तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. तुम्ही मजेत राहायचं की रडत-खडत दिवस ढकलायचे, यावर नियंत्रण इतरांचं नाही तर तुमचं स्वतःचं असलं पाहिजे.
असं हे नियंत्रण ठेवणं सोपं आहे का? हे प्रत्येकाला जमू शकेल का? आणि ‘हो’ तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ‘रहस्य जगण्याचे’ या मालिकेतील पुढचे पुस्तक मनाचेTalks तुमच्यासाठी घेऊन येत आहे.
या पुस्तकात, अस्थिर नकारात्मक विचारांवर विजय मिळवून मानसिक ताकत टिकवून ठेवण्यासाठी रोजच्या जगण्यात तुम्ही स्वतः मध्ये काय बदल केले पाहिजेत. हे सोप्या भाषेत सांगितलेले आहे.
आमच्या बुक सिरीज मधील हे दुसरे पुस्तक आहे. पहिले पुस्तक व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर असून त्याच्या लोकप्रियतेनंतर खास वाचकांच्या आग्रहास्तव आम्ही हे दुसरे पुस्तक घेऊन आलो आहोत.
मानवाची सर्वात प्रबळ इच्छा कोणती असते बरं?
तर आपलं आयुष्य समाधानाने जगता यावं, ही प्रत्येक व्यक्तीची अगदी स्वाभाविक इच्छा असते. आणि आपलं आयुष्य कसं जगायचं हे संपूर्णपणे त्या व्यक्तीच्या हातात असतं. हो, हे अगदी खरं आहे !!!
बऱ्याच वेळा आपण वाईट घाटनांसाठी परिस्थिती, आजूबाजूची माणसे, इतर बाह्य घटक यांना दोष देतो. इतरांमुळे मी समाधानाने जगू शकत नाही असं म्हणतो. पण या पुस्तकामधून तुम्हाला अशा काही मौल्यवान गोष्टी शिकता येतील, की त्यामुळे तुमचा जीवनप्रवास अगदी बदलून जाईल.
समाधानी असणं म्हणजे नक्की काय?
निश्चितच प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की. शांत, प्रसन्न मन, अतूट आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनमूल्ये जर तुमच्यापाशी असतील तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही समाधानी राहू शकता. कारण मन:शांती ही काही इंजेक्शन सारखी बाहेरून टोचता येत नाही. हा आत्मदीप आहे आणि तो स्वतःलाच तेवत ठेवावा लागतो.
ही आंतरीक ज्योत सतत प्रकाशमान कशी ठेवायची? हेच या पुस्तकात सांगितले आहे.
जीवन म्हटले की चढ उतार आलेच. संकटे तर येणारच आणि त्यामुळे मन अस्थिर होणे, तणाव येणे हे सर्व काही नैसर्गिक आहे. पण त्यामुळे खचून न जाता मनातील वादळ शांत करुन परत एकदा आयुष्याची गाडी रुळावर आणायची तर तुम्हाला सर्वात आधी एक काम करावेच लागेल. ते म्हणजे आपल्या परिस्थितीचा संपूर्ण स्विकार!!!
पण मन मोठं हट्टी असतं. एवढ्या सहजतेने ते कोणतीही गोष्ट मानत नाही. म्हणून मग मनाला काही प्रश्न विचारुन त्याला जागं करावं लागतं. हे प्रश्न कोणते आणि त्यातून आपल्या आयुष्याचा आढावा कसा घ्यायचा, आपल्या अंतरात्म्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्ग तुम्हाला हे पुस्तक दाखवेल. पण म्हणजे यात खूप किचकट असं काही तत्वज्ञान सांगितलेलं नाही बरं, मित्रांनो…
आपण सहसा सरधोपट मार्गावरुन चालत रहातो. समाज, रुढी, परंपरा यांच्या चक्रात अडकून चाकोरीबद्ध जगत असतो. पण यामुळे आपल्या मनात खोलवर डोकावून पहायचं राहूनच जातं. मला स्वतःला नक्की काय हवंय? हे लक्षात आलं नाही की एक प्रकारचा गोंधळ उडतो.
फक्त चांगली नोकरी, कुटुंब यांच्या पलीकडे जाऊन या ‘स्व’ चा शोध घेतला तरच जीवन अधिक अर्थपूर्ण होईल. आपण भरभरून का जगू शकत नाही? आयुष्य नीरस झालंय पण ते सप्तरंगी कसं करायचं हे सुद्धा या पुस्तकातील लेखांमधून तुम्हाला समजेल.
एकदा का हे लक्षात आलं की तुम्ही आपोआपच सकारात्मक मार्गावर वाटचाल कराल. स्वतःवर मनापासून प्रेम करायचं तर आधी मनाशी दोस्ती करावी लागते. आणि त्यासाठी आपली जीवनमूल्ये कोणती? ती कशी ओळखायची? हे सुद्धा तुम्हाला यातून समजेल. तुमची स्वप्ने मनातच न राहता वास्तवात उतरतील.
या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत, रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन हे सांगितले आहे.
हे पुस्तक वाचताना जणू काही आपलं मनंच आपल्याशी संवाद साधत आहे आणि समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली आपल्या हातात सोपवत आहे याचा तुम्हाला अनुभव येईल.
हे केवळ एक पुस्तक नसून तुमच्या मनाचे मैत्र आहे या विश्वासाने आणि आनंदाने मनाचेTalks ‘रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे’ हे ईबुक वाचकांसमोर सादर करत आहे.
पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.