मित्रांनो, आज खुप गंमतीशीर किस्सा घडला. रविवारच्या पुण्यनगरीमध्ये माझा ‘आकर्षणाचा सिद्धांत खरा झाला.’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.
माझ्यावर अनेक संकटे आली तरीही मी आकर्षणाचा सिद्धांत वापरुन एका वर्षात खुप मोठी रक्कम कशी कमवली, ह्याविषयी तो लेख लिहला आहे.
आज एका व्यक्तीचा फोन आला.
“नमस्कार!”
“नमस्कार!” – मी ही हसुन प्रतिसाद दिला.
“तुम्ही कोणाशी बोलत आहात, माहीत आहे का?”
मी म्ह्ण्टले, “नाही.”
“मी चाळीस कोटीचा मालक बोलतोय.”
“ओके” मला गंमत वाटली.
“सर , तुमच्या लेखा मध्ये तुम्ही सांगितलं ना की तुम्हाला पैसे मिळाले आहेत, अशाच अविर्भावात रहा. सर, मला चाळीस कोटी मिळालेत अशा विश्वासाने मी वावरत आहे, पण हे पैशे मला कधी मिळतील, सर?”
जुजबी बोलुन मी फोन ठेवुन दिला.💰💰💰💰
मित्रांनो, कल्पना करा, एका माणसाने एका कुंडीत एक बी पेरलं, आणि रोज सकाळी उठुन तो माणुस त्या कुंडीकडे आणि त्या बी कडे रोज पाहतो, आणि त्याला सुचना देतो, ‘अरे झाडा, उगव’, ‘सुंदर सुंदर रंगबेरंगी फुलं येवु दे’, लवकरात लवकर चवदार फळं दे’, ‘ चल, फास्ट वाढ आणि मला थंडगार सावलीपण दे’,
मित्रांनो, दिवसभर काय, महीनाभर बोलल्याने, किंवा वर्षभर असं घोकल्याने झाड लवकर येईल का हो?
नाही ना?
जसं त्या कुंडीचं आहे, तसंच आपल्या आयुष्याचंही आहे!
काही न करता साधं रोप उगवत नाही, मग पैसे असे कसे मिळतील हो? ते ही चाळीस कोटी!
मित्रांनो, बागकाम हा माझा आवडता छंद आहे, माझ्या ऑफीसमध्ये अकरा सुंदर सुंदर रोपं आहेत, माझ्या ह्या मित्रांच्या सहवासात खुप फ्रेश वाटतं. ह्या माझ्या नवीन छंदामधुन मी खुप शिकलो.
रोप उगवण्यासाठी आधी ज्या मातीमध्ये ‘बीज’ पेरलं, ती सुपीक असावी लागते, त्याला रोज सकाळ संध्याकाळ नियमित पाणी द्यावं लागतं, इतकचं नाही, त्याला प्रॉपर उन्हं आणि हवा भेटली तरच नीट प्रकाश संस्लेषण होवुन झाडं हिरवीगार होतात.
रोपांना ठराविक अंतराने खतं टाकावी लागतात, अधुनमधुन त्यांना ताजेतवाने, टवटवीत ठेवणारे, केमीकलही फवारावी लागतात, नको त्या फांद्याची ट्रीमिंग करावी लागते. सडलेली पानं कापुनही टाकावी लागतात. मुळं मजबुत झाली की पानं, फुलं-फळं आपोआपच येतात.
अगदी असंच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीतही आहे.
इथे कुंडी म्हणजे आपलं मन आहे, त्यातली माती म्हणजे आपल्या भावना आहेत, ही माती कमी प्रतिची, हलक्या दर्जाची, दुषित असेल तर स्वप्नांचं बीज इथे अजिबात रुजणार नाही. मनामध्ये आनंदी, प्रसन्न प्रेमळ भावना असल्या की लवकरच स्वप्नांना अंकुर फुटतात.
कल्पनाशक्तीला बहर फुटतो.
सकाळ संध्याकाळ पाणी घालण्याची प्रक्रिया म्हणजे सकाळ संध्याकाळ मनात किंवा मोठ्याने ध्येयवाचन! नियमित अंतराने मनाला पुरवलेले सकारात्मक विचार आपल्या स्वप्नांच्या झाडासाठी उत्कृष्ट दर्जाच्या खताचं काम करतात.
रोपाला ताजंतवानं ठेवण्यासाठी अधुन मधुन ‘श्रद्धा’ आणि ‘प्रार्थना’ यांची फवारणी करत रहावी लागते!
संशय, द्वेष आणि निराशा अशा सुकलेल्या, जळलेल्या पानांना आवर्जुन कापुन टाकावं लागतं.
‘बीज’ चं रुपांतर डवरलेल्या रोपामध्ये, लगडलेल्या फुल-फळांमध्ये होण्यासाठी ‘प्रत्यक्ष कृती’ अवश्य आहे.
‘पेरलं की उगवतं’ हा निसर्गाचा नियमच आहे, खुद्द निसर्गही हा नियम मोडु शकत नाही.
अगदी असंच ज्या ज्या स्वप्नांच्या बीजाला ला ह्या सर्व अनुकुल गोष्टी पुरवल्या जातील, त्या त्या प्रत्येक बीजा ला उगवावंच लागेल.
कधी चटकन उगवेल, कधी थोडा वेळ लागेल, पण आज ना उद्या उगवावंचं लागेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला गुप्तधनाचे हंडे मिळवुन देणार नाही किंवा आकाशातुन पैशाचा पाऊसही नक्कीच पाडणार नाही.
पण आकर्षणाचा नियम वापरुन, तुमच्या सुप्त मनावर कल्पनाचं रोपण करण्यात, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल!
झाडाला जितक्या सहजतेने फुलोरा येतो, तितक्या सहजतेने आयुष्याच्या झाडालाही यशाची चवदार फळं लगडतील. पैसा, ड्रिम हाऊस, आकर्षक जीवनसाथी, ड्रिम कार, आनंदी परीवार, समाजात सन्मान, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि जगभर भ्रमंती हे सगळं मिळेल.
जे हवं ते सारं प्राप्त होईल.
एकदा ही कला शिकून घ्या,
मग चाळीस कोटी काय चारशे कोटीही मिळतील, पण ते फुकट मिळणार नाहीत. त्याबदलात कोणती ना कोणती सेवा द्यावी लागेल. स्वप्नांप्रती स्वतःला समर्पित करावे लागेल.
मित्रांनो येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत मी माझ्या व्हॉट्सएप ग्रुपसाठी रोज एक लेख लिहुन स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, मदत करणार आहे, प्रोत्साहन देणार आहे.
आकर्षणाचा सिद्धांत वापरुन आपली स्वप्ने पुर्ण करण्यात माझे लेख मदत करतील, असा विश्वास असल्यास तीनशे रुपये भरुन, ‘आकर्षणाचा सिद्धांत जाणणारे’ हा व्हॉटसएप ग्रुप जॉईन करा.
पैसे देऊन कोर्स जॉईन करण्यात खरोखर उत्सुक असाल तरच मी कोर्स जॉईन करण्यात उत्सुक आहे असा मेसेज करा, प्लिज!
वाचण्यासारखे आणखी काही…..
आकर्षणाचा नियम काम करावा यासाठी जगण्याचं सुत्र!
जागृत मन आणि सुप्त मन यांची शक्ती वापरून यशस्वी होण्याचं तंत्र…
लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
मी कोर्स जॉईन करण्यात उत्सुक आहे , प्लिज!
मी कोर्स जॉईन करण्यात उत्सुक आहे , प्लिज! paise kontya account madhe bharayvhe sir
सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.
धन्यवाद.
मी कोर्स जॉईन करण्यात उत्सुक आहे , प्लिज!
सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.
धन्यवाद.