उचकी थांबवण्याचे १० प्रभावी घरगुती उपाय

उचकी येणे ही एक नैसर्गिक आणि सर्वसामान्य प्रक्रिया आहे. कोणालाही अचानक केव्हाही उचकी लागू शकते.

पण ही उचकी नेमकी कशामुळे लागते?

जाणून घेऊया उचकी लागण्याची कारणे

आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसांच्या खाली डायफ्रॅम हा श्वसनाचा प्रमुख स्नायू असतो.

जेव्हा डायफ्रॅमचे स्नायू कॉम्प्रेस होतात म्हणजेच आकुंचन पावतात तेव्हा घशाच्या भागात असलेल्या व्होकल कॉर्ड्सचा एक चतुर्थांश भाग काही काळ बंद राहिल्याने उचकी लागते आणि घशातून सातत्याने “हिक्क” असा आवाज येतो. उचकी लागणे हे अगदी नैसर्गिक आहे, ती काही फार मोठी गंभीर समस्या नाही.

उचकी लागण्यास तसे काही विशेष ठोस कारण नाही. तरीही तज्ञांच्या मते मद्यपान केल्याने आणि जास्त प्रमाणात जेवण केल्याने उचकी लागते.

तसे तर उचकी काही वेळाने आपोआपच थांबते, त्यामुळे याबद्दल काळजी करण्याचे कारण नाही. खूप वेळ उचकी थांबतच नसेल तर मात्र काही घरगुती उपाय करावे लागतात.

चला तर पाहूया उचकी थांबविण्याचे घरगुती उपाय 

उचकी लागताच पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. याव्यतिरिक्त गूळ किंवा साखरेचे दाणे खाल्ले तरी उचकी थांबते. अश्याच प्रकारचे उचकी थांबविण्याचे आणखी काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊया.

१. पाणी किंवा कुठल्याही द्रव पदार्थाचे सेवन केल्यास उचकी थांबू शकते.

पाणी प्यायल्याने उचकी थांबते. पण उचकी लागलेली असताना एकदम जलद गतीने पाणी पिऊ नये. थोडे थोडे करून पाणी प्यायल्याने कॉम्प्रेस झालेले घशातील स्नायू शांत होऊन उचकी थांबते.

१. यासाठी घोट घोट पाणी घ्यावे.

२. पाणी घेताना एका हाताने कान बंद करावे.

३. यामुळे स्वरयंत्र मोकळे होऊन उचकी बंद होऊन घशाला आराम मिळतो.

२. ऍपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास उचकी थांबून आराम मिळू शकतो.

ऍपल सायडर व्हिनेगर हे सफरचंदापासून बनविण्यात येते. ते बाजारात सहज उपलब्ध असते. ऍपल सायडर व्हीनेगर चवीला थोडं आंबट असून याचा वापर फार काळजीपूर्वक करावा लागतो.

१ छोटा चमचा ऍपल सायडर व्हिनेगर जिभेवर घेऊन लगेच गिळून टाकल्याने घशातील स्नायू मोकळे होऊन उचकीपासून त्वरित आराम मिळू शकतो. घरात ऍपल सायडर व्हीनेगर सहज उपलब्ध नसेल तर लोणच्याचा खार वापरुन सुद्धा हा परिणाम मिळवता येतो. लोणचे आंबट चवीचे असल्यामुळे लोणच्याचा खार जिभेवर ठेवून गिळला तरी उचकी थांबते.

३. पीनट बटर खाल्ल्याने उचकी थांबण्यास मदत होते.

पीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनलेले असून ते गिळायला कठीण असते. १ मोठा चमचा पीनट बटर खाल्ल्यास आपले संपूर्ण लक्ष बटर गिळण्याकडे केंद्रित होऊन घशाचे कॉम्प्रेस झालेले स्नायू मोकळे होतात आणि उचकी थांबते.

तरीही उचकी बराच वेळ थांबली नाही तर १० मिनीटांनी अजून एक चमचा पीनट बटर खावे.

४. आईस्क्रीम खाल्ल्याने उचकी थांबते.

आईसक्रीम थंड असल्याने ते खाल्ल्यास घशाचे कॉम्प्रेस झालेले स्नायू पूर्वव्रत होतात आणि उचकी थांबते. उचकी लागल्यावर आईस्क्रीम खाताना ते लगेच न गिळता थोडावेळ जिभेवर ठेवावे.

५. थंड पाण्याच्या गुळण्या केल्यास उचकी थांबू शकते.

आईसक्रीम प्रमाणेच थंड पाणी देखील उचकी थांबण्यासाठी उपयोगी असते. ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन त्या पाण्याने ३० सेकंद गुळण्या कराव्या त्यानंतर १ ग्लास थंड पाणी प्यावे. असे करण्याने डायफ्रॅममध्ये आलेला अडथळा दूर होतो आणि उचकी थांबते.

६. उचकी थांबवण्यासाठी लिंबू हा सर्वात प्रभावी उपाय 

तज्ञ लोकांच्या अभ्यासानुसार लिंबाच्या रसाचे सेवन हा उचकी थांबवविण्यासाठी ९०% प्रभावी ठरणारा उपाय आहे. उचकी थांबविण्यासाठी लिंबाचा कशाप्रप्रकारे उपयोग करता येऊ शकेल ते आता आपण पाहूया

१. लिंबाचे दोन भाग करून त्यावर थोडे मीठ घालावे.

२. त्यातला एक भाग जिभेवर घेऊन त्याचा रस चोखून घ्यावा.

३. उचकी थांबेपर्यंत हा उपाय करावा. परंतु लिंबामध्ये सायट्रीक ऍसिड असल्याने त्यामुळे दात आंबतात, त्यामुळे हा उपाय केल्यावर लगेच साध्या पाण्याने तोंड धुवून टाकावे. तसेच दातांवर परिणाम होईल इतक्या वेळा हा उपाय करू नये.

७. बर्फाने उचकीपासून मिळू शकतो त्वरित आराम.

थंड पाण्याप्रमाणेच बर्फ खाल्ल्याने डायफ्राम वर आलेला ताण कमी होऊन घशाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि त्यामुळे उचकी थांबते.

बर्फाचे लहान क्यूब तोंडात विरघळेपर्यंत ठेवले किंवा गिळून घेतले तर उचकीपासून लगेच आराम मिळू शकतो.

८. पेपर बॅगच्या वापराने उचकी थांबण्यास मदत होते.

उचकी थांबवण्यासाठी हा शास्त्रीय उपाय आहे. तज्ञ लोकांच्या अभ्यासानुसार पेपर बॅग नाकाजवळ घेऊन श्वास घेतल्यास कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढून श्वासनलिकेतील अडथळे दूर होऊन उचकी थांबण्यास मदत होते.

उचकी थांबविण्यासाठी पेपर बॅगचा उपयोग कसा करावा?

  • एक पेपर बॅग घ्यावी.
  • त्यामध्ये आपले तोंड आणि नाक जाईल अशा पद्धतीने ती हातात धरावी.
  • यानंतर हळू हळू श्वास आत घेऊन हळू हळू बाहेर सोडावा.
  • हा प्रयोग १ मिनिट करावा. आवश्यकता वाटल्यास हा प्रयोग पुन्हा करावा.
  • हा प्रयोग करण्यासाठी पेपर बॅगच वापरावी. प्लास्टिक बॅग कधीहि वापरू नये. त्यामुळे श्वास कोंडला जाऊ शकतो. हा उपाय खबरदारी घेऊन करावा.

९. जोरात श्वास सोडल्याने उचकी थांबते.

नाकाद्वारे श्वास घेऊन तो जोरात सोडल्याने बरेच फायदे मिळतात. श्वासनलिका मोकळी होते, नर्व्हस सिस्टिमशी निगडित सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि वाढलेली हार्ट बिट नियंत्रित होऊन हृदय पूर्ववत कार्य करू लागते.

उचकी थांबवण्यासाठी सुद्धा जोरात श्वास सोडण्याचा उपयोग होताना दिसतो. कसे ते आपण पाहूया. त्यासाठी खालील उपाय करावा.

  • उचकी थांबविण्यासाठी गुडघे छातीजवळ घेऊन एका ठिकाणी बसावे.
  • तोंडावाटे श्वास जोरात सोडावा.
  • १० ते १५ सेकंद ही कृती करावी.
    असे करण्याने उचकी थांबते. परंतु नाकावर आणि छातीवर ताण येईल अशा प्रकारे हा उपाय करू नये. काळजीपूर्वक करावा.

१०. गुडघे छातीजवळ घेऊन बसल्यास उचकी थांबू शकते.

गुडघे छातीजवळ घेऊन एके ठिकाणी बराच वेळ त्याच पोसिशनमध्ये बसल्याने छातीवर दाब येतो आणि त्यामुळे फुफुसाच्या खालच्या भागात असलेल्या डायफ्रॅमचे स्नायू रिलॅक्स होऊन उचकी थांबते.

तर हे आहेत उचकी थांबवण्याचे काही घरगुती उपाय.

एरवी उचकी थांबावी म्हणून सहसा काही उपाय करावे लागत नाहीत. आपले लक्ष दुसरीकडे वळवले की काही वेळात उचकी आपोआपच थांबते.

तरीही जर २४ तासात उचकी थांबली नाही तर मात्र किडनी स्टोन, न्यूमोनिया किंवा ब्रेन हॅमरेजशी संबंधित आजार असण्याचे ते लक्षण असू शकते.

त्यामुळे वरील उपायांनी उचकी थांबत नसेल तर तज्ञ डॉक्टरांना दाखवावे.

त्याशिवाय शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे (डीहायड्रेशन) सुद्धा उचकी लागू शकते. नियमित स्वरूपात थोडे थोडे पाणी पिणे हा यावरचा सर्वोत्तम आणि सोपा उपाय आहे.

तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर वारंवार उचकी लागत असेल तर ह्या उपायांचा वापर जरूर करून पहा. तुम्हाला आलेले अनुभव कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।