ज्यांना हवे ते कर्मचारी अशी हि भेट घेऊन खुश पण होतील. आणि स्वतः कम्पनीपण त्यांच्या बिजनेस स्कीलने फायदा मिळवेल. थोडक्यात काय तर काहीही फुकटात मिळत नाही हेच खरं. आपण जिथे काम करतो तेही काही वाईट नाही याचं समाधान मानायचं आणि कामाला लागायचं…😅😅
गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये सुरतमधले हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ६०० कार दिवाळीचा बोनस दिल्याच्या बातम्या येत आहेत. ढोलकीयांवर सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होतो आहे. सावजी ढोलकीया त्यांच्या दिलदारपणाचे गोडवे गेले जात आहेत. आपलाही बॉस किंवा कम्पनीचा मालक असा असता तर हि इच्छा तर प्रत्येकाच्या मनात नक्कीच डोकावून गेली. यापूर्वीही त्यांनी कर्मचाऱ्यांना मर्सिडिस, फ्लॅट दिल्याचे वृत्त आल्याचे आपल्याला माहीतच आहे.
कर्मचाऱ्यांना अश्या प्रकारे मिळणारा मोबदला नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. पण या बोनस च्या वृत्ताला तांत्रिकदृष्ट्या एक वेगळा पैलू पण आहे. मेरन्यूज डॉट इन ने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या कम्पनीतील कर्मचाऱ्यांशी बोलून हा बोनस नक्की आहे तरी कसा हे जाणून घेतले. तर काहीशी रंजक माहिती समोर आली.
सावजी ढोलकीया यांच्या कंपनीमधले कर्मचारी कॉस्ट टू कंपनी या तत्वावर काम करतात. याच नाही तर सगळीकडेच कर्मचाऱ्यांचा CTC ठरलेला असतो. म्हणजे कर्मचाऱ्याला एका वर्षात किती पगार द्यायचा हे आधीच निश्चित झालेलं असतं. हा सगळा एकूण कर्मचाऱ्यावर केला जाणारा खर्च म्हणजे ‘कॉस्ट टू कंपनी’ किंवा CTC. सावजी ढोलकीयांच्या हिऱ्यांच्या हरे कृष्ण कम्पनीमध्ये बोनस म्हणून जी काही रक्कम ठरते ती दर महिन्याच्या पगारातून काही प्रमाणात कापली जाते. त्यानन्तर दिवाळीला ठरलेली भेट देताना त्या कम्पनीला म्हणजे जर कार भेट केली तर त्या कारच्या शोरूमला संपूर्ण रक्कम अदा केली जाते. त्यामुळे हरे कृष्ण ही कंपनी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार देते हे अर्धसत्य असून बऱ्यापैकी पैसे हे कर्मचाऱ्याच्या सीटीसीतलेच म्हणजे पगारातलेच असतात.
शिवाय जी भेट दिली जाते आणि जे कर्मचारी भेट स्वीकारतात त्यांना पाच वर्ष नोकरी सोडणार नाही अशी हमी लिहून द्यावी लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच वर्ष नोकरी सोडता येत नाही. आणि घेतलेल्या कारच्या कर्जाच्या EMI मधला अर्धा हिस्सा कर्मचाऱ्यांना भरावा लागतो. त्याशिवाय इतक्या कार किंवा कुठलीही भेट देण्याची वस्तू खरेदी केल्याने त्या कम्पनीकडून भरघोस डिस्काउंट ढोलकीयांच्या कम्पनीला मिळतो हा भागही निराळाच. शिवाय या ६०० गाड्या कम्पनीच्या नावे खरेदी केल्याने त्या खरेदीचा जो GST भरला जातो त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट कम्पनीला मिळतं.
त्यामुळे ही कंपनी अत्यंत उदारपणे आपल्या कर्मचाऱ्यांना कार बोनस देते असं चित्र रंगवणं चुकीचं असून कर्मचाऱ्यांच्याच बहुतांश पैशातून हे केलं जातं आणि कंपनीला टॅक्स क्रेडिट सारखा लाभ होतो तो वेगळाच असा दावा मेरान्यूजनं केला आहे. असो पण कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला देण्याचा असा हटके प्रयोग पण छानच… ज्यांना हवे ते कर्मचारी अशी हि भेट घेऊन खुश पण होतील. आणि स्वतः कम्पनीपण त्यांच्या बिजनेस स्कीलने फायदा मिळवेल. थोडक्यात काय तर काहीही फुकटात मिळत नाही हेच खरं. आपण जिथे काम करतो तेही काही वाईट नाही याचं समाधान मानायचं आणि कामाला लागायचं…😅😅
वाचण्यासारखं आणखी काही….
खरा बापमाणूस!! जगायला शिकवणारे करोडपती सावजी ढोलकिया
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.