प्रत्येक घरात लिंबाचा वापर होतोच उन्हाळ्यात तहान भागवणारं लिंबू सरबत, आजारपणात जिभेची चव परत आणणारं लिंबू लोणचं, समारंभाच्या स्वयंपाकाची रुची वाढविण्यासाठी प्रत्येक ताटात असणारी लिंबाची फोड, असे कितीतरी लिंबाचे उपयोग तुम्हाला माहिती असतील.
आज आम्ही तुम्हांला लिंबाचे जे 7 अनोखी उपयोग सांगणार आहोत ते वाचून मात्र तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
एवढासा साधा लिंबू किती महत्त्वाचा ठरतो हे आज तुमच्या लक्षात येईल.
1) मायक्रोवेव्ह साफ करा.
काही पदार्थ बंडखोरी करून मायक्रोवेव्हमध्ये उडतात आणि मायक्रोवेव्ह आतून खराब करतात.
आता हा मायक्रोवेव्ह लख्खं कसा करायचा हा प्रश्न जर तुमच्याकडे उभा राहिला तर आता चिंता करू नका.
एका बाऊलमध्ये पाणी घ्या त्यात लिंबाचा रस मिक्स करा हे पाणी गरम करून घ्या आणि मायक्रोवेव्ह आतून स्पंजने स्वच्छ करून घ्या.
2) नखं चमकवा.
नेल पॉलीश लावून लावून तुमची नखं मुळची लकाकी हरवून बसतात.
नखांचा रंग परत आणण्यासाठी एक सोपी युक्ती करा.
आधी नेल पॉलिश नीट काढून घ्या. लिंबाचे दोन भाग करा त्यातला एक लिंबू घेऊन नखांवर हळुवार घासा.
तुमच्या नखावरची तकाकी तुम्हाला पुन्हा एकदा नक्कीच जाणवेल.
3) कीटक दूर करा.
डास आणि मुंग्यांना घरातून हाकलून लावणं हे एक मोठंच काम होऊन बसतं.
तर हे काम झटक्यात होण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात मिसळून हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि घरात जागोजागी स्प्रे करा.
डास आणि मुंगी यांच्या त्रासातून अगदी सहजपणे मुक्ती मिळवा.
4) लिंबाचं डिटॉक्स ड्रिंक.
अनेक सरबतांची चव वाढवणारा लिंबू , डिटॉक्स ड्रिंक म्हणून सुद्धा फायदेशीर आहे.
बद्धकोष्टता दूर करण्यापासून लिव्हर डिटॉक्स करण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे फायदे या लिंबू डिटॉक्स ड्रिंकचे मिळतात.
लिंबामुळे होणारं डिटॉक्स इतकं प्रभावी असतं की तुमची त्वचा सुद्धा चमकते.
शिवाय हें ड्रिंक चवदार लागतं हाही एक फायदाच !
5) चॉपिंग बोर्ड स्वच्छ करणे.
पूर्वीच्या काळी विळीवरती सगळं चिरणं व्हायचं अशा वेळेला कांद्याचा वगैरे वास जाण्यासाठी लिंबू चिरला जायचा.
आधुनिक जगातल्या चॉपिंग बोर्ड वर मांस, कांदा किंवा भाज्यांचा वास रेंगाळला तर तुम्ही सुदधा लिंबाची मदत घ्या.
चॉपिंग बोर्डवरती अर्धा लिंबू चोळा.
यामुळे बॅक्टेरिया सुद्धा नाहीसे होतील आणि वास ही निघून जाईल.
6) लिंबू स्क्रब
सौंदर्याविषयी तुम्ही जागरूक असाल तर लिंबाचा हा फायदा नीट समजून घ्या.
हिवाळ्यात कोरड्या झालेल्या त्वचेवर मृत पेशींचा थर असतो.
त्यामुळे चेहरा काळवंडतो. यासाठी महागडी ब्युटी ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरी लिंबाचा स्क्रब तयार करा.
त्यामध्ये कोणताही रासायनिक पदार्थ वापरायचा नसल्यामुळे तुमच्या त्वचेची कोणतीही हानी होणार नाही.
स्क्रब तयार करण्यासाठी साहित्य.
- 200 ग्रॅम सी सॉल्ट/समुद्री मीठ
- 250 मिली तेल बदाम, खोबरेल किंवा ऑलीव्ह
- लिंबाचा रस 30 मिलि
तर पहिल्यांदा मिठात हळूहळू तेल घाला. सगळं तेल मिसळलं की त्यात लिंबाचा रस घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या.
मन प्रसन्न करणारा, तजेलदार करणारा, उल्हासित करणारा लिंबू स्क्रब तयार.
छान जारमध्ये भरुन तुम्ही हा स्क्रब होममेड गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता.
7) दुर्गंधी दूर पळवा.
मन लावून तुम्ही उत्तमोत्तम पदार्थ रांधता.
पण त्यातले कांदे लसूण यासारखे पदार्थ तुमच्या हातांची साथ सोडत नाहीत.
वाढताना वगैरे हा दुर्गंध पाठलाग करतो.
अशा वेळेला लिंबाचा रस काढा आणि हाताला हलकेच चोळा, हात धुऊन टाका.
पण हाताला जर किंचित भाजलं असेल किंवा कापलं असेल तर मात्र असं करू नका.
कारण ती जखम लिंबाच्या रसामुळे झणझणेल हे लक्षात घ्या.
तर लिंबाचं हे वेगवेगळे उपयोग वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना?
पण लिंबाचा उत्तम उपयोग तुम्ही स्वतःचा करा आणि मित्र-मैत्रिणींबरोबर ही माहिती शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.