शरीरातील रक्तशुद्धीकरणासाठी ह्या पाच पदार्थांचे नियमित सेवन करा

शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणासाठी सहज उपलब्ध असणाऱ्या ह्या पाच पदार्थांचे नियमित सेवन करा

रक्त हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या संपूर्ण शरीरात पसरलेला हा घटक शुद्ध असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असते.

सर्वात आधी रक्त आपल्या शरीरात नेमकी कोणकोणती कामे करते ते आपण पाहूया

रक्त आपल्या शरीरात पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत सर्वत्र असते. हृदय हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव संपूर्ण शरीरासाठी रक्ताभिसरणाचे काम करतो.

संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्याचे काम हृदय करते. तसेच शरीरातील रक्ताचा दाब नियंत्रणात ठेवण्याचे काम सुद्धा हृदय करते.

फुफ्फुसे आपल्या हृदयाला हवेचा पुरवठा करतात ज्यातून ऑक्सिजन मिळतो. त्याचा पुरवठा रक्ताद्वारे संपूर्ण शरीराला करण्याचे काम हृदय करते.

त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील मूत्रपिंडे (किडनी) हा अवयव शरीरातील अशुद्धी बाहेर टाकण्याचे काम करतात.

या सर्व अवयवांमुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध राहून त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण सुयोग्य राहते. शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा रक्ताद्वारे केला जातो. अगदी बोटाच्या पेरांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम रक्त करते.

शरीराच्या सर्व अवयवांना रक्तातून ऑक्सिजन, वेगवेगळे हार्मोन्स, शुगर, एनर्जी, फॅट्स यांचा पुरवठा केला जातो. एखादी जखम झाल्यास प्लेटलेट्सद्वारे तेथे गाठी निर्माण करून अतिरक्तस्त्राव होऊ न देणे हे कार्य देखील रक्ताद्वारे केले जाते.

रक्तातील लाल पेशी शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात तर रक्तातील पांढऱ्या पेशी शरीरात बाहेरून येणाऱ्या घातक अशा बॅक्टेरिया आणि व्हायरस यांचा नायनाट करतात आणि आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतात.

असे हे शरीरात सर्वदूरपर्यंत पसरलेले रक्त नेहमी शुद्ध असणे आपल्या चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असते.

रक्त अशुद्ध झाल्यास होणारे दुष्परिणाम

शरीरातील रक्त जर कोणत्याही कारणाने अशुद्ध झाले म्हणजेच त्यातील टॉक्सिक पदार्थांमध्ये वाढ झाली तर त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येतात.

रक्तदाब वाढणे, स्थूलता, चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या येणे, हृदय गती वाढणे, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे हे त्यातील काही दुष्परिणाम आहेत.

रक्त अशुद्ध का होते

खरे तर शरीराच्या मूळ यंत्रणेनूसार शरीराचे सर्व अवयव योग्य काम करून रक्ताचे शुद्धीकरण करत असतात. परंतु बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे हल्ली शरीरातील टॉक्सिक पदार्थांमध्ये वाढ होऊन रक्त अशुद्ध होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव हे याचे प्रमुख कारण आहे असे तज्ञ सांगतात.

निरनिराळ्या रक्त तपासण्या करून अशा अशुद्ध रक्तामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर औषधोपचार तर करता येतातच. परंतु नेहमीच आपल्या शरीरातील रक्त शुद्ध राहावे यासाठी आपल्या आहारात जर काही पदार्थांचा समावेश केला तर त्याचा खूप फायदा होताना दिसतो.

आहारतज्ञ असे सांगतात की संतुलित आहार आणि काही विशिष्ट पदार्थांचा आहारात नियमित समावेश केल्यास ह्या समस्येला तोंड देणे सहज शक्य आहे.

आज आपण असेच पाच पदार्थ जाणून घेणार आहोत ज्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास शरीरातील रक्त शुद्ध राहण्यास मदत होते आणि वरील दुष्परिणाम होण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. इतर संतुलित आहाराबरोबर ह्या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात अवश्य करावा.

१. ब्लूबेरीज

ब्लूबेरीज हे निळसर काळपट रंगाचे एक फळ असून यामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते. भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे ब्ल्यूबेरीजच्या नियमित सेवनामुळे शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकले जाऊन रक्तशुद्धीकरणास खूप मदत होते. दररोज सकाळी दह्याबरोबर, स्मूदी करून किंवा दलिया आणि ओट्स बरोबर ब्ल्यूबेरीजचे सेवन करावे. वाळवलेल्या ब्लूबेरीज सुद्धा मिळतात. त्यांचे सेवन देखील तितकेच फायदेशीर असते.

२. क्रॅनबेरीज

क्रॅनबेरीज हे लाल रंगाचे फळ असते आणि हे देखील शरीरातील अशुद्ध टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास खूप मदत करते. शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंडे (किडनी) करत असतात. या मूत्रपिंडांच्या उत्तम आरोग्यासाठी क्रॅनबेरीजचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. क्रॅनबेरीजच्या नियमित सेवनाने मूत्रमार्गाचे कार्य सुरळीत राहते तसेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कमी होते.

३. लसूण

कोणत्याही पदार्थाला चरचरीत लसणाची फोडणी घातली की तो पदार्थ चवदार होतो हे तर अगदी निश्चितच. परंतु लसूण फक्त पदार्थाची चव वाढवतो, असे नसून त्याचे यापेक्षा खूप जास्त फायदे आहेत. हृदयाच्या आरोग्यासाठी लसूण अतिशय गुणकारी आहे. नियमित लसूण खाल्ल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहणे, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहणे आणि रक्तवाहिन्या निरोगी राहणे हे उपयोग होतात.

लसूण कच्चा, शिजवलेला अथवा पावडर स्वरूपात खाल्ला तरी हे सर्व फायदे मिळतात. दररोज सकाळी उठून लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास फार मोठा फायदा होतो.

४. लिंबाचा रस

दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते पाणी पिण्यामुळे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होण्यास खूप मदत होते. शरीरातील सर्व अशुद्ध पदार्थ बाहेर टाकले जाऊन रक्ताभिसरण सुधारण्यास खूप मदत होते.

ब्लॅक टी मध्ये लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करणे देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. लिंबाच्या रसाच्या सेवनाने शरीरातील फॅट कमी होऊन वजन कमी होण्यास देखील खूप मदत होते. वजन कमी झाल्याचा हृदयाचे कार्य सुधारण्यास खूप फायदा होतो.

५. आले

आयुर्वेदाने आले अतिशय गुणकारी आहे असे सांगितले आहे. रक्तशुद्धीकरणाबरोबरच शरीरात नवीन रक्तवाहिन्यांच्या निर्मितीसाठी आल्याचे नियमित सेवन अतिशय गुणकारी ठरते.

आल्याचा चहा किंवा पदार्थांमध्ये आले वापरणे अतिशय गुणकारी आहे.. त्याच प्रमाणे आले किसून त्याच्या रसाचे किंवा किसाचे सेवन केल्यास अतिशय फायदा होतो.

तर मित्र मैत्रिणींनो, हे आहेत असे पाच सहजपणे उपलब्ध असणारे पदार्थ ज्यांच्या नियमित सेवनामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्यास खूप मदत होते. आपल्या घरी आणि बाजारात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या या पदार्थांचे नियमित सेवन करा आणि अशुद्ध रक्तामुळे होणारे निरनिराळे परिणाम टाळा. त्याचबरोबर संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, जंक फुडचे सेवन टाळणे हे सुद्धा महत्वाचे आहे.

लेखात दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख जरुर शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।