नमस्कार मित्रांनो,
मागचे पाच दिवस मी, बेंगलोर मध्ये Shri Shri Ravisankar यांच्या आश्रमात होतो.
पहील्याच दिवशी असं जाणवलं की, पिक्चरप्रमाणेच आपल्या आयुष्याचे पण दोन पार्ट असतात…..
पहीला, श्री श्री रविशंकर यांना भेटण्याच्या अगोदरचा आणि दुसरा, ‘श्री श्रीं’ ना अनुभवल्यानंतरचा!..
खरचं, मनामध्ये असामान्य उर्जा भरणारे, शरीराच्या कणाकणामध्ये दिव्यत्वाची अनुभुती जाणवुन देणारे होते हे पाच दिवस!….
हिरवागार नयनरम्य, निसर्ग, दररोज नित्यनेमाने नवनवीन योगासने आणि प्राणायाम, रोज शिकवले जाणारे कित्येक वेगवेगळे ध्यानाचे प्रकार, डोळे बंद करुन संगीताच्या तालावर हरवुन जाणं, आजुबाजुला हजारोंच्या संख्येने प्रेमळ माणसं, स्वतःला विसरवुन प्रभुप्रेमात तल्लीन करणारा सत्संग,……
आणि सोबत मंत्रमुग्ध करुन गायला आणि नाचायला भाग पाडणारी गोड आवजात गायलेली भजने.
आणि सोबत एखाद्या लहान बालकाप्रमाणे निरागस असणारे, पण प्रेम आणि ज्ञानाचा पाऊस पाडून चिंब भिजवणारे, श्री श्री रविशंकर!…
इथं आल्यावर असं काही ‘विलक्षण’ घडतं की माणुस स्वतःच्या प्रेमातच पडतो….
आणि नकळत इतरांवरही अमर्याद ‘प्रेम’ करायला लागतो.
स्वार्थ, द्वेष, राग, मत्सर, चिंता, भिती मनाच्या चाळणीतुन आणि गाळणीतुन दुर दुर निघुन जातात, मन अंतर्बाह्य स्वच्छ आणि शुद्ध होतं!..
आणि शिल्लक उरतं ते फक्त आणि फक्त ‘प्रेम’!…
आयुष्य बदलुन टाकणारे हे दिवस, हे अनुभव आणि ह्या आठवणी……
पहाटे पाच ते रात्री दहा अत्यंत पॅक शेड्युल असायचा, तरीपण जमेल तसं, शक्य तेवढं, प्रत्येक दिवसाचा अनुभव वहीत उतरवुन ठेवत होतो.
आणि बघता बघता चक्क दोनशे पेजेसची वहीच भरली, मग सहजच त्याला नाव दिलं, बंगलोर डायरीज…
त्यातले काही मोजके अनुभव, इंट्रेस्टींग माहिती, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नव्याने गवसलेला अर्थ, आणि उर्जा कशी मिळवायची याबद्दलचं मनन चिंतन, हे सगळं सगळं, मनसोक्तपणे “बॅंगलोर डायरीज… श्री श्रींच्या सान्निध्यात” ह्याच नावाने मी तुम्हा सार्यांसोबत शेअर करणार आहे.
ह्या पाच दिवसात अजुन एक गोष्ट जाणवली, माझ्या मनस्वी लिहिण्याला मनमुराद दाद देणारे, आणि न चुकता माझे लेख वाचणारे, तुम्ही सर्वजण, माझ्या आयुष्याचा एक ‘अविभाज्य’ भाग झाला आहात!..
लव्ह यु ऑल!..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.