चित्रपट आणि मी

बाईकवरून झकपक कपडे घालून निघालेल्या बंड्याला विक्रमने हाक मारून जवळ बोलावले. नेहमीप्रमाणे इराण्याकडे आम्ही बसलो होतो. अर्थात आत घुसायची त्याची इच्छा दिसत नव्हती. पण नाईलाज झाला.

“अरे बाबा ….नाही तुझ्याकडून बील घेत. पण बसतरी थोडा वेळ. कुठे निघालास इतका सजून ….?? विक्रम त्याला निरखत म्हणाला.

“पिच्चर पाहायला जातोय. मैत्रिणीला घेऊन” बंड्या सहजपणे म्हणाला.

“च्यायला ….! मोठ्या मुश्किलीने वेळ मिळतो तुम्हाला. त्यातही तुम्ही समोरच्या पडद्याकडे तीन तास बघत वेळ घालवता…” ?? मी आश्चर्याने विचारले.

“ओ… भाऊ …तुम्हाला काय कळते हो त्यातले..?? वहिनीला घेऊन किती चित्रपट पाहिले आतापर्यंत ..?” बंड्या चिडून म्हणाला.

“हा..! हा ..!हा..! उत्तम प्रश्न .. विक्रम हसत म्हणाला” हा कसला तिला घेऊन सिनेमा बघतो ..?? अरे सिनेमा बघताबघता झोपी जातो तो. चित्रपट संपल्यावर शेजारचा उठवतो नाहीतर डोअरकिपर…..

तसा बंड्याही हसू लागला “भाऊ ..सांगा ना ?? तुम्ही लग्नाच्या आधी वहिनीबरोबर कुठे कुठे मजा केलीत. बोला… बोला….बंड्याने चिडवायची संधी सोडली नाही.

” गप रे …..! हे खरे आहे मला नेहमी एकट्याला सिनेमाला जाणे आवडायचे. कारण मला चित्रपट पाहता पाहता झोप लागायची. शांतपणे झोपून जायचो मी. मग लग्न ठरले. आम्ही दोघेही नोकरी करणारे. आमचे ऑफ ही वेगळे. तेव्हा मी शिफ्टमध्ये ड्युटी करायचो आणि ती उशिरापर्यंत थांबायची. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा तासापूरते का होईना भेटायचो. कधी रेल्वे प्लॅटफॉर्म तर कधी तिच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर. आम्हाला गप्पा मारायलाच वेळ पुरायचा नाही. शिवाय तिची आवड वेगळी माझी आवड वेगळी. थिएटरमध्ये तीन तास पडद्याकडे बघत बसण्यापेक्षा तोच वेळ एकमेकांसाठी देऊ असे ठरले. माझी झोपण्याची सवय तिला कळलीच नाही आणि लग्नानंतर परत तेच होणार. त्यामुळे आमचे असे ठरले वेळ मिळेल तेव्हा भरपूर फिरायचे. खूप गप्पा मारायच्या. स्वप्ने पहायची. ती पूर्ण करण्याचे प्लॅन करायचे. च्यायला ..! बघता बघता हेही दिवस गेले. मी बोलता बोलता भावनिक झालो. विक्रमने हसून माझ्या पाठीवर थाप मारली.

“हो भाऊ ….पण आता परिस्थिती बदलली आहे. सध्या एकमेकांना भरपूर वेळ मिळतो. फोन हातात असतो, व्हाट्सअप वर भरपूर चॅटिंग होते. फोटो विडिओ शेयर होतात तर विडिओ कॉल ही होतात. मग प्रत्यक्षात भेट होते तेव्हा बोलायला विषयच नसतात तेव्हा दुसरे काय करणार…. ??

हल्ली मल्टिप्लेक्समुळे हव्या त्यावेळेला चित्रपट पाहता येतो थिएटरही छान असतात. तुमच्यावेळी असायचे तसे खुर्चीत ढेकूण नसतात आणि ए. सी. ही बंद नसतात. शिवाय हल्ली प्रेमापेक्षा मैत्रीच जास्त. तेव्हा भावनिक रोमँटिक असे काही बोलायचे नसतेच. भावी आयुष्याची स्वप्नेही पहायची नसतात. प्रत्येकाला टाईमपास हवा असतो. आता जीच्याबरोबर मी सिनेमाला चाललो आहे ती फक्त माझी मैत्रीण आहे. सिनेमा पाहू, काहीतरी खाऊ आणि आपापल्या घरी जाऊ. खरे तर ती माझी बायको बनू शकत नाही. माझ्या आणि तिच्या विचारात राहणीमानात भरपूर फरक आहे. तेव्हा आजची संध्याकाळ तिच्याबरोबर एन्जॉय करतो उद्यापासून ड्युटी चालूच. चला निघतो उशीर होतोय. असे बोलून बंड्या बाहेर पडला.

वाचण्यासारखे आणखी काही…..

गिऱ्हाईक
सिझरिंग
तिची ही होळी

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।