दारूची नशा उतरवण्यासाठी खात्रीशीर घरगुती उपाय

ड्रिंक घेतल्यावर कधी कधी अल्कोहोलची मात्रा जास्त होते, पण नेमकं तेंव्हा तुम्हांला नॉर्मल वर लवकर येण्याची गरज असते.

अशावेळी बरेच प्रचलित उपचार तुम्हांला मदत करतात असं म्हटलं जातं.

खरचं अशा गोष्टींत तथ्यं आहे का? लोकप्रिय समजले जाणारे उपाय तुम्हांला नॉर्मल व्हायला मदत करतात का?

खरं खोटं काय ते आज जाणून घेऊया.

बर्थडे सेलिब्रेशन, किंवा जॉबमध्ये एखादी सक्सेसची पायरी ओलांडल्यानंतर छोट्या मोठ्या पार्टीज होतात.

न्यु इअर सेलिब्रेशनला ही काही वेळा ड्रिंक घेतलं जातचं.

पण दुसऱ्या दिवशी जॉब किंवा महत्वाची मिटिंग यासाठी पटकन नॉर्मल होणं गरजेचं ठरतं.

काही वेळा पार्टी नंतर घरी जाण्यासाठी ड्राइव्ह करण्यासाठी नशा उतरण्याची गरज असते.

अशावेळी फ्रेंड सर्कल मधून काही उपाय सुचवले जातात.

1) कॉफीमुळे नशा पटकन उतरायला मदत होते

खरी गोष्ट : कॉफीमध्ये असणारं कँफीन तुम्हांला थोडं सावध, जागृत करू शकतं, तरतरी देऊ शकतं, मात्र नशा कमी करायला कॉफी फायदेशीर ठरत नाही.

अल्कोहल थेट तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतं, आणि त्यामुळं नशा चढते.

कॉफी पिऊन रक्तातलं अल्कोहल कमी होत नाही, त्यामुळं नशा उतरवण्यासाठी कॉफीचा काहीच उपयोग नाही.

कॉफी पिऊन थोडीशी हुशारी तुम्हांला जाणवेल मात्र गाडी चालवण्याइतकी सतर्कता तुमच्यात येणार नाही, त्यामुळे कॉफी पिऊन कार चालवण्याचा निर्णय घेऊन स्वतः चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.

2) ड्रिंक घेतल्यानंतर काहीतरी खाल्लं पाहिजे, म्हणजे नशा चढणार नाही.

खरी गोष्ट : एकदा अल्कोहल थेट रक्तात मिसळलं की अन्नाचा त्यावर काही परिणाम होत नाही.

ड्रिंक करताना तुम्ही काही खाल्लंत तर शरीरात शोषलं जाणारं अल्कोहोलचं प्रमाण किंचित कमी होतं. त्यामुळे चढणारी नशा ही कमी प्रमाणात चढते.

पण हे प्रमाण फारच थोडं असतं. एकदा रक्तात मिसळलेल्या अल्कोहलचं तुम्ही काहीच करू शकत नाही.

रिकाम्या पोटी ड्रिंक घेतलं तर नशा जोरात चढते, म्हणून भरल्या पोटीच ड्रिंक्स घ्यावेत, किंवा ड्रिंक घेताना काही तरी खावं.

3) गार पाण्यानं आंघोळ करून नशा पटकन उतरते.

खरी गोष्ट: गार पाण्याच्या शॉवरनं अल्कोहलच्या प्रमाणात घंटा फरक पडत नाही, थंडगार स्पर्शानं किंचित तरतरी येते मात्र नशेमुळे विचारांमध्ये होणारी गडबड मात्र कमी होत नाही.

नशा कमी होत नाही.

4) उलटी काढून शरीरातलं अल्कोहल कमी होतं

खरी गोष्ट: गोष्ट फिरुन फिरुन तिथेच येते. अल्कोहल रक्तात लगेचच मिसळत असल्यामुळं पोटात अल्कोहलचं प्रमाण फार नसतं.

उलटी काढल्यामुळं पोटातले पदार्थ बाहेर येतील, रक्तातलं अल्कोहल जैसे थे स्थितीत राहतं.

नशा अजिबात उतरत नाही.

5) प्रचंड व्यायाम करुन घाम आला की नशा उतरायला मदत होते.

खरी गोष्ट: रक्तात मिसळलेली दारू घामाच्या रुपाने ही बाहेर पडत नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच.

नशेत असताना व्यायाम करणं अवघड असतं कारण तेव्हढी ताकद तुमच्यात नसते.

नशेत व्यायामाचा प्रयत्न करु नका, त्यामुळं तुमचं शरीर आणखी डिहायड्रेड होतं, जे धोकादायक ठरू शकतं.

6) योग्य वेळच तुमची नशा उतरवायला मदत करते.

ही गोष्ट अगदी बरोबर आहे, काही वेळ जाऊ देणं, वाट पहाणं हाच नशा उतरवण्यासाठी योग्य पर्याय आहे.

एक ड्रिंक शरीरातून बाहेर पडायला साधारण एक तास तरी लागतो.

तुम्ही जे अल्कोहल घेतलं आहे त्यावर प्रक्रिया होण्याइतका वेळ देऊन वाट पहाणं, नशा उतरण्यासाठी धीर धरणं आणि स्वतः ची ताकद पुन्हा मिळवण्यासाठी वेळ देणं हा निर्णय शहाणपणाचा आहे.

कुठलाही जीवघेणा उपाय करण्यापेक्षा शरीराला रात्रभर पुरेशी झोप द्या.

ड्रिंकच असर हळूहळू कमी होण्याची वाट पहा.

तुम्हांला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला दारुतून विषबाधा झाली तर लक्षणांकडे पहा.

उलटी, झटका, मनाची संभ्रमावस्था, संथ अनियमित श्वास पिवळी किंवा निळी त्वचा यापैकी काहीही दिसलं तर झोपू नका लगेचच दवाखान्याकडे धाव घ्या.

अशा परिस्थितीत हायड्रेट राहण्यासाठी मधून मधून पाणी प्या.

ड्रिंकनंतर दुसऱ्या दिवशी हँग ओव्हर असेल तर अँस्परिन आयब्रुफेन सारखी गोळी घ्या.

एसिटामिनोफेन (acetaminophen) ज्यात आहेत ते पदार्थ खाऊ नका.

ड्रिंक घेणं आधीच ठरल़ं असेल तर दोन ड्रिंक्सच्या मध्ये पाणी प्या.

जर ड्रिंकचं प्रमाण सातत्यानं जास्त होत असेल तर एखाद्या तज्ञाचा सल्ला घेऊन अशा सवयीतून बाहेर पडा.

लक्षात ठेवा, जर तुम्ही जास्त प्रमाणात ड्रिंक घेतली तर कोणतीही मशिनरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंना हात लावू नका.

गाढ झोपेतही शरीरातून अल्कोहल बाहेर टाकण्याची प्रक्रिया चालू राहते, बस पुरेसा वेळ द्या.

तर ड्रिंकच्या बाबतीत कुठल्याही अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ड्रिंक जबाबदारीनं घ्या, स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याची काळजी घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।