तुमचा खरा गुन्हेगार कोण आहे? (एक प्रेरणादायी गोष्ट)

आज मी तुम्हाला तीन चोरांची गोष्ट सांगणार आहे.

चोर १ 

अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅलेंट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता…

एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘द ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच टारगेट करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचं लक्षण होवुन बसलं होतं.

चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती.

त्याच्या दुर्दैवाने एक दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला!

वयाची पुढची अठरा वर्षे त्याने जेलमध्ये काढली. जेलमधुन बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साधं जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.

लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली….. मुलाखत खुप रंगली

मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली? खरं खरं उत्तर द्या.”

“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.

“हो, हो!” एकच गलका झाला.

“मी सर्वात मोठी चोरी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.”

सगळे एकदम अवाक आणि शांत झाले.

“मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान व्यक्ती बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं दोन तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”

आर्थर बेरी खरं बोलला होता, त्याचा सर्वात मोठा गुन्हेगार तोच होता.

चोर २ 

१८८७ चा एक पावसाळा, एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला.

कॅश काऊंटर वर असलेल्या स्त्रीने स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच राहणारा तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!

नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला.

शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले.

ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिसही चक्रावले.

पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याच्या पेंटींग्ज जप्त केल्या गेल्या. चित्रकार निंगर जेलमध्ये गेला. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर कबुल केले.

कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले.

तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले.

विडंबना ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा.

त्याने सर्वात मोठी चोरी स्वतःसोबतच केली होती. प्रामाणिक आयुष्य जगुन तो कितीतरी पट भव्य दिव्य आयुष्य जगु शकला असता.

इतरांना न फसवता, त्याने आपल्या कलेला जोपासले असते तर, तो फक्त श्रीमंतच झाला नसता तर, त्याबदल्यात समाजाने, त्याला आदर, सन्मान आणि ओळख दिली असती, त्याला प्रेम मिळाले असते, आनंद, समाधान मिळाले असते.

पण त्याने स्वतःला फसवुन, स्वतःसोबतच, आयुष्यातली सर्वात मोठी चोरी केली होती.

चोरी ३ 

  • आपली अंगभुत कला न ओळखणारा, कधी आळशीपणामुळे आणि कधी स्वतःची खरी ओळख न पटल्यामुळे, आपल्या अंगातलं टॅलंट न ओळखु शकणारा प्रत्येक जण मोठ्ठा चोर आहे.
  • ती प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जी आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही.
  • ती व्यक्ती चोरच आहे, जीला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही.
  • ती प्रत्येक रिकामटेकडी व्यक्ती चोर आहे, जी समाजाला काहीही देत नाही, फक्त दुसर्‍यांचे दोष आणि उणीवा काढतो.

ही चोरी, कोणी मुद्दाम करतयं, किंवा कोणी नकळत, पण आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे.

आपल्या आजुबाजुच्यांवर आणि स्वतःच्या आयुष्यावर प्रेम न करणारा प्रत्येकजण गुन्हेगार आहे, आणि वरील दोन चोरांच्या आत्मकथनानुसार, सगळ्यात आधी तो, स्वतःचाच गुन्हेगार आहे.

ह्या चोरांच्या यादीतुन आपलं नाव वगळुन, यशस्वी लोकांच्या यादीत आपलं नाव कोरलं जावं.

आई जगदंबेकडे, ही अंतःकरणपूर्वक मागणी आणि प्रार्थना!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “तुमचा खरा गुन्हेगार कोण आहे? (एक प्रेरणादायी गोष्ट)”

  1. खुप सुंदर, अप्रतिम लेख या मुळे मला माझ्या मनात डोकावून पाहता येईल कि माझ्यात असे कोणते दोष, गुण आहेत आणि ते दूर करता येतील.
    मनाचे talks टीम चे मनापासून धन्यवाद. आणि या अनोख्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला खुप साऱ्या शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।