बॅंगलोर डायरीज् … श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- ४)

दिनांक – ३ जुन (रविवार)

सकाळी पावणेसहाला चारशे लोक सुदर्शन क्रिया, योगासने करण्यासाठी यज्ञशाळेच्या हॉलमध्ये उत्साहाने एकत्र जमले आहेत. शार्प सहा वाजता विनितभाई व्यायाम सुरु करतात, जवळपास सव्वा तास ‘श्री. श्री. योग’ केला जातो. श्री. श्री. योग म्हणजे एका क्रमाने शरीराचे हलकेफुलके व्यायाम, पोटावरची, पाठीवरची योगासने आणि प्राणायाम असे त्याचे स्वरुप आहे. त्यानंतर सुदर्शन क्रिया आणि ध्यान करुन साधना समाप्त होते.

चविष्ट न्याहरी करुन, सर्वजण दहा वाजता यज्ञशाळेत एकत्र येतात. टीचर नेहादीदी मुद्रा प्राणायाम शिकवुन सेशनची सुरुवात करतात. त्यानंतर रेकॉर्डींगच्या माध्यमातुन गुरुजींच्या आवाजात दिया-ध्यानाची सुरुवात होते. हे ध्यान फक्त २ टक्के डोळे उघडे ठेवुन अर्ध उन्मिलीत नेत्र ठेवुन केले जाते, जसं एखादा दिवा भिंतीच्या देवळीत असतो आणि दोन्ही बाजुला प्रकाशित करतो, तसं आपलं मन, एकाच वेळी, शरीराच्या आत आणि बाहेर डोकावल्याचा आगळावेगळा अनुभव घेतो.

त्यानंतर आयुष्यात असलेल्या समस्यांना सामोरे कसे जावे याबद्द्ल गुरुजींचा एक व्हिडीओ दाखवला जातो, प्रत्येक प्रश्नाकडे बघण्यासाठी गुरुदेव चार उपाय सांगतात. कुठलाही प्रश्न सतावत असेल तर यापैकी एक मार्ग नक्की समस्या सोडवेल.

  • हे असंच आहे.
  • हे बदलुन जाईल.
  • प्रॉब्लेम डोळ्यासमोर आणुन वाघासारखी डराकाळी फोडा.
  • भगवंताला शरण जा.

त्यानंतर अचानक वातावरणात आनंदाच्या लहरी पसरतात. पाच मिनीटात गुरुजी येणार आहेत. ही बातमी येऊन थडकतो. आणि खरोखरच पाच मिनीटात गुरुजी पोहचतात देखील. आल्याबरोबर गुरुजी डोळे बंद करुन. पाठीच्या कण्यामध्ये एक बारीक धागा आहे. त्याकडे लक्ष द्यायला सांगतात. पाऊण तास ध्यान केल्यास, पक्ष्याच्या पिसासारखं, खुपच हलकंफुलकं वाटत असल्याची अनुभुती येते. आज संध्याकाळी मौन दिले जाणार आहे. त्याबद्दल माहीती दिली जाते.

बघता बघता जेवण करुन दुसर्‍या सेशनची सुरुवात होते. साडेचारशे लोकांपर्यंत एक कोरा कागद आणि रंगखडु दिले जातात. तुम्हाला आवडेल ते चित्र काढा असे माणिक भाई सांगतात. जेव्हा लहान मुलं चित्र काढतात तेव्हा त्यात ते पुर्णपणे गुंग होऊन जातात. त्यावेळी त्यांना दुसरा कसलाच विचार मनात येत नाही. ते फक्त चित्र काढत नाहीत, ते स्वतःच ते चित्र बनतात. अगदी असंच प्रत्येक काम आपणही तन्मयतेनं केलं पाहीजे. एक तास सर्वजण एक चित्र काढण्यात रंगुन जातात. अगदी लहान मुलासारखं. आयुष्यात काढलेलं हे सर्वश्रेष्ठ चित्र आहे. अशी प्रत्येकाच्या मनात भावना असते.

नंतर गुरुजींच्या आवाजात तीन वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान शिकवले जाते. एका मध्ये डोळे बंद करुन मनाला शरीरापासुन दहा फुट अंतरावर नेले आहे. अशी कल्पना करण्यास सांगतात. ह्या सुद्धा ध्यानाची अनुभुती अदभुत असते.

माणिकभय्या अतिशय गोड आवाजात सहजपणे बोलतात, पण त्यांचं एकेक वाक्य मनाला भिडतं, उदा. “पॅशनमध्ये पेशंस नसतील, तर डिप्रेशन लवकर येतं!”

संध्याकाळी यज्ञशाळेत उत्साहात सत्संग होतो, रविवार असल्याने धो धो पाऊस असुनही बेंगलोरहुन आलेल्या लोकांमुळे तुंबळ गर्दी आहे, एकाहुन एक सरस गोड आवाजात गायलेल्या भजनांनी सुरु झालेला सत्संग, एक ध्यान आणि गुरुजींसोबतच्या प्रश्नीत्तरांसोबत संपतो. आपल्याला एका व्हिडीओ सेशनसाठी तिथेच थांबायला सांगण्यात येतं, गुरुजी ‘ज्ञानाचे चार स्तंभ’ या विषयावर सुंदर विवेचन करतात

  • पहीला स्तंभ – विवेक
    जगातली प्रत्येक गोष्ट बदलत आहे, माझ्यातलं दैवी तत्व सोडुन शरीरासकट प्रत्येक गोष्ट बदलत आहे, हे समजणं, ह्याला सतत लक्षात ठेवणं, ह्याला म्हणतात, विवेक!
  • दुसरा स्तंभ – वैराग्य
    माझ्याजवळ सगळं काही आहे, आणि मला जे हवं ते मला मिळेल, असा विश्वास बाळगणं, आनंदी राहणं, हयाला म्हणतात, वैराग्य!
  • तिसरा स्तंभ – सहा प्रकारच्या संपत्ती
    १) क्षमा केल्याने शांती मिळते, जशी दुसर्‍याला क्षमा करायची, तशी स्वतःलाही हातुन घडलेल्या चुकांबद्दल क्षमा करुन मोकळं व्हायचं!
    २) दम म्हणजे इंद्रियनिग्रह, नाहीतर आळस, अतिखाणे, व्यसने, रोगराईकडे आणि दुःखाकडे घेऊन जातात.
    ३) तितीक्षा – यश मिळो वा अपयश, सुख असो वा दुःख, त्याला सहज सामोरे जायचे!
    ४) उपरती – कोणतेही काम उत्साहाने करणं, कोणतही काम शंभर टक्के रस घेऊन करणं, ह्याचंच नाव उपरती!
    ५) श्रद्धा म्हणजे विश्वास, श्रद्धेशिवाय जगणं म्हणजे अशक्य आहे, श्रद्धा नाहीशी झाली की भिती आणि भ्रम त्याची जागा घेतात.
    ६) समाधान – भगवंताला प्राप्त केलं की जीवनात तृप्ती येते,
  • चौथा स्तंभ – मुमुक्षत्व
    ईश्वराला जाणुन घेण्याची इच्छा म्हणजे मुमुक्षत्व! स्वतःच्या जीवनाचा उद्देश्य समजणं, ह्या जगात आणि आपल्या पोकळ आणि रिकाम्या शरीरात भगवंताला शोधणं, म्हणजे मुमुक्षत्व!

ज्ञानाचे चार स्तंभ आणि सहा संपत्ती यांचं वर्णन गुरुजींच्या उदाहरणांसह रसाळ वाणीत ऐकणं, समजुन घेणं आनंददायी असतं.

त्यांनतर गुरुजी सर्वांना मौन का पाळायचं, याबद्द्ल आणि मौनाचं महत्व सांगतात. मग नेहादीदी सर्वांना पुढच्या तीन दिवसांसाठी ‘ऑफीशिअल’ मौनाची दिक्षा देतात.

उद्या सोमवार असल्याने सकाळी नऊ वाजता, रुद्रपुजा आहे, असं कळतं, दर सोमवारी गुरुदेव स्वतःच्या हाताने रुद्रपुजा करतात, एक प्रकारे हे आपल्या मनाला घातलेलं मंत्रांचं स्नान असतं!

आणि जाताजाता सांगतात की, “आज झोपताना अशी कल्पना करा की गुरुजी तुम्हाला प्रेमाने थापटुन थापटुन झोपवत आहेत.”

दिवस संपतो, विचारांचं चक्र थांबलेलं असतं आणि उचंबळुन आलेला आनंदाचा आणि प्रेमाचा प्रवाह, मात्र रात्रभर अव्याहत सुरुच राहतो!..


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।