मित्रांनो, साधारण सर्वच पुरुषांना छातीवरच्या नकोशा केसांपासून मुक्ती हवी असते. पण नेमकं काय करावं हे कळत येत नाही.
छातीवरचे केस हे धनवान आणि उदार, दिलदार पुरुषाचं लक्षण मानलं जात असलं तरी परफेक्ट लूक साठी हे केस नकोसेच असतात.
पुरूषांच्या छातीवरचे हे नकोसे केस हटवायला अगदी सोपे उपाय आहेत.
1) ट्रिमिंग
बाजारात उपलब्ध असणाऱ्या ट्रिमिंग मशीनच्या मदतीने पुरुषांना छातीवरच्या केसांपासून सहज मुक्ती मिळवता येईल.
या ट्रिमिंग मशीनमुळे केस तुटण्याची किंवा जळण्याची भीती नसते.
2) शेव्ह
पुरुषांना छातीवरच्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी शेव्ह करणे हा ही घरच्या घरी करता येण्यासारखा सोपा उपाय आहे.
चेहऱ्यावर जशी दाढी करता तशाच पद्धतीने छातीवरच्या केसांची दाढी करा. आणि नकोसे केस दूर करा.
3. वँक्सिंग
वँक्सिंग हा उपाय घरच्या घरी करता येतो, पण हा खूप वेदनादायक प्रकार आहे.
पण वँक्सिंगमुळं काय होतं की केसांची मुळं कमकुवत होतात आणि छातीवर केस पुन्हा उगवायला वेळ लागतो.
4. ईलेक्ट्रोलायसिस
या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वँक्सिंगनंतर केसांच्या पेशींना काढून टाकलं जातं जेणेकरून छातीवर पुन्हा केस उगवू नयेत.
5) हेअर रिमुव्हल क्रीम
पुरुषांच्या छातीवरचे केस काढून टाकायला हेअर रिमुव्हलची मदत ही घेता येते.
या पद्धतीने वेदना अजिबात होत नाही, आणि काही मिनीटात केसांपासून सुटका होते.
तर मित्रांनो हे 5 सोपे प्रकार आहेत, ज्यातून तुम्ही तुमच्या छातीवरच्या केसांपासून सुटका करुन घेऊ शकतात.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.