जाणून घ्या वजन वाढवण्याचे शास्त्रोक्त काही उपाय

लेखाचे शीर्षक वाचून चकित झालात का?

पण हे अगदी खरे आहे की नेहेमी जरी लठ्ठपणा, वजन कमी करणे, डायट, व्यायाम यांची चर्चा होत असली तरी बारीक अंगकाठी, कमी वजन, हडकुळेपणा या सुद्धा काही लोकांच्या समस्या असू शकतात.

असे लोक आपले वजन का वाढत नाही यामुळे चिंतेत असतात.

आजचा आपला हा लेख खास अशा लोकांसाठीच आहे ज्यांना त्यांचे वजन वाढवायचे आहे.

वजन वाढवणे हे खरे तर वजन कमी करण्यापेक्षा कठीण काम आहे. योग्य ते डायट, व्यायाम यामुळे वजन कमी करणे एकवेळ लवकर जमू शकेल पण वजन वाढवणे तेवढे सोपे नाही.

काय आहेत वजन न वाढण्याची कारणे 

१. पोटाची समस्या- इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या पोटाच्या समस्यांमुळे, पोषक घटक शरीरात योग्य पद्धतीने शोषले जात नाहीत, ज्यामुळे बऱ्याच लोकांचे वजन वाढत नाही.

२. पोषणाचा अभाव- आहारात जीवनसत्त्वे, लोह, खनिजे, फॅट्स यासारख्या पोषक घटकांच्या अभावामुळेही वजन वाढत नाही.

३. मेटाबॉलिझम / चयापचय – पुरेसे खाल्ल्यानंतरही जर तुमचे वजन वाढत नसेल तर याचे कारण तुमचे जलद गतीने होणारे चयापचय हे कारण असू शकते.

४. चुकीचा व्यायाम – जास्त कार्डिओ केल्याने तुमच्या शरीराच्या कॅलरीज वेगाने खर्च होतात आणि मग तुम्ही जितक्या कॅलरीजचे सेवन केले त्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न करता, अशा स्थितीत तुमच्या शरीराला कॅलरीज मिळत नाहीत आणि तुमचे वजन वाढत नाही.

५. कमी झोप- झोपे दरम्यान, कॉर्टिसॉल हार्मोन तयार होतात, जे मसल्स तयार करण्यास मदत करतात. व्यायामानंतर पुरेशी झोप न घेणे हे देखील वजन न वाढण्याचे कारण असल्याचे मानले जाते.

६. स्ट्रेस / ताण तणाव – तणावामुळे भूक कमी लागते, दिनक्रम विस्कळीत होतो आणि शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. ज्यामुळे वजन वाढवण्याची प्रक्रिया मंदावते.

७. कमी खाणे- प्रत्येकाच्या खाण्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार पुरेसे खाल्ले नाही तरी काही वेळा वजन वाढत नाही.

वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते.

परंतु असे मात्र नाही की वजन वाढवायचेच आहे तर वाटेल त्या प्रमाणात वाटेल ते जंक फूड खायचे.

अति प्रमाणात जंक फूड खाण्याचे शरीरावर दुष्परिणामच होतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी पौष्टिक आणि चांगल्या प्रकारे उष्मांक पुरवणाऱ्या पदार्थांचे सेवन करायला हवे.

असे पदार्थ कोणते ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोजच्या आहारात अशा कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता.

वजन वाढवणारे अन्नपदार्थ खालीलप्रमाणे 

१) सामन मासा – सामन माशाचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वजन वाढवू शकता.

यासाठी सामन मासा ऑलिव्ह ऑईल आणि बटरमध्ये शिजवा.

एकूणच मांसाहार वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असतो.

२) बटाटे – बटाट्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदके, फायबर आणि व्हिटामिन सी असते. दररोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढते.

३) पीनट बटर – तुम्हाला नैसर्गिकपणे वजन वाढवायचे असल्यास पीनट बटर हा उत्तम पर्याय आहे. दररोजच्या आहारात एक चमचा पीनट बटर खा.

४) मिक्स ड्रायफ्रुट – सुका मेव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. १०० ग्रॅम सुका मेव्यामध्ये ५००-६०० कॅलरीज असतात. तसेच यात ओमेगा ३ फॅटी ऍसिड, प्रोटीन, व्हिटामिन ई आणि फायबर असतात.

सुके अंजीर, काजू यासारखा सुकामेवा वजन वाढवण्यास मदत करतो.

५) अंडी – अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटामिन डी आणि चांगले कोलेस्ट्रॉल असते. वजन वाढवण्यासाठी अंडी खा.

६) चीज – प्रत्येकी १० ग्रॅम चीजमध्ये ४०० कॅलरीज असतात. चीजमध्ये प्रोटीन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, फॅट आणि कॅल्शियम असते. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही दररोज चीज खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

७) केळी – वजन वाढवण्याचा मस्त आणि स्वस्त उपाय म्हणजे केळी. केळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि इतर पोषकतत्वांचा मोठा भरणा असतो. केळ्यामुळे शरीराला एनर्जी मिळते.

एका मीडियम साईजच्या केळ्यामध्ये १२० कॅलरीज असतात. दररोजच्या आहारात केळ्याचा समावेश केल्यास नक्कीच तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.

८) खजूर आणि तूप – खजूर आणि तूप एकत्र करून खाल्ल्याने शरीराला पुरेसे उष्मांक मिळतात आणि वजन योग्य प्रकारे वाढण्यास मदत होते.

९) दूध – दूध हा परिपूर्ण आहार आहे असे आपल्याकडे पूर्वीपासून मानले जाते. नियमितपणे दुधाचे सेवन केल्यामुळे शरीराला योग्य पोषण तर मिळतेच शिवाय वजन वाढण्यास देखील मदत होते.

१०) गोड पदार्थ – योग्य प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. मात्र त्याचा अतिरेक करू नये. अन्यथा इतर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

याबाबत लक्षात घेण्यासारखी आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की व्यायामाने वजन कमी होते अशी समजूत करून घेऊन बारीक असणाऱ्या लोकांनी अजिबात व्यायाम न करणे चुकीचे आहे.

योग्य त्या पौष्टिक आहाराबरोबरच योग्य आणि नियमित व्यायाम आरोग्य चांगले राखण्यास आणि वजन वाढवण्यास मदतच करतो.

तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही जर कमी वजनाच्या समस्येने ग्रस्त असाल, हडकुळे असल्यामुळे तुमची मित्रमंडळी तुमची चेष्टा करत असतील तर लेखात सांगितलेले पदार्थ नियमित खाऊन तुमचे वजन वाढवण्याचा प्रयत्न करा.

मात्र वजन नैसर्गिकपणे वाढवा. याविषयीच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. वजन प्रमाणात आणि पुरेसा वेळ देऊन वाढवा.

अचानक जास्त प्रमाणात वजन वाढवणे आणि अचानक कमी करणे दोन्ही प्रकृतीला अपायकारक असते.

या सगळ्याचा विचार करून आपल्या प्रकृतीची योग्य काळजी घ्या. स्वस्थ रहा, आनंदी रहा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।