फुफ्फुसं हेल्दी राखणं फार गरजेचं आहेत त्याचं कारण एकच आहे की, फुफ्फुसं शरीरातला ऑक्सीजन शुद्ध करण्याचं महत्वपूर्ण काम करतात.
त्यामुळे फुफ्फुसं स्वस्थ, हेल्दी असावीत, ती नेहमीच हेल्दी राहण्यासाठी काही पदार्थ वापरणं आवर्जून टाळा.
तज्ञांचं असं म्हणणं आहे की फुफ्फुसं आकुंचित झाली तर श्वास घ्यायला त्रास होतो.
फुफ्फुसांची व्यवस्थित काळजी नियमित घेतलीत तर शरीराला शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत राहील आणि आरोग्य सुधारेल.
फुफ्फुसं कार्यक्षम राहण्यासाठी आहारात योग्य पदार्थांचा समावेश असला पाहिजे.
काही पदार्थ आपल्या फुफ्फुसांना अशक्त करतात हे आपल्याला माहीतीच नसतं.
धूम्रपान, तंबाखु, प्रोसेस्ड मीट, शुगर असणारी ड्रिंक्स आणि दारुचा फुफ्फुसांवर थेट परिणाम होतो.
या व्यसनांमुळं फुप्फुसं निकामी होऊ शकतात. ज्यामुळं आपलं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे यांच्या वापरावर मर्यादा ठेवा.
हे पाच पदार्थ अगदी प्रमाणातच वापरा.
1) मीठ
आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार मीठ शरीरासाठी आवश्यक आहे, पण त्याचं ही एक प्रमाण आहे.
काही व्यक्तींना भाजी किंवा इतर पदार्थात मीठ जास्त प्रमाणात आवडतं. त्याचबरोबर लोणची, पापड भरपूर प्रमाणात खाणा-या व्यक्तींच्या शरीरात मीठ अधिक प्रमाणात जातं.
अशा पदार्थांमुळे फुफ्फुसांवर मात्र गंभीर परिणाम होतो.
त्यामुळे आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवा.
2) साखरेचं प्रमाण जास्त असणारे ड्रिंक्स
आपण नेहमी जे कोल्ड्रिंक्स पितो त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. मात्र अशी कोल्ड्रिंक्स फुफ्फुसांसाठी हानिकारकच असतात.
ही कोल्ड्रिंक्स सतत प्यायल्यामुळं प्रौढ व्यक्तींमध्ये ब्रॉंकाईटीस होण्याची शक्यता असते.
ज्यामुळं फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो.
खरंतर या साखरयुक्त पेयांपेक्षा साधं पुरेसं पाणी पोटभर योग्य प्रमाणात पुरसं पिणं जास्त योग्य ठरतं.
3) प्रोसेस्ड मीट
आहारतज्ञांच्या मते प्रोसेस्ड मीट खाणं फुफ्फुसांसाठी अजिबात चांगलं नाही.
हे प्रोसेस्ड मीट जास्त काळ टिकण्यासाठी त्यात नायट्रेट मिसळलेलं असतं ज्यामुळं फुफ्फुसांला सूज येण्याचा धोका असतो.
प्रोसेस्ड मीट ज्यामध्ये खारवलेलं मांस, हॅम, डेली मांस आणि साॅसेजस सामावलेले असतात.
हे सारे पदार्थ खाणं टाळा आणि फुफ्फुसांचं आरोग्य जपा.
4) डेअरी प्रॉडक्ट
दूध, दही, पनीर असे डेअरी प्रॉडक्ट शारीरिक आरोग्यासाठी उत्तम आहेत, मात्र तुम्हांला आश्चर्य वाटेल की हे पदार्थ जास्त प्रमाणात आहारात घेतले तर फुफ्फुसांवर त्यांचा वाईट परिणाम होतो.
त्यामुळे हे दुग्धजन्य पदार्थ सुद्धा ठराविक प्रमाणातच आहारात निवडा.
5) अल्कोहल (दारू)
दारुचे दुष्परिणाम वेगळे सांगायची गरज नाही.
आहारतज्ञ हे आवर्जून सांगतात की दारु फुफ्फुसांवर ही फार मोठे परिणाम करतात.
यात असणारे सल्फाइट दम्यासारख्या विकारात आणखी त्रासदायक ठरु शकतं.
दारुमध्ये असणारं इथेनॉल सुद्धा फुफ्फुसांचं नुकसान करतं.
तर या 5 गोष्टींना टाळून आपण आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य जपू शकतो.
श्वसनक्रिया सुधारण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखावे वाचा या लेखात
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.