आता सगळीकडे ऊन वाढत आहे. अशा गरमीच्या वातावरणात गार गार कोल्डड्रिंक प्यावसं वाटणं अगदी सहाजिक आहे. पण वारंवार कोल्डड्रिंक पिणे आपल्या शरीराच्या आरोग्याला घातक ठरू शकते. त्याऐवजी उन्हाळ्याची तलखी कमी करण्याचा सोपा, सहज उपलब्ध असणारा आणि कोल्डड्रिंकच्या तुलनेत अगदी स्वस्त असणारा आरोग्यदायी पर्याय म्हणजे ताक.
उन्हाळ्यात गार ताक प्या आणि आपले आरोग्य सांभाळा.
चला तर मग ताक पिण्याचे हे ९ प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबवूया . . .
१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरतात आणि पोटदुखी कमी होते.
५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
९) महत्वाचे म्हणजे तीन दिवस ईतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. परंतु अर्थातच हे करताना आधी आपली तब्येत ठीक आहे ना हे पाहणे आवश्यक आहे.
ताकाचे हे फायदे आयुर्वेदाने सुद्धा प्रमाणित केले आहेत.
चला तर मग आजपासून नियमित ताक पिण्यास सुरुवात करूया.
याशिवाय आणखी महत्वाचे म्हणजे उन्हाळ्यात थंड पदार्थांचे सेवन करावे आणि उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे.
पण थंड पदार्थ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आइस्क्रीम, कोल्डड्रिंक वगैरे येते. परंतु हे पदार्थ थंड जरी असले तरी ते प्रकृतीने उष्ण असतात. त्यामुळे पदार्थ प्रकृतीने कसा आहे हे जाणून घेऊन मगच त्याचे सेवन करावे.
आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही उष्ण आणि थंड पदार्थांची यादीच देत आहोत.
उष्ण व थंड पदार्थ
- कलिंगड – थंड
- सफरचंद – थंड
- चिकू – थंड
- संत्री – उष्ण
- आंबा – उष्ण
- लिंबू – थंड
- कांदा – थंड
- आलं/लसूण – उष्ण
- काकडी – थंड
- बटाटा – उष्ण
- पालक – थंड
- टॉमेटो कच्चा – थंड
- कारले – उष्ण
- कोबी – थंड
- गाजर – थंड
- मुळा – थंड
- मिरची – उष्ण
- मका – उष्ण
- मेथी – उष्ण
- कोथिंबीर/पुदिना – थंड
- वांगे – उष्ण
- गवार – उष्ण
- भेंडी साधी भाजी – थंड
- बीट – थंड
- बडीशेप – थंड
- वेलची – थंड
- पपई – उष्ण
- अननस – उष्ण
- डाळींब – थंड
- ऊसाचा रस बर्फ न घालता – थंड
- नारळ(शहाळ) पाणी – थंड
- मध – उष्ण
- पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) – थंड
- मीठ – थंड
- मूग डाळ – थंड
- तूर डाळ – उष्ण
- चणा डाळ – उष्ण
- गुळ – उष्ण
- तिळ – उष्ण
- शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर – उष्ण
- हळद – उष्ण
- चहा – उष्ण
- कॉफी – थंड
- पनीर – उष्ण
- शेवगा उकडलेला – थंड
- ज्वारी – थंड
- बाजरी/नाचणी -उष्ण
- आईस्क्रीम – उष्ण
- श्रीखंड/आम्रखंड – उष्ण
- दूध, दही, तूप, ताक (फ्रिज मधले नाही) – थंड
- फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
- फ्रिज मधिल पाणी – उष्ण
- माठातील पाणी – थंड
- एरंडेल तेल – अती थंड
- तुळस – थंड
- तुळशीचे बी – उत्तम थंड
- सब्जा बी – उत्तम थंड
- नीरा – थंड
- मनुका – थंड
- पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
- हॉट ड्रिंक सर्व – उष्ण
- कोल्ड्रींक सर्व – उष्ण
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो. त्यामुळे जास्तीत जास्त थंड पदार्थांचे सेवन करावे आणि उष्ण पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे.
चला तर मग, ह्या उन्हाळ्यात आपली तब्येत सांभाळूया आणि इतरांना देखील ही माहिती मिळावी म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेयर करूया.
Image Credit : Tips In Marathi YouTube
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.