जगण्याची कला शिकवणारी काही पुस्तके…. (Motivational Books In Marathi)

पुस्तकं हि आपली सगळ्यात चांगली मित्र असतात असे म्हणतात. काही पुस्तकं करमणुकीची साधनं म्हणून वाचली जातात, काही ज्ञानाचे भांडार म्हणून तर काही पुस्तकं आयुष्यातल्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शक ठरतात.

आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल.

पालकांनी आपल्या किशोरवयीन मुला-मुलींना वाचनातून समजवावी किंवा वाचायला द्यावी अशी हि पुस्तके नक्कीच आहेत. म्हणूनच या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांच्या खरेदीसाठीची सोयही येथे दिलेली आहे. (प्रेरणादायी पुस्तके- Motivational Books In Marathi) 

Think and Grow Rich (विचार करा आणि श्रीमंत व्हा)

नाव- थिंक अँड ग्रो रिच (मराठी) / Think & Grow Roch (English)
लेखक – नेपोलियन हिल

तुम्ही तुमच्या विचारातून तुमचे आयुष्य कसे सफल सम्पूर्ण घडवू शकाल हे या पुस्तकातून समजावून सांगितले आहे. लेखकाने २० वर्षांच्या कालखंडात ५०० हुन अधिक व्यक्तींचे अध्ययन करून श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सर्वसाधारण सवयी म्हणजे एकूणच त्यांची विचार करण्याची पद्धत यात सुरेख पद्धतीने उलगडून दाखवली आहे.

The 7 Habits of Highly Effective People (अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी)

नाव : अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी (मराठी)The 7 Habits of Highly Effective People
लेखक: स्टीफ़न आर. कवी

आपले आयुष्य सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आधी आपले विचार बदलले पाहिजेत.

आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्यांना सोडवण्यासाठी आपण आपल्या विचारांमध्ये बदल आणले तर नक्कीच त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो हे या पुस्तकातून जगातील अति परिणामकारक व्यक्तींच्या अनुभवातुन उलगडवून दिलेले आहे.

How to Win Friends and Influence People (मित्र जोड आणि लोकांवर प्रभाव पाडा)

नाव : मित्र जोड आणि लोकांवर प्रभाव पाडा / How to Win Friends and Influence People
लेखक: डेल कार्नेगी

How to Win Friends and Influence People हे पुस्तक १९३६ मध्ये प्रकाशित झाले आणि लवकरच बेस्ट सेलर पुस्तक ठरले. हे पुस्तक तुम्हाला नवे विचार नव्या महत्वकांक्षा आणि प्रेरणा देण्यासाठी खूपच उपयोगी आहे.

मित्र बनवणं, लोकांवर प्रभाव पडणं हि हातोटी खूपच कमी लोकांना अवगत असते. आणि ज्यांना ती नसते ते मनोमन सहजासहजी मित्र बनवू शकणाऱ्या लोकांनाच हेवा करतात.

तर असा हेवा करण्यापेक्षा हे पुस्तक वाचून नक्कीच ती हातोटी आपल्याला शिकता येईल.

Banner

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

  • अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
  • तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
  • निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
  • अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
  • मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
  • वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
  • आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
  • हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
  • तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
  • नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
  • आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
  • आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
  • स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
  • पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
  • मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
  • स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
  • स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
  • जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
  • समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
  • एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।