासाठीही अक्रोडपासून खूप फायदे मिळतात.
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात जी अनेक आजारांपासून संरक्षण करतात.
चला तर मग अक्रोडमध्ये असणारी पोषक तत्वं जाणून घेऊया.
आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या अक्रोडमध्ये हेल्दी फँट फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स ही असतात.
ही सारी पोषक तत्वं बुद्धीसाठी जितकी उपयुक्त तितकीच शारीरिक आरोग्यासाठी हितकर मानली जातात.
अक्रोडमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मँग्नेशिअम, आयर्न, फाॅस्फोरस काॅपर, सेलेनियम, ओमेगा-3 फैटी अॅसिड सारखी पोषक तत्वं असतात.
भिजवलेल्या अक्रोडचा आहारात समावेश केल्यामुळे काय फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
1. झोप व्यवस्थित लागते
2. वजन नियंत्रणात राहतं.
3. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
4. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
5. ब्लड शुगर कंट्रोल मध्ये रहाते.
6. शरीरातलं एक्स्ट्रा फैट कमी होतं.
7. पचनशक्ती सुधारते.
8. अक्रोडमध्ये असणारं अल्फा-लिनोलेनिक
अॅसिड हाडांना मजबूत करतं.
9. मधुमेही व्यक्तींना लाभदायक.
अक्रोड किती प्रमाणात कशा पद्धतीने खायचं?
अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं, मात्र ते कशा पद्धतीने खायचं हे तुम्हांला नेमकं माहीत हवं.
कोरड्या अक्रोडच्या खाण्याने जितके फायदे मिळतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फायदे भिजवलेल्या अक्रोडमुळे मिळू शकतात.
त्यासाठी फक्त इतकच करायचं की रात्री 2 अक्रोड पाण्यात भिजवून ठेवायचे.
रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले अक्रोड सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही खाल्लेत तर अक्रोडमध्ये असणाऱ्या सर्व पोषक तत्वांचा व्यवस्थित लाभ मिळतो.
शुक्राणूंची मात्रा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोगी
तसं पहायला गेलं तर प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अक्रोड उत्तम आहेच.
आयुर्वेदिक तज्ञांच्या मते अक्रोड पुरूषांसाठी पुष्कळ फायदेशीर आहेत.
कारण अक्रोडमध्ये उपलब्ध असणाऱ्या पोषणमूल्यांमुळे स्पर्मची क्वॉलिटी सुधारते.
पुरुषांनी अक्रोडचं नियमित सेवन केलं तर स्पर्ममधील शुक्राणूचं आयुष्य, शुक्राणूंची संख्या, आणि शुक्राणूंच कार्य सुधारतं, ज्यामुळे लैं~गि~क शक्ती वाढते.
पुरूषांचा आपली लैं~गि~क ताकद वाढवायची असेल तर त्यांनी अक्रोडचं नियमित सेवन करावं.
अक्रोडचे इतके फायदे लक्षात घेऊन तुम्ही ही आजपासून अक्रोड भिजवून खाणार यात शंकाच नाही.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.