मागच्या लेखात आपण लघु आणि गुरु आहाराचा आयुर्वेदीय संदर्भ बघितला. आता आपण पाहू, गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? म्हणजे हे पचायला जड की हलकं एवढा बारीक सारीक विचार कोणी करावा?
मंदकर्मी
सावकाश हालचाली करणार्या व्यक्ती🙇♂(🐌गोगलगाय कॅरॅक्टर) …. उदाः ज्यांना वेळेत कोठेही पोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत.
‘हा बघू’ असा शब्दप्रयोग जास्त वेळा करणार्या व्यक्ती. ज्यांना अंघोळ🚿,शौचविधी व कपडे घालून 🤷♂आवरायलाही वेळ लागतो अशा व्यक्ती. फारच लाॅजिकली सांगायचे झाले तर ज्यांना घड्याळ ⏰🕰⏱काही वेळ पुढे करून ठेवावे लागते असे व्यक्ती.
मंदाग्नि
ज्यांना योग्य वेळी भूक लागत नाही, किंवा खाल्लेले वेळेवर पचत नाही.😕
अनारोग्यी
रोगावस्थेत🤕🤒 किंवा जे सतत येनकेन प्रकारे आजारी असतात. थोडक्यात ज्यांची गाडी💊💉🌡 सारखी गॅरेजला 🚨🏥👨⚕🧤 लागते अशी मंडळी.
सुकुमार
म्हणजे कोमल प्रकृतीचे.😊☺☺
सुखोचित
सुखी 📱💻🖨💰💎🛁🚿🧖♂व आरामदायी 🚖💺जीवन जगणारे(उदाः ज्यांचा प्रवास A.C.घरातून 🏨🏬A.C.कारमध्ये🚘 व A.C.कारमधून🚘 A.C. आॅफिस🏣💺 मध्ये असा उभयमार्गी चालू असतो असे सुखजीवी.)
म्हणजेच उपरोक्त व्यक्तींनी आपला आहार गुरु (पचायला जड) नसावा याची काळजी घ्यावी!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.