भारताच्या प्राचीन संस्कृतीचे दाखले आजही अनेक ठिकाणी सापडतात. काश्मीर मधील बुर्झाहामा या ठिकाणी एका दगडावर कोरलेल चित्र सुमारे ५० वर्षापूर्वी मिळालं. संशोधकांच्या मते ते जवळपास ६३०० वर्षांपूर्वीचं आहे. ह्या चित्रात दोन शिकारी, एक रेडा आणि दोन डिस्क दाखवल्या आहेत. आधीच्या संशोधनाप्रमाणे ह्या दोन डिस्क म्हणजे दोन सूर्य असावेत असा तर्क मांडला गेला. पण आकाशात एकच सूर्य असताना दोन सूर्य दाखवण्यामागचं प्रयोजन काही संशोधकांना मान्य नव्हतं. इतक्या जुन्या काळातील हे चित्र प्रचंड काहीतरी ऐतिहासिक आणि महत्वाची घटना दाखवणार असावं अस त्यांना वाटत होतं. म्हणून ह्या दोन सूर्यांच्या पाठीमागचं रहस्य शोधण्यासाठी भारतातून टी.आय.एफ.आर चे मयंक वाहिया आणि त्यांचे सहकारी आणि जर्मनी मधल्या संशोधकांनी पुढचे संशोधन केले.
संशोधकांना पक्क माहित होत कि दोन सूर्य दाखवण ही चित्रकाराची चूक नव्हती तर त्या वेळेला आकाशात काहीतरी अदभूत घडल असावं आणि त्यांना दोन सूर्य किंवा सूर्याच्या प्रखरतेइतपत काहीतरी दिसत असावं म्हणून ते दाखवल किंवा चित्रित करून पुढल्या पिढीला संदेश दिला गेला असावा. संशोधकांच्या टीम ने इतिहासाची पाने पुन्हा एकदा अभ्यासाला घेतली. सूर्याच्या प्रकाशाला तोडीस तोड अशी कोणती घटना आकाशात घडू शकते ह्याचा वेध आणि विचार करताना एका घटनेने त्याचं लक्ष वेधल. अवकाशात घडणारी पण हजारो वर्षात एकदा दिसणारी अशी घटना म्हणजे सुपरनोव्हा.
सुपरनोव्हा म्हणजे काय? तर जन्म होतानाच कोणत्याही ताऱ्याचा अस्त हा ठरलेला असतो. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेल गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याचं आयुष्य!! ज्या वेळेला ताऱ्याच आयुष्य संपुष्टात येतं, तेव्हा न्यूक्लिअर फायर किंवा अणुकेंद्रीय विखंडन आणि गुरत्वीय बल ह्यांच्यातील एकसंधपणा संपुष्टात येतो. सूर्याच्या बाबतीत बोलायचं झालच तर १ बिलियन वर्षानंतर सूर्याच्या प्रकाशात १०% वाढ होईल. ही खूप जास्त नसली तरी तिचा पृथ्वीवर बराच मोठा परिणाम होईल. त्या नंतर सूर्याच आकारमान इतक वाढत जाईल की बुध, शुक्र ग्रहच नाही तर आपली पृथ्वी पण त्याने गिळंकृत केलेली असेल. तो एक रेड जायंट तारा झालेला असेल. त्यानंतर त्याचा प्रवास व्हाईट डार्फ ताऱ्याकडे होईल.
प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत अस होईलच अस नाही. ताऱ्याच्या वस्तुमानावर त्याचा शेवट काय होणार हे ठरलेल असते. सूर्यापेक्षा कित्येक मोठ्या असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत ते वेगळ आहे. महाकाय ताऱ्यांमधील रेडीयेशन बल इतक प्रचंड असत की ते त्याच्या गुरुत्वीय बलाला वरचढ ठरते. ह्यामुळे त्यातील समतोल राखणं ताऱ्याला आयुष्याच्या शेवटी अशक्य होत जाईल. रेडियेशन बल इतक प्रचंड होईल की त्यामुळे ह्या ताऱ्याचा विस्फोट होईल. हा विस्फोट इतका प्रचंड असेल हजारो प्रकाशवर्ष दूरवर पण हा दिसेल. त्याचा प्रकाश किंवा त्यावेळी आकाशात ही घटना इतकी तेजस्वी असेल कि सूर्याच्या तेजामध्ये पण ह्याच अस्तित्व दिसून येईल. संशोधकांनी अशी कोणती घटना आकाशात घडली होती का ह्याचा शोध घेतला. त्यानंतर जे समोर आल ते थक्क करणारं होत.
सुमारे ६००० वर्षापूर्वी एच.बी. ९ नावाच्या ताऱ्याचा असाच महास्फोट झाल्याच त्यांना आढळून आल. काश्मीर मध्ये मिळालेल्या चित्राचा कालावधी आणि ह्या महास्फोटाचा कालावधी हे मिळतेजुळते आढळून आले. हे समोर येताच संशोधकांनी अजून खोलवर ह्याच संशोधन केल. त्यावेळच आकाश कस असेल आणी भारताच्या काश्मीर मधून हा महास्फोट कुठे दिसला असेल ह्याचा अभ्यास त्यांनी केला. हा तारा ओरायन ह्या तारकासमुहात दिसला असेल ह्यावर एकमत झाल. ओरायन तारका समूह हा शिकारी शिकार करतानाच्या प्रतिकृतीचा समजला जातो. हेच सगळ चित्रातून दिसून येते. शिकारी हा सेटस ताऱ्यापासून तर त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या प्राणी हा अन्द्रोमेडा आणि पेगासुस दाखवतो. तर भाला हा तेजस्वी ताऱ्याचा रस्ता दाखवतो. हे पूर्ण चित्र जेव्हा आपण आकाशाशी जोडतो. तेव्हा आपल्या पूर्वजांनी बघितलेल्या अदभूत घटनेच साक्ष हे चित्र आजही ६००० वर्षांनी आपल्याला देत आहे.
संशोधकांच्या मते सगळ्यात जुनी अशी सुपरनोव्हा ची नोंद हि चीन मध्ये असून ती साधारण १००० वर्षापूर्वीची आहे. त्यामानाने काश्मीर च्या चित्रात बंदिस्त केलेला हा वैश्विक नजराणा तब्बल ६००० वर्ष जुना आहे. ह्या चित्राने आपली संस्कृती किती पुढारलेली आणि आपल्या आकाशात घडणाऱ्या अनेक गोष्टींच कुतूहल त्यांना वाटत होत ह्याची साक्ष देणार आहे. आपण अनुभवलेल्या गोष्टी त्याच सचोटीने पुढल्या पिढीकडे हस्तांतरण करण्यासाठी चित्राचा केलेला उपयोग खूपच अदभूत आहे. आज तो सुपरनोव्हा नष्ट झाला असला तरी त्याची आठवण हे चित्र ६००० वर्षानंतर पण दोन सूर्याच्या रुपात आपल्याला करून देते आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.