आपल्या बाईकचा मेंटेनन्स ठेवण्याच्या १३ टिप्स आणि ट्रिक्स

आपली मोटरसायकल हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

रोजच्या प्रवासाबरोबर लॉंग टूर ही नव्या जमान्याची पॅशन आहे.

बाईकवर लेह लडाखची किंवा रंगील्या राजस्थानची किंवा कोस्टल कर्नाटकाची ट्रिप करण्याइतकं दुसरं कोणतंच थ्रिल नाही.

पण बायकिंग करायची, मोटरसायकल सांभाळायची तर तिचा तसा रुबाब राखता यायला हवा.

तुमच्या मोटरसायकलला शानदार पद्धतीने सांभाळण्यासाठी खर्चिक उपायांची अजिबात गरज नाही.

आज आम्ही तुम्हांला अशा साध्या सोप्या टीप्स सांगणार आहोत की त्यातून तुम्ही तुमच्या मोटरसायकलचा रुबाब आणि कार्यक्षमता दोन्ही वाढवू शकता.

1) सुधारणा करा

मोटरसायकलमध्ये एक्झॉस्ट किट बसवा.

एक्झॉस्ट किटमुळे बाईकचा एअरफ्लो सुधारतो, आवाजाची तीव्रता कमी होते.

त्याचबरोबर मोटरसायकलची हॉर्स पॉवर वाढते, वाफ किंवा पेट्रोलला नियंत्रित करणारा थ्रोटल प्रतिसाद सुधारतो आणि टॉर्क ही सुधारतो.

2) अँडजेस्टेबल सस्पेन्शन

तुमची बाईक हाताळायला उत्तम स्थितीत असावी यासाठी जाणकार व्यक्तीकडून अँडजेस्टेबल सस्पेन्शन बसवून घ्या.

या बदलामुळं बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचं वजन आणि त्याची राइडिंग शैली प्रमाणं कॉम्प्रेशन आणि डॅम्पिंग सेटिंग्ज करण्याची क्षमता निर्माण होते.

3) टायर बदलून हलके रिम्स लावा

बाईकचा वेग कुणाला आवडत नाही ?

हा वेग वाढवायला सर्वोत्तम टायर म्हणजे स्पोर्टस् टायर.

यात एक असा प्रकार आहे जो ओल्या आणि कोरड्या अशा दोन्ही रस्त्यांवर टिकाऊपणा आणि रस्त्यावर ग्रीप देतो.

लाईटवेट चाकं तुमच्या बाईकसाठी सुपर्ब ठरतील.

4) ब्रेक पॅड आणि लाइनर जोडून घ्या

ब्रेक पॅड बाजारात वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत.

सिंटर्ड ब्रेक पॅड, ऑर्गेनिक ब्रेक पॅड आणि कंपोझिट ब्रेक पॅड.

ब्रेक लाइन्स या बहुतेक ब्रँडेड स्टेनलेस स्टील आणि केवलर-शीथ टेफ्लॉन लाईन्समध्ये विकल्या जातात.

त्यांची झीज कमी होते, जास्त अंतर कापतात, आणि उत्तम अनुभव देतात.

तर योग्य निवड करून तुमच्या बाइकचा परफॉर्मन्स सुधारा

5) टायरमध्ये योग्य प्रेशर असल्याची खात्री करून घ्या .

टायरमध्ये हवेच्या दाबाचं जे प्रमाण निश्चित केलं आहे त्यानुसारच टायर फुगवलेले आहेत याची नेहमी खात्री करून घ्या.

जास्त फुगलेले टायर हाताळायला कठीण असतात, धोकादायक ठरतात.

6) टायर सुस्थितीत असल्याचं चेक करा

तुमच्या बाईकचे टायर चांगल्या स्थितीत असावेत. त्याची फार प्रमाणात झीज होऊ नये किंवा ते फार जुनाट नसावेत.

जीर्ण, जुनाट झालेल्या टायरमुळे अपघात होऊ शकतो. हे लक्षात ठेवा.

7) केबल्स नव्या घाला, पिव्होट्स आणि केबल्सना वेळीच वंगण घाला

जुन्या झालेल्या केबल्स बदलून टाका. आणि वंगणाचा वापर करून मोटरसायकलचा परफॉर्मन्स सुधारा.

8) मोटरसायकल चेन नीट बसवून वंगण घाला.

मोटरसायकलची साखळी गंजलेली, झिजलेली असेल तर वेळेवर बदलून बाइकची हाताळणी आणि अश्वशक्ती सुधारा.

सैल पडलेल्या साखळ्या वेळीच बदला.

10) तेल आणि एअर फिल्टर नियमितपणे बदला.

उच्च दर्जाचे एअर फिल्टर आणि मोटरसायकलसाठी -विशिष्ट प्रकारचं मिळणारं तेल वापरा.

स्वच्छ तेल वापरल्याने बाईकचे इंजिन स्वच्छ आणि थंड होते.

11) थ्रॉटल केबल नीट बसवा.

बाइकला चांगल्या कंडीशनमध्ये राखण्यासाठी बाईकची थ्रॉटल केबलची लांबी योग्य प्रमाणात असल्याची खात्री करुन घ्या.

12) बाईकची नियमित तपासणी करा

जाणकार व्यक्तीकडून तुमची बाइक वेळोवेळी तपासून घ्या.

बाइकचे झिजलेले, जुने झालेले भाग वेळच्या वेळी बदला, तुटलेले भाग दुरुस्त करा.

13) मोटारसायकल रि-गिअर करा.

तुमच्‍या बाईकचे गीअरिंग लहान करून वेग वाढवणं हा एक स्वस्तात मस्त उपाय आहे.

तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाईकची योग्य देखभाल करु शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।