जेवणाच्या सुट्टीत करा ह्या १६ गोष्टी…आळस टाळा ॲक्टीव्ह रहा

 

स्वतःची योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या निरोगी रहाल.

पण बऱ्याच वेळा आपण नोकरी, व्यवसाय, कुटुंबाची जबाबदारी यात एवढे गुंतून पडतो की स्वतः कडे लक्ष द्यायला वेळच नसतो.

खरंतर या कामाच्या टेन्शन मधे अडकून पडलेले असतानाच तुमच्या शरीराला, मनाला विश्रांतीची किंवा देखभालीची जास्त गरज असते.

स्वतःची काळजी घेणे म्हणजे शरीर, मन आणि भावनिक आरोग्य यांचे संतुलन साधणे !!!

हे कसे करायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी दहा ते पंधरा मिनिटे एवढ्या कमी वेळात तुम्ही स्वतःसाठी अशा काही गोष्टी करू शकता ज्याने तुम्हाला शारीरिक थकवा किंवा मानसिक तणाव त्रास देणार नाही.

आणि हे पंधरा उपाय तुम्ही रिकाम्या वेळात किंवा अगदी ऑफिस मधल्या जेवणाच्या सुट्टीत सुद्धा सहजपणे करु शकता.

मग पाहूया तर हे साधे सोपे स्वतः ला ॲक्टीव्ह आणि फिट ठेवण्याचे उपाय 

स्वतःला ऍक्टिव्ह आणि फिट ठेवण्याचे उपाय

१. चौरस आहार घ्या

जेवणाची वेळ चुकवू नका. किंवा वेळ वाचवण्यासाठी म्हणून जेवणाऐवजी जंक फूड खाऊ नका. पटकन मिळणारा पर्याय हा चौरस आहारासारखा पौष्टिक नसतो.

तुमचा वेळ वाचवण्याच्या नादात शरीराचे नुकसान करु नका. जर ताजे, साधे, आरोग्यदायी जेवण घेतलेत तर तुम्हाला काम करायला जास्त ऊर्जा मिळेल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत चौरस आहाराशी तडजोड करू नका.

२. ध्यानधारणा

फक्त १० मिनिटे शांतपणे ध्यान केलेत तर स्ट्रेस, टेन्शन खूप कमी होते. ध्यान करणे सरावाने जमते.

पण नवीन असताना मार्गदर्शनासाठी तुम्ही वेगवेगळे ॲप्स वापरु शकता.

३. हॅंड मॉइश्चरायझर वापरा

सतत कीबोर्ड वर काम करुन हात, बोटं थकून जातात. जेवणाच्या सुट्टीत एखाद्या चांगल्या हॅंड मॉइश्चरायझरने हातांना हलका मसाज करावा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पुन्हा फ्रेश वाटते.

४. स्ट्रेचिंगचे व्यायाम करा.

जर तुम्ही दिवसभर खुर्चीवर बसून काम करत असाल तर साहजिकच तुम्हाला स्नायू जखडणे, अंगदुखी, कंबर आणि मान जखडणे असे त्रास जाणवू शकतात.

म्हणून लंच ब्रेक मध्ये साधे, सोपे शरीर ताणले जाईल असे व्यायाम करा.

अगदी दहा मिनिटे, खुर्चीवर बसूनही स्ट्रेचिंग करता येते. त्यामुळे दुपारनंतर तुम्हाला अंगदुखी जाणवणार नाही.

५. बंदिस्त खोलीतून बाहेर पडा

कामाचा वेळ वाचवण्यासाठी आपण कॉम्प्युटर समोरच मेल्स चेक करत करत किंवा मेसेजेस पहात जेवण भराभर उरकून घेतो पण असे न करता आवर्जून बंदिस्त ऑफीसरुम मधून बाहेर पडा.

शक्यतो सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी दोन फेऱ्या मारा. बाहेरच बसून जेवा. यामुळे ताजी हवा आणि बाहेरचे वातावरण यामुळे मनावरचा ताण कमी होतो.

६. लंचब्रेकमधे हर्बल टी घ्या

तुमच्या ऑफीसमध्ये चहा करून घेण्याची सोय असेल तर स्वतःसाठी छानसा हर्बल टी तयार करून घ्या. यातील औषधी वनस्पतींमुळे थकवा दूर होतो आणि फ्रेश वाटते.

७. हलकेफुलके संगीत ऐका

जेवणाच्या सुट्टीत १० मिनिटे संगीत ऐकल्यामुळे मूड प्रसन्न होतो. मन शांत होते. शास्त्रीय संगीतातील राग मन:शांती देणारे आहेत.

हे ऐकल्यामुळे तुम्हाला पुढचे काही तास शांतपणे काम करणे शक्य होईल.

८. पाणी प्या

कामाच्या गडबडीत आपण दर दोन तासांनी पाणी प्यायला विसरतो. त्यामुळे चिडचिड, डोकेदुखी, थकवा, चक्कर आल्यासारखे वाटणे अशी ल‌क्षणे दिसू शकतात.

लंच ब्रेकमध्ये न चुकता पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण आवश्यक तेवढे असेल तर एनर्जी लेव्हल टिकून रहाते.

९. तुमच्या फोनला १० मिनिटे विश्रांती द्या

आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सतत चहूबाजूंनी आपल्यावर माहितीचा भडीमार होत असतो. सतत येणारे मेसेजेस, नोटिफिकेशन्स, इ-मेल्स यामुळे एक प्रकारचा ताण मनावर येतो.

या डिजिटल ओझ्यामुळे दबून गेल्यासारखे वाटते. अशावेळी दहा मिनिटे तुमचा फोन दूर ठेवा व शांत डोळे मिटून बसा. खूपच रिलॅक्स वाटेल.

१०. कृतज्ञता यादी बनवा

अशा कोणत्या ५ गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ  आहात. किंवा या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाला तरी धन्यवाद द्यावेसे वाटते.

दररोज अशा पाच गोष्टी लिहून ठेवा. या गोष्टी कुठल्याही असू शकतात. तुमचे कुटुंब, मित्रपरिवार, आरोग्य, घर काहीही असू शकते.

पण या लिहून काढलेल्या यादीवर जेव्हा तुम्ही नजर टाकाल तेव्हा लक्षात येईल की आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत.

कामाचा ताण आल्याने जीवन नीरस वाटू शकते अशावेळी या लिखाणाचा खूप फायदा होतो.

११. पाच दहा मिनिटे फेऱ्या मारा

सतत एकाच जागी बसून काम केल्यास अंग जखडते आणि मनावर ताण येतो. लंच ब्रेकमध्ये थोडे चालल्यामुळे पाय मोकळे होतात आणि मन हलके होते. शतपावली घालणे हा सुद्धा चांगला उपाय आहे.

१२. चांगले पॉडकास्ट ऐका

यामुळे सकाळपासून सतत  सुरू असलेल्या मिटिंग्ज, रिपोर्ट्स, ईमेल आणि समोर असलेल्या पेंडिंग कामाची लिस्ट यातून थोडी सुटका मिळेल.

मन वेगळ्या विषयाकडे वळल्याने सततचे तेच तेच विचार कमी होतील.

१३. मित्रमैत्रिणींना मेसेज करा

सतत कामाच्या तणावाखाली असताना आपण आपल्या जवळच्या नात्यांपासून काहीसे दूर जातो. यामुळे एकटेपणाची भावना मनात निर्माण होते.

म्हणून जेवणाच्या सुट्टीत अधूनमधून आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना एखादा मेसेज करा. त्यांची विचारपूस करा.

यामुळे पुन्हा मैत्रभावना वाढीस लागते आणि मनावरचा ताण, कंटाळा दूर होतो.

१४. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणे

हे जरा विचित्र वाटेल, पण का ते बघा

खूप दिवसांपासून तुम्ही डॉक्टरांची भेट घ्यायची असं ठरवता पण दिवसरात्र सतत कामाच्या व्यापात तुम्हाला हे जमतच नाहीय.

आणि सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही हे टाळताय. अशा वेळी लंच ब्रेक मध्ये न चुकता ही अपॉइंटमेंट घेऊन टाका.

तुमच्या आरोग्याच्या बाबतीत टाळाटाळ करणे महागात पडू शकते. म्हणून या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा.

१५. डायरी लिहीणे

दिवसभरातील ठळक घटना रात्री झोपण्यापूर्वी लिहून काढल्या तर भावनिक संतुलन साधले जाते.

पण दिवसभर खूप थकवा आला तर रात्री तुम्ही डायरी लिहायचा आळस करु शकता. म्हणूनच जेवणाच्या सुट्टीत असे सुविचार, तुम्हाला आवडलेले कोट्स, कविता किंवा तुमच्या आवडत्या पुस्तकातील काही वाक्ये, तुमचे स्वतःचे विचार लिहून काढा.

त्यामुळे साचून राहिलेले विचार, भावना यांचा निचरा होतो आणि मन ताजेतवाने होते.

आणि last but not the least,

१६. मनाचेTalks वाचणे

तुम्हाला ताजे तवाने करणारी विश्वासार्ह आणि सकारात्मक विचार करायला लावणारी माहिती वाचण्यासाठी तुमच्या ब्रेक मध्ये आवर्जून मनाचेTalks ला भेट द्या!!

तर हे आहेत सोळा साधे, सोपे उपाय ज्यामुळे तुमचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलन साधले जाईल.

आता यानंतर तुमच्या लंच ब्रेकचा वेळ जाणीवपूर्वक खर्च करा. या अगदी साध्या उपायांनी तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. आणि प्रसन्न, शांत मनाने काम करु शकता.

यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे जरूर सांगा. तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी करता हे देखील कळवा.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा. स्वत:ची काळजी घ्या. स्वस्थ आणि मस्त रहा !!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।